बॉम्बस्फोटात दोन्ही हात गमावूनही हार न मानलेल्या ‘ती’ची कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यातील बहुतेक लोक शरीराने धडधाकट असूनदेखील प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या नशिबाला दोष देत बसतात.

पण काही अशीही माणसे असतात, ज्यांच्या आयुष्यामध्ये अपंगत्व येऊन देखील ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात.

अश्या लोकांकडून आपण काहीतरी शिकले पाहिजे. आयुष्यामध्ये कधीही हार मानून चालत नाही, संपूर्ण जोर लावून जर तुम्ही प्रयत्न केलात, तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल.

आज आपण अश्याच एका झुंजार तरुणीबद्दल जाणून घेणार आहोत, जीने २००२ मध्ये बिकानेर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आपले दोन्ही हात गमावून सुद्धा आयुष्यामध्ये हार मानली नाही.

तिचे नाव मालविका अय्यर. तिने या धक्कादायक घटनेला विसरून नव्याने आपले जीवन जगण्यास सुरुवात केली.

 

Malvika iyer.marathipizza
ntd.tv

 

बॉम्बस्फोटाचा विचार केला तरी, जीवाचा थरकाप उडतो.

आजपर्यंत आपल्या देशाने बॉम्बस्फोटाचे अनेक चटके सहन केले, इतकंच नव्हे तर त्या दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं, तर काहींनी आपलं घर, यामध्ये आपल्या शरीराचे अवयव गमाविल्यांच्या दुःखाचा तर आपण विचारही करु शकत नाही.

पण अशाच भयावह बॉम्बस्फोटात अपंगत्व मिळूनही नव्याने उभारी घेणारी मालविका आपल्या सगळ्यांसाठीचं प्रेरणादायी आहे.  

बॉम्बस्फोटामध्ये अपंगत्व आलेली मालविका ही आता एक प्रेरणादायी TEDx वक्ता आहे.

ती अपंग व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मदत करते, तसेच जे अपंग लोक कपडे डिझाईन करतात, त्यांच्यासाठी सुद्धा तिने एक सोशल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

 

malvika photo inmarathi

 

तिचा असा विश्वास आहे की, ‘जर तुम्ही मन लावून प्रयत्न केलात तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही साध्य करू शकता’.

मालविकाने त्या बॉम्बस्फोटामध्ये आपले दोन्ही हात गमावले, पण तिने कितीतरी संकटांना सामोरे जात आपले ध्येय साध्य केले.

आपल्याला तिचा अभिमान वाटेल, अशी कार्य तिने केली आहेत. चला तर मग जाणून घेऊया या प्रेरणादायी मुलीची यशस्वी जीवनगाथा…

वयाच्या १३ व्या वर्षी तिच्याबरोबर ही दुर्घटना झाली होती. तिचा जन्म तामिळनाडूमधील कुंबाकोणम येथे झाला.

तिची आई हेमा आणि वडील बी. कृष्णन यांच्याबरोबर नंतर ती बिकानेरमध्ये राहण्यास आली आणि तिथेच लहानाची मोठी झाली. तिच्याबरोबर ती दुर्घटना झाल्यानंतर तिला जवळजवळ दोन वर्ष रुग्णालयात राहावे लागले.

या घटनेमुळे तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता.

 

malvika story imparathi

 

पण ती तिच्या इच्छाशक्तीमुळे पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे ती दुसऱ्यांसाठी एक आदर्श बनली.

मालविका आता २८ वर्षांची आहे, ती खूप शिकलेली देखील आहे.

काही वर्षांपुर्वी तिने एक ट्विट केलं होतं. त्या ट्वीटवर प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांनी प्रतिसाद दिला होता. हे पाहून मालविकाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या ट्विटरवरील पोस्ट खालीलप्रमाणे:

 

Malvika iyer.marathipizza1

Malvika iyer.marathipizza2

Malvika iyer.marathipizza3

 

मालविकाने कोझ्हीकोडेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (IIM) तसेच नॉर्वे, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रेरणादायी भाषण केलं आहे.

चेन्नई मधील NIFT ही अपंगांसाठी असलेली संस्था मालविका चालवते. तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे खूप पुरस्कार देखील मिळाले आहेत.

झालेल्या घटनेनंतर ती त्याचा बळी न ठरता त्यातून सावरून पुढे आली. तिने आपल्या जीवनामधील अपंगत्व एक आव्हान म्हणून स्वीकारले, नक्कीच तिची ही लढाई सोपी नव्हती पण प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे जाण्याची खासियत तिच्यात होती.

त्यामुळे ती आपल्या या परिस्थितीवर रडत न बसता, त्यामधून तिने स्वतःला सावरले आणि त्यामुळे ती एक विजेता म्हणून समोर आली.

मालविकाने ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’ मधून सामाजिक कार्य या विषयात मास्टर्स केलं. तसंच तिने ‘मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क’ मधून ‘एम.फिल’चं शिक्षण घेतलं.

तिने कोणाचीही चिंता न करता स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपले शिक्षण पूर्ण केले.

तिच्या कुटुंबीयांनी सुद्धा तिला या धक्क्यामधून बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिच्या कुटुंबीयांनी तिला साथ दिल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचली. आता मालविका युनायटेड नेशनच्या IANYD वर्किंग ग्रुपची सदस्य आहे.

 

Malvika iyer.marathipizza4jpg
pointblank7.in

 

मालविका हिने आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने एसएसएलसीच्या परीक्षेमध्ये आपल्या राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आणि त्यामुळे तिला राष्ट्रपती भवनमध्ये आमंत्रित केल्या गेले होते.

तिला मिळालेल्या या यशाचे आणि तिच्या या कष्टाचे कौतुक माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील केलं होतं.

 

Malvika iyer.marathipizza5jpg
im.rediff.com

 

दोन्ही हातांनी अपंग असताना देखील मालविका खचली नाही, तिने या संकटावर मात करत आपल्या सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे.

जीवनामध्ये कधीही हार न मानण्याचा तिचा स्वभाव, तिची इच्छाशक्ती आणि जीवन जगण्याची कला तिच्यातले हे गुण खरचं शिकण्यासारखे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?