' स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत! – InMarathi

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शेअर मार्केट हे गुंतवणूकदारांसाठी एक असे ठिकाण जिथे थोडे सामंजस्याने आणि हुशारीने वागल्यास चांगला नफा मिळवता येतो. आपल्यातील बहुतेक लोक शेअर मार्केटचा उपयोग करत असतील.

त्यामधून नफा कसा मिळवावा हे देखील त्यांना माहित असेल. पण काही लोक असे देखील असतात, ज्यांना शेअर मार्केटबद्दल काहीही कल्पना नसते. त्यांना अटी, नियम तसेच गुतंवणूकदारांचे अधिकार माहित नसतात.

 

Stockmarket.marathipizza
cdn.moneycrashers.com

 

यामुळे त्यांची अनेक वेळा फसवणूक देखील केली जाते. कोणावरही विश्वास ठेवून नफा मिळवण्याच्या उद्देशाने कंपनीची काहीही माहिती नसताना गुंतवणूक करायला तयार होतात आणि अश्यावेळी या लोकांना ब्रोकर किंवा सब-ब्रोकर लालूच दाखवून त्यांची फसवणूक करतात.

स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करणे सर्वांसाठी सोप्पे नसते. माहितीच्या अभावामुळे रजिस्टर नसलेल्या ब्रोकर आणि सब ब्रोकरकडून आपण मार्केटमध्ये पैसे लावल्यास आपल्याला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. गुंतवणूकदाराला आपले अधिकार माहित नसल्याने त्याला या समस्यांना सामोरे जावे लागते.

मार्केट रेग्युलेटर सेबी ने प्रत्येक गुंतवणूकदाराला काही अधिकार दिलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला असे १० अधिकार सांगणार आहोत, ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही योग्य तो पर्याय निवडू शकता.

 

share-market-marathipizza03
hangthebankers.com

 

तुमच्याबरोबर काही फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार करू शकता…

जर एक्सचेंजच्या कोणत्याही ट्रेडिंग मेंबरने किंवा लिस्टेड कंपनीने तुमच्याशी काही फसवणूक केली असेल, तर तुमच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही मार्केट रेग्युलेटर सेबीच्या संकेतस्थळावर किंवा एक्सचेंजच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करू शकता.

Stockmarket.marathipizza1
themostimportantnews.com

 

भारतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले आहेत. फसवणूक होऊ नये, नुकसान होऊ नये ह्या साठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांनी हे अधिकार समजून घेतले पाहिजेत.

गुंतवणूकदारांचा पहिला अधिकार …

एका गुंतवणूकदाराला ट्रेड करण्याच्या आधी ब्रोकर/ सब-ब्रोकरचे सेबी सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन नंबर जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

गुंतवणूकदारांचा दुसरा अधिकार…

शेअर खरेदी किंवा विक्रीच्या पे-आउटच्या दुसऱ्या दिवशी शेअरच्या डिलेवरी किंवा विकल्या गेलेल्या शेअरच्या किंमती गुंतवणूकदाराला मिळाल्या पाहिजेत.

गुंतवणूकदारांचा तिसरा अधिकार…

गुंतवणूकदाराला ब्रोकरकडून कराराची नोट प्राप्त करण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये किंमत, ब्रोकरेज, सेवाकर या व्यतिरिक्त वसूल करण्यात आलेले इतर शुल्कसुद्धा लिहिले गेलेले असले पाहिजेत.

 

Stockmarket.marathipizza2
i2.wp.com

 

गुंतवणूकदारांचा चौथा अधिकार…

कंपनीकडून कंपनीच्या होल्डिंगचे ट्रान्सफर, विभाजन याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार गुंतवणूकदारांना असतो.

गुंतवणूकदारांचा पाचवा अधिकार…

कंपनीद्वारे राइट इश्यू जारी केल्यावर गुंतवणूकदारांना त्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे. याबद्दल सर्व माहिती कंपनी आपल्या गुंतवणूकदाराला देण्यास बांधील आहे.

गुंतवणूकदारांचा सहावा अधिकार…

गुंतवणूकदाराला कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यामध्ये बॅलेंसशीट, प्रॉफीट आणि लॉस अकाऊंटचा अहवाल समाविष्ट असला पाहिजे, याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला आहे.

 

Stockmarket.marathipizza3
financialgyaan.com

 

गुंतवणूकदारांचा सातवा अधिकार…

कंपनीच्या वार्षिक बैठकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आणि आपले मत देण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला असतो.

गुंतवणूकदारांचा आठवा अधिकार…

गुंतवणूकदाराला जनरल मिटिंगमध्ये घोषित केलेला डिव्हीडन्ट ठरलेल्या वेळेवर मिळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

गुंतवणूकदारांचा नववा अधिकार…

फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कंपनीच्या विरुद्ध सिविल किंवा क्रिमिनल कारवाई करण्याचा अधिकार गुंतवणूकदाराला आहे.

गुंतवणूकदारांचा दहावा अधिकार…

कंपनी बंद पडल्यास, अश्या प्रकरणामध्ये गुंतवणूकदाराला आपल्या मुद्दलाची रक्कम परत मिळविण्याचा अधिकार आहे…!

असे हे अधिकार गुंतवणूकदाराला आपले काम सोप्पे करून तर देतातच, त्याचबरोबर फसवणूक झाल्यास त्याबद्दल दाद मागण्याचा सुद्धा हक्क देतात.

हे अधिकार लक्षात ठेवा. आणि वेळ पडल्यास त्यांचा वापर करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?