' असं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही! – InMarathi

असं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या आधुनिक युगात अमरत्व वगैरे कल्पना तश्या थोतांड वाटतात आणि असतीलही. कारण त्याबाबतचे ठोस असे पुरावे काही मिळालेले नाहीत आणि विज्ञानाने देखील अश्या गोष्टी शक्य नसल्याचे म्हटले आहे.

असो, त्या वादाच्या दिशेने आपण सध्या तरी नको जाऊया आणि आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया.

तर मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाधिकांच्या अनेक कहाण्या आहेत, ज्यांच्यामध्ये अमरत्वाचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात. अनेक जणांनी अमरत्वासाठी देवांकडे प्रार्थना केल्याचे देखील आढळते.

 

death marathipizza

 

आता ही गोष्ट तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे ठावूक नाही, पण आपल्या हिंदू पुराणामध्ये आठ अश्या पात्रांबद्दल सांगितले आहे ज्यांना अमरत्व बहाल आहे, जे अनादी अनंत काळापर्यंत जिवंत राहणार आहेत.

नसेल माहित तर चिंता नसावी, आज आपण त्याच विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.

तत्पूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ह्या कथांवर विश्वास ठेवायचा की नाही त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण त्याबदल्यात जर आपण या पौराणिक गोष्टींकडे केवळ मनाला रंजक खाद्य पुरवणाऱ्या, आपले मनोरंजन करणाऱ्या रंजक कथा म्हणून जर पाहिले तर काय वाईट आहे…?!

आपण काल्पनिक चित्रपट बघतो, तसाच या कथांचा आस्वाद घ्यायचा. उगाच त्यावर वाद करून वेळ घालवण्यापेक्षा हा सोपा मार्ग नाही का? बघा विचार करून…!

चला तर पाहूया काय आहे ही अमरत्वाची कथा आणि कोण आहे ती ८ पात्रे ज्यांना अमरत्व बहाल आहे.

अमरत्व म्हणजे कधीही मृत्यू न येणे होय. या शब्दाचे वर्णन ऋग्वेदामध्ये मिळते आणि अमृत प्राशन केल्यास अमरत्व प्राप्त होते अशी एक कथा देखील प्रचलित आहे.

 

samudramanthan 1 InMarathi

 

एकदा महर्षी दुर्वासांच्या शापामुळे इंद्र आणि अन्य देवता कमजोर झाले तेव्हा दानवांनी देवतांवर आक्रमण करून त्यांना पराजित केले. तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा विष्णूने देवतांना दानावांसोबत क्षीरसागर मंथन करून अमृत काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवता आणि दानव समुद्रातून अमृत काढण्याचा प्रयत्न करू लागले.

अमृत कुंभ बाहेर निघताच देवतांच्या इशाऱ्याने इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन आकाशात उडून गेला. त्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या आदेशावरून दानवांनी जयंतचा पाठलाग सुरु केला.

 

हे ही वाचा –

===

 

अथक प्रयत्नानंतर त्यांनी जयंतला पकडले. त्यानंतर अमृत कलशावर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी देव-दानवांनी १२ दिवस अविरत युद्ध केले. कलह शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत पाजले.

 

mohini avtar InMarathi

 

अशी आहे ही कथा. अमरत्वाला धर्म ग्रंथामध्ये असा आशीर्वाद म्हटले गेले आहे की, ज्या व्यक्तीला हा आशीर्वाद मिळाला त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. यामुळेच देवता कोणालाही अमरत्वाचा आशीर्वाद देत नाहीत.

महाभारतातील एका श्लोकामध्ये अशा आठ लोकांचे वर्णन करण्यात आले आहे जे अमर आहेत. तो श्लोक म्हणजे-

अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।।

ही आहेत ती पुराण कथेतील पात्रे ज्यांना अमर होण्याचे वरदान मिळाले आहे-

 

वेद-व्यास

 

vyas-marathipizza01
savita92.files.wordpress.com

 

ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद या प्राचीन आणि पवित्र चार वेदांचे संपादन आणि १८ पुराणांचे रचनाकार आहेत वेद-व्यास!

 

मार्कंडेय

 

Markandya InMarathi

 

महादेवाचे परम भक्त म्हणून यांची ख्याती होती. शिव उपासना आणि महामृत्युंजय सिद्धीने ऋषी मार्कंडेय यांनी अल्पायुवर मात करून चिरंजीव पद प्राप्त केले.

 

परशुराम

 

parshuram InMarathi

 

परशुराम हे विष्णूंच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. ज्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला. यांच्या दानशिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले. अश्या भगवान परशुरामांना अमरत्व बहाल आहे.

 

हनुमान

 

hanuman-marathipizza
thedivineindia.com

 

श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांना देखील अमर होण्याचे वरदान मिळाल्यामुळे चिरंजीव म्हटले जाते.

 

राजा बळी

 

raja bali InMarathi

 

राजा बळी म्हणजे भक्त प्रल्हादाचा वंशज होय. वामन अवतारातील भगवान विष्णूला सर्व संपत्ती दान करून तो महादानी रुपात प्रसिद्ध झाला.

 

अश्वथामा 

 

ashwathama-marathipizza
dainikbhaskar.com

 

कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा हा मुलगा. अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

कृपाचार्य

 

kripacharya InMarathi

 

युद्ध नीतीमध्ये कुशल तसेच परम तपस्वी ऋषी, जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते.

 

विभीषण

 

vibhishan InMarathi

 

 

लंकापती रावणाचा लहान भाऊ, ज्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धामध्ये धर्म आणि सत्याचे रक्षण करून श्रीरामांना मदत केली होती.

आहे की नाही भन्नाट आणि रंजक गोष्ट!!!

 

हे ही वाचा – 

 

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?