' खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता?-भाग ३ – InMarathi

खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता?-भाग ३

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मागील भागाची लिंक : खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता? – भाग २

===

आपल्या देशात निसर्गाचे अद्भुत नजारे आपल्याला अनुभवायला मिळतात. या लेखाच्या मागील दोन भागात आपण अशाच काही पर्यटन स्थळांची माहिती घेतली ज्यांच्या समोर परदेशी पर्यटन स्थळे देखील कमी आहेत.

आज या लेख मालिकेच्या शेवटच्या भागात आम्ही आपल्यासमोर अशाच काही आणखीन स्थळांची माहिती घेऊन आलो आहोत.

१. कच्छ रण आणि बॉनविले सॉल्ट फ्लॅट्स

 

kutch_Bonneville-marathipizza
Kutch_Bonneville salt flats

जशी शांतता तुम्हाला अमेरिकेच्या बॉनविले सॉल्ट फ्लॅट्सला बघून मिळेल तशीच शांतता तुम्ही गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील रण येथेही अनुभवाल.

कच्छचा रण हा गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर आणि पूर्वमध्ये पसरलेलं मिठाचं मैदान आहे.

 

२. चित्रकूट धबधबा आणि नायगारा फॉल्स

 

chitrkoot-niagara falls-marathipizza
Chitrkoot-Niagara falls

कॅनडा हे तिथल्या नायगारा फॉल्ससाठी जगप्रसिद्ध आहे, पण तो नायगारा फॉल्स फक्त कॅनडामध्येच आहे असं नाहीये. आपल्या देशातील छत्तीसगढ राज्यातील चित्रकूट धबधबा काही नायगारा फॉल्सपेक्षा कमी नाही.

त्यामुळे एवढ्या दूर कॅनडाला जाऊन पैसे वाया घालविण्यापेक्षा चित्रकूट धबधबा बघायला जा…

 

३. गंडीकोटा कॅन्यन आणि ग्रॅण्ड कॅन्यन

 

gandikota_grand canyon-marathipizza
Gandikota_Grand canyon

आपल्याला असं वाटत असेल की ग्रॅण्ड कॅन्यन हे केवळ अमेरिकेतच आहे, पण तुमचा हा समज चुकीचा आहे.

आपल्याजवळ आपला स्वतःचा ग्रॅण्ड कॅन्यन आहे, आंध्रप्रदेश राज्यातील गंडीकोटा हिल्स मधील कॅन्यन तुम्हाला अमेरिकेतील ग्रॅण्ड कॅन्यनची आठवण करवून देईल.

 

४. बंगळुरू कॅसल आणि विंडसर कॅसल…

 

banglore castle-windsor castle-marathipizza
Banglore castle-Windsor castle

बंगळुरू कॅसल हे इंग्लंडमधील विंडसर कॅसल यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या किल्ल्याला टिपू पॅलेस देखील म्हणतात. बंगळूर येथील हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

या किल्ल्याची वास्तुशैली आणि बनावटीवरून मुघलांची जीवनशैली दिसून येते.

 

५. अंदमान आणि स्पेन

 

Andaman_Spain-marathipizza
Andaman_Spain

अंदमान येथील स्कुबा डायविंग आणि स्पेनच्या स्कुबा डायविंगमध्ये तुम्हाला जराही फरक नाही जाणवणार.

 

६. मुन्नार आणि बोह येथील चहाचे मळे…

 

munnar_boh-marathipizza
Munnar_Boh tea plantation

केरळ राज्यातील मुन्नार या हिल स्टेशन वरील चहाचे मळे आणि मलेशिया येथील बोह टी प्लँटेशन हे तुम्हाला सारखेच भासतील.

 

७. एल्लपी येथील बॅकवॉटर आणि व्हेनिस…

 

Alleppy_Venice-marathipizza
Alleppy_Venice

केरळ येथील एल्लपीच्या बॅकवॉटरमधील राईड ही इटलीच्या व्हेनिस एवढीच सुखदायक असेल. त्यासाठी तुम्हाला व्हेनिसला जायची गरज नाही.

जेव्हा आपल्याच देशाला पर्यटनाचा एवढा समृद्ध वारसा लाभला आहे, तर इतर देशात जाऊन आपला पैसे आणि वेळ का वाया घालवता. त्यापेक्षा आपल्याच देशात फिरायला जा.

यामुळे दोन गोष्टी साध्य होतील.

एक तर तुमचा वेळ आणि पैसे वाचेल आणि दुसरं आपल्या देशातील जे लोक पर्यटनावर अवलंबून आहेत त्यांचीही थोडी मदत होईल…

म्हणजे आपला पैसे आपल्याच देशात राहून आपल्याच देशाच्या कामात येईल… बघा विचार करून रुचलं तर…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?