' इतिहासप्रेमी असूनही या १० म्युझियम्सना भेट दिली नाहीत, तर तुम्ही खूप काही मिस कराल! – InMarathi

इतिहासप्रेमी असूनही या १० म्युझियम्सना भेट दिली नाहीत, तर तुम्ही खूप काही मिस कराल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहास वाचायला तर मजा येतेच पण तो स्वत:च्या डोळ्याने अनुभवायाची मजा काही औरच असते. आता इतिहास अनुभवायचे तसे अनेक मार्ग आहेत.

चित्रपट म्हणा दुर्मिळ फोटो म्हणा, पण सगळ्यात भारी म्हणजे संग्रहालयात अर्थात म्युजियममध्ये जाऊन ऐतिहासक गोष्टींना डोळ्यात साठवणे.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना म्युजियम पाहायला आवडत असेल, तर मंडळी म्हणूनच तुमच्यासाठी हा खास लेख घेऊन आलो आहोत, ज्यात आम्ही सांगतोय जगभरातील १० म्युजियमबद्दल ज्यांना प्रत्येक इतिहास प्रेमीने एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

 

नॅशनल गॅलरी, लंडन

museum-marathipizza01
artfund.org

१३ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंतच्या पाश्चात्त्य युरोपीय चित्रांचा खजिना येथे आहे. ट्रॅफालगर चौकात असलेल्या या संग्रहालयात मोफत प्रवेश असून, व्हॅन गॉग व जॉन कॉन्स्टेबल यांच्या कलाकृती येथे आहेत.

 

अमेरिकन म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री, न्यूयॉर्क

museum-marathipizza02
ruebarue.com

१८६९ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयाचे कोच डायनासोर विंग, मॉर्गन हॉल ऑफ जेम्स व मिलस्टीन हॉल ऑफ ओशीन हे विभाग आहेत. येथे व्हेल माशाची अतिभव्य प्रतिकृती आहे. हेडन तारांगण व आयमॅक्स थिएटरही संग्रहालयाचा भाग आहेत.

 

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, लंडन

museum-marathipizza03
harlemspirituals.com

पिकासो विशेष प्रदर्शन आणि बहुचर्चित बिग बांबू इन्स्टॉलेशनमुळे (मांडणशिल्प) या संग्रहालयाला २०१० मध्ये २००९ च्या तुलनेत ३ लाख अधिक लोकांनी भेट दिली. जो एक विक्रम मानला गेला. २०११ मधील अलेक्झांडर मॅकक्वीन शो पाहण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे होते.

 

मुसी ड्यू लूव्हर, पॅरिस

harlemspirituals.com
travelplanet.in

व्हिनस डी मेलोपासून मोनालिसापर्यंतच्या ३५ हजार सर्वोत्तम कलाकृतींनी नटलेले हे संग्रहालय कलाप्रेमींसाठी नंदनवन आहे. १९८९ मध्ये संग्रहालयासमोर उभारलेले ६९ फूट उंच काचेचे पिरॅमिडही लक्षवेधी आहे.

 

व्हॅटिकन म्युझियम, रोम

museum-marathipizza05
photoshelter.com

पोप ज्युलियस (द्वितीय) यांनी सोळाव्या शतकात जमवलेल्या काही शिल्पांतून या संग्रहालयाची सुरुवात झाली. त्यानंतरच्या पोपनी पुढील पाच शतके या संग्रहात भर घातली. राफेल, कॅराव्हॅगियो आणि मायकेल अँजेलो या महान कलावंतांच्या कलाकृती या संग्रहालयात पाहायला मिळतात.

 

नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, वॉशिंग्टन

museum-marathipizza06
hok.com

नॅशनल मॉलमध्ये १९७६ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयात ऐतिहासिक विमाने आणि अंतराळयानांचा समावेश आहे. राईट बंधूंच्या १९०३ मधील विमानापासून चंद्रावरील खडकाचा नमुना अशा जवळपास ५० हजार मूळ मानवनिर्मित वस्तू येथे आहेत.

 

टेट मॉडर्न, लंडन

museum-marathipizza07
londonandpartners.com

२००० मध्ये सुरू झालेले टेट मॉडर्न हे आधुनिक कला संग्रहालय अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. डाली, मॅग्रिट व मॅटिस यांच्या कलाकृतींसह नाट्यमय टर्बाइन हॉलमध्ये ठेवलेली भव्य इन्स्टॉलेशन्स (मांडणशिल्पे) हे या संग्रहालयाची मुख्य वैशिष्ट्ये आहे.

 

नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, वॉशिंग्टन

museum-marathipizza08
visionsoftravel.org

डायनॉसोरचे जीवाश्म, कुप्रसिद्ध होप डायमंड आणि जवळपास १२६ दशलक्ष वैविध्यपूर्ण वस्तूंमुळे हे लोकप्रिय संग्रहालय बनले आहे.

 

नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन

museum-marathipizza09
3.bp.blogspot.com

अमेरिकेतील इनव्हेस्टर अँड्र्यू मेलॉन यांनी मृत्यूसमयी आपल्या संग्रहातील वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी दिल्या. १९४१ मध्ये हे संग्रहालय सुरू झाले. त्यात अनेक महान कलावंतांच्या कलाकृती आहेत.

 

ब्रिटिश म्युझियम, लंडन

museum-marathipizza10
ywamheidebeek.org

ब्रिटिश म्युझियम हे जगातील सर्वात भव्य संग्रहालयांपैकी एक आहे. येथे मोफत प्रवेश आहे. अडीच मैल लांबीच्या गॅलऱ्या आणि सत्तर लाख वस्तू या संग्रहालयात आहेत. रोसेटा स्टोन आणि वादग्रस्त एल्गिन मार्बल्स ही त्याची खास आकर्षणे म्हणावी लागतील.

आपल्या भारतात देखील अनेक सर्वोत्तम म्युजियम्स आहेत, त्यांचा आस्वाद घ्याच, पण कधी संधी मिळाली तर या म्युजियम्सना भेट द्यायला विसरू नका, कारण तो अनुभव कधीही न विसरता येण्यासारखाच असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?