' हे आहेत २०१७ चे टॉप १० इंडियन स्टार्स, तुमचे आवडते स्टार्स कुठल्या स्थानावर आहे जाणून घ्या – InMarathi

हे आहेत २०१७ चे टॉप १० इंडियन स्टार्स, तुमचे आवडते स्टार्स कुठल्या स्थानावर आहे जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आता आपण २०१७ या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहे. हे वर्ष काहींसाठी चांगल गेलं असेल तर काहींसाठी वाईट ठरल असेलं. तसेच अनेक पैलूंवर या वर्षाचे विश्लेषण सुरु आहे. मग यातून आपली फिल्म इंडस्ट्री कशी सुटणार. चित्रपट एक्स्पर्टची या वर्षी कोणी किती कमाई केली, कोणी कुठला चित्रपट केला, कोणाचा चित्रपट आपटला, कोणाच चालला. या सर्वांवर नजर आहे.

यातच जग प्रसिद्ध सेलिब्रिटी डाटाबेस प्लॅटफॉर्म IMDb ने नुकतीच २०१७ च्या टॉप १० इंडियन स्टार्सची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये IMDb ने आपल्या StarMeter stats आणि पेज व्हूजच्या आधारे ही यादी तयार केली आहे.

या यादीतील काही नावे आणि त्यांचा रँक तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील. या यादीत अशी काही नावे आहेत, जी तुमच्या मते यात नको किंवा त्या क्रमांकावर नको. चला तर जाणून घेऊ या यादीत कोणाला आणि कुठल्या क्रमांकावर जागा मिळाली आहे ते…

१. शाहरुख खान :

shah-rukh-khan-inmarathi
indianexpress.com

या यादीत पहिल्या क्रमांकावर बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आहे. यावरून कळून येते की शाहरुख खानला उगाचच बॉलीवूडचा किंग खान नाही म्हटल्या जात. यावर्षी शाहरुखचे ‘रईस’ आणि और ‘जब हॅरी मेट सेजल’ हे चित्रपट आले होते.

२. आमीर खान :

 

aamir-inmarathi
indianexpress.com

२०१६ साली आपल्या ‘दंगल’मुळे बॉलीवूडमधील अनेकांची झोप उडवलेल्या आमीर खानला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. तर यावर्षी त्याचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट आला ज्यात तो एका वेगळ्याच भूमिकेत दिसून आला.

३. सलमान खान :

 

Salman-Khan-inmarathi02
vogue.in

तिसऱ्या स्थानावर आपला भाई जान म्हणजेच सलमान खान आहे. यावर्षी सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट आला, ज्यातून सलमानच्या प्रशंसकांना निराशाच हाती लागली. पण त्याचा आगामी चित्रपट ‘टाइगर जिंदा है’ मुळे पुन्हा सलमानचे फॅन्स आस लावून बसले आहे, आता सलमान त्यांच्या आशेवर किती खरा उतरतो हे तर चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.

४. तमन्ना भाटिया :

 

tamannaah-bhatia-baahubali-inmarathi
ibtimes.co.in

या यादीच्या चौथ्या क्रमांकावर तमन्ना भाटिया आहे, हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण हो, तमन्नाला या यादीत चौथे स्थान मिळाले आहे आणि तिने प्रभासला देखील  यात मागे सोडले आहे. यावर्षी ‘बाहुबली-२’ व्यतिरिक्त तमन्ना इतर तमिळ चित्रपटांत दिसली होती.

५. इरफान खान :

 

irfan-khan-InMarathi
bollywoodlife.com

इरफान खान याला या यादीत पाचवे स्थान मिळाले आहे. यावर्षी इरफानचा ‘हिंदी मीडियम’ आणि ‘करीब-करीब सिंगल’ हे चित्रपट आले, ज्यातून पुन्हा एकदा इरफान खानचा उत्कृष्ट अभिनय बघायला मिळाला.

६. प्रभास :

 

Prabhas-Bahubali-inmarathi
ibtimes.co.in

हो..! बाहुबलीला या यादीत सहावे स्थान देण्यात आले आहे. बाहुबलीच्या नावाने जगभर प्रसिद्धी मिळविलेल्या प्रभासला या यादीत आणखी थोड वरच स्थान मिळायला हवे होते असे आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच वाटत असेल. यावर्षी प्रभासचा ‘बाहुबली-२’ हा चित्रपट आला आणि सध्या तो ‘साहो’ या चित्रपटावर काम करतो आहे.

७. अनुष्का शर्मा :

 

Anushka sharma-inmarathi
bizasialive.com

या यादीत सातवे स्थान हे नुकतीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनुष्का शर्माला मिळाले आहे. यावर्षी तिचे दोन चित्रपट आले एक म्हणजे ‘फिल्लौरी’ आणि दुसरा ‘जब हॅरी मेट सेजल’.

८. अनुष्का शेट्टी :

 

Anushka-inmarathi
indianexpress.com

‘बाहुबलीची’ देवसेना हिला या यादीत आठवे स्थान मिळाले आहे. तशी अनुष्का शेट्टी ही तमिळ-तेलुगु चित्रपटांत निभावलेल्या आपल्या भूमिकांमुळे लोकांची वाहवाही मिळवतेच पण तिने साकारलेली देवसेना ही अविस्मरणीय ठरली. तिचे या वर्षी ‘बाहुबली-२’, तमिळ चित्रपट ‘सिंघम-३’ हे चित्रपट आले.

९. ऋतिक  रोशन :

 

hrithikroshan-inmarathi
indianexpress.com

आपल्या ऋतिक रोशनला या यादीत नववे स्थान मिळाले आहे. यावर्षी ऋतिकचा ‘काबिल’ हा चित्रपट आला, पण यावर्षी ऋतिक हा त्याच्या चित्रपटांसाठी कमी आणि इतर गोष्टींकरिता जास्त चर्चेत राहिला.

१०. कॅटरिना कैफ :

 

Katrina-Kaif-inmarathi01
mensxp.com

दहाव्या स्थानावर कॅटरिना कैफ आहे. या यादीतील ती दुसरी बॉलीवूड अभिनेत्री आहे. यावर्षी तिचा की ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट आला पण तो काही खास चालला नाही. आता तिचा आगामी चित्रपट ‘टाइगर जिंदा है’ मध्ये ती नक्कीच काहीतरी कमाल करेल अशी आशा तिच्या फॅन्सना नक्की असेल.

तर हे होते २०१७ सालचे टॉप १० इंडियन स्टार्स… आता २०१८ मध्ये कोणाचा जादू चालतो हे बघावं लागेलं…

स्त्रोत : IMDb

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?