'रावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी 'मंदोदरी' बद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

रावणाबद्दल तर तुम्ही जाणताच, पण त्याची पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रामायण – महाभारत ही भारतातील आर्ष महाकाव्ये मानली जातात. आपण सगळे रामायणाच्या कथेशी परिचित आहोतच. अगदी लहान मुलालासुद्धा रामायणाची कथा माहित असते.

रामायण हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथापैकी एक ग्रंथ आहे. आपल्यातील कितीतरी लोकांनी तो वाचला देखील असेल. या ग्रंथातील प्रत्येकाला आपण जवळून अनुभवले आहे.

रामायणातील राम, सीता, लक्ष्मण, रावण यांच्या सर्व गोष्टी आपल्या तोंडावर असतात. भगवान रामांविषयी आपल्या मनामध्ये एक आदराची भावना आहे, तसेच रावणाविषयी रागसुद्धा आहे.

 

ramayan inmarathi

 

आपल्याकडे रामाला आदर्श राजा, पती मानले जाते. आपल्याकडे कायमच रामासारखं वागावं, रावणासारखं वागू नये अशी शिवण दिली जाते. काही ठराविक पात्र सोडली तर आपल्याला इतर व्यक्तिरेखांबद्दल फारशी माहिती नसते, पण रामायण घडण्यात अशा अनेक पात्रांचा समावेश आहे.

तुम्हाला रावणाची पत्नी मंदोदरी माहित आहे का? रामायणाचा ती सुद्धा एक घटक होती.

मंदोदरीबद्दल आपल्यातील बहुतेकांना काही खास माहिती नसेल, आज आम्ही तुम्हाला मंदोदरीबद्दल काही अशी माहिती सांगणार आहोत, जी कदाचित तुम्ही कधी ऐकली नसेल.

पुराणातील काही संदर्भानुसार, मंदोदरी ही सुंदर, धार्मिक आणि नैतिक स्त्री होती. ती नेहमी आपल्या पतीला म्हणजेच रावणाला धार्मिकतेचा सल्ला देत असे. मंदोदरी नेहमी रावणाला सीतेला रामाकडे पाठवण्याची विनंती करत असे, पण हे कधीही त्याने ऐकले नाही.

 

mandodari inmarathi

 

रावण आणि राम यांच्यातील युद्धात राम रावणाचा वध करतो मग त्यानंतर मंदोदरीचे काय होते ? हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. चला सुरुवातीपासून जाणून घेऊया.

एकदा मधुरा नामक अप्सरा कैलास पर्वताला भेट देण्यासाठी आली होती. तिथे तिने भगवान शंकरांना पाहिले, त्यावेळी देवी पार्वती तिथे नसल्याने तिने त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

ज्यावेळी देवी पार्वती त्या ठिकाणी आली, तेव्हा तिने भगवान शंकराचे भस्म मधुराच्या अंगावर पाहिले. हे पाहून पार्वतीला खूप राग आला आणि तिने मधुराला बेडूक बनवले व एका विहिरीमध्येच बेडकाच्या रुपात तिला जीवन कंठावे लागेल असा शाप दिला.

हे पाहून भगवान शंकरांनी पार्वतीला तिचा शाप मागे घेण्याची विनंती केली. राग शांत झाल्यावर पार्वतीने शंकराची विनंती मान्य केली आणि भगवान शंकराला सांगितले की,

मधुरा ही १२ वर्षांनी पुन्हा आपल्या मूळ रुपामध्ये येईल, पण तोपर्यंत तिला असेच राहावे लागेल.

 

Mandodari.marathipizza1
wittyfeed.com

 

असुरांचा राजा मयसूर आणि त्याची पत्नी हेमा या दांपत्याला मायावी आणि दुडुंशी असे दोन पुत्र होते. पण त्यांना कन्या रत्न हवे होते त्यासाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्याचवेळी मधुराचा शाप संपुष्टात आला.

हे दाम्पत्य तपश्चर्या करत असतानाच मधुरा पूर्ववत झाली, पण मनुष्य बालिकेच्या रुपात! या दाम्पत्याने तिचे रडणे ऐकले आणि तिला विहिरीमधून बाहेर काढले.

मयसूर आणि हेमा यांनी मधुराला देवाचा प्रसाद समजून आपल्याकडे ठेवून घेतले आणि तिचे नाव मंदोदरी ठेवले.

एकदा रावण मयसुराला भेटण्यासाठी आला होता. तिथे त्याने मंदोदरीला पहिले, तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि त्याने मयसुराकडे त्याच्या मुलीबरोबर लग्न करण्याची परवानगी मागितली.

मयसुराने रावणाला साफ नकार दिला, पण रावणाच्या भीतीमुळे आणि त्याची भगवान शंकरांवरची श्रद्धा पाहून मंदोदरी त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाली. रावण आणि मंदोदरी यांना मेघनंदा, अतिकया, अक्षयकुमारा हे तीन पुत्र होते.

 

Mandodari.marathipizza2
popcornin.in

 

एके दिवशी राम हा रावणाचा वध करणार ह्या भविष्यवाणीबद्दल जेव्हा मंदोदरीला कळाले, तेव्हा तिने रावणाला सीतेला बंधनातून मुक्त करण्याची विनंती केली, परंतु रावणाने सीतेला सोडण्यास साफ नकार दिला.

तरीसुद्धा मंदोदरीने आपली पत्नी म्हणून असणारी सर्व कर्तव्ये बजावली. रावणाच्या नशिबात काय आहे हे माहित असून सुद्धा मंदोदरीने युद्धामध्ये आपल्या पतीला साथ दिली.

रावणाच्या मृत्युनंतर रामाने विभीषणाला लंकेच्या राजगादीवर बसण्याचा सल्ला दिला आणि राज्याची अजून प्रगती करण्यास सांगितले. तसेच रामाने विभीषणाला मंदोदरी बरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी मंदोदरीला एक राणी म्हणून असलेल्या तिच्या कर्तव्यांविषयी आठवण करून दिली.

पण राम सीता आणि इतरांना आपल्यासोबत अयोध्याला घेऊन आल्यानंतर मंदोदरीने बाहेरच्या जगापासून स्वतःला लांब ठेवले आणि एकांतात राहण्यास सुरुवात केली.

काही काळानंतर मंदोदरीने लंकेमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला आणि तिने विभीषणाबरोबर लग्न केले. त्यानंतर तिने राज्यकारभार नीट चालवण्यासाठी विभीषणाला मदत केली.

 

Mandodari.marathipizza3
thevoiceofnation.com

 

असे हे मंदोदरीचे पुराणातील पात्र…हे पात्र खरे होते की खोटे तो विषय राहू दे बाजूला, पण या पात्राच्या माध्यमातून जी मानवी मूल्ये रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे ती आपण समजून घेतली पाहिजेत.

मंदोदरी सुज्ञ होती, तिला खऱ्या खोट्याची जाण होती, पण आपण कोणाला तरी वचन दिले आहे, त्यामुळे ते तोडणे म्हणजे विश्वासघात ठरू शकतो असे तिला वाटे म्हणून ती रावणाची बाजू चुकीची असताना देखील त्याच्या बाजूने उभी राहते, परंतु प्रत्येक वेळी त्याला समजावते, सल्ला देते. ती दोन्ही बाजूंनी आपले कर्तव्य चोख बजावते.

मनुष्याने देखील आपली कर्तव्ये, वचने यांची जाण ठेवून नेहमी सत्यवचनी असावे, आपल्याने जे काही शक्य आहेत ते सर्व प्रयत्न करावे असा संदेश हे पात्र देते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?