‘मानवी प्राणीसंग्रहालया’चे हे फोटो माणसाच्या विकृतीची ग्वाही देतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===


प्राणीसंग्रहालय जिथे जंगली प्राणी म्हणजेच सिंह, वाघ, हत्ती, भालू इत्यादी प्राण्यांना पिंजऱ्यात कैद करून ठेवले जाते, जिथे आपण त्यांना बघायला जातो. आज जगात अशी अनेक प्राणीसंग्रहालय आहेत. पण काय कधी तुम्ही माणसांचे प्राणीसंग्रहालय बघितले आहे? हा प्रश्नच मुळात चुकीचा वाटतो नाही का…

आज आपण या २१ व्या शतकात आधुनिक जगात जगत आहोत, जिथे आपण मानवी अधिकारांबद्दल बोलतो. मानवी हक्कांच्याबाबत आज आपण जेवढे जागरूक आहोत, काही काळा आधीपर्यंत तेवढे जागरूक नव्हतो, म्हणून तेव्हा कुणी स्वतःच्या हक्कांबाबत आवाज उठवत नसे. त्यामुळे ज्याच्याकडे सत्ता होती, ज्याच्याकडे शक्ती होती तो अशक्त लोकांवर राज्य करायचा.

१९ व्या शतकात अनेक अमानवीय घटना घडल्या, त्यातीलच एक म्हणजे ‘मानवी प्राणीसंग्रहालय’… १९ व्या शतकात युरोपमध्ये असे अनेक प्राणीसंग्रहालय बनविण्यात आले होते. जिथे माणसांचा बंदी बनवून त्यांना प्रदर्शनी करिता ठेवले जायचे. हे किती अमानवीय असायचे हे तुम्हाला पुढील फोटोज वरून कळेलच…

 

human-zoo-inmarathi09

 

आणि अश्याप्रकारे माणसांची प्रदर्शनी ठेवल्या जायची…

 

human-zoo-inmarathi08

 

या आदिवासींचे हलाखीचे जीवन ह्या बघणाऱ्यांचा कुतूहलाचा विषय वाटतोय, नाही का?

 

human-zoo-inmarathi05

 

या निग्रो आदिवासी आणि प्राण्यांत काहीच फरक नाही???

 

human-zoo-inmarathi07

 

या २० वर्षीय मुलीला पॅरिसच्या मानवी प्राणीसंग्रहालयात आपल्या शरीराचे प्रदर्शन दाखविण्याकरिता ठेवण्यात आले होते. 


 

human-zoo-inmarathi06

 

हे एक संवेदनाहीन कृत्य आहे…

 

human-zoo-inmarathi04

 


या महिलांना बंदी बनवून त्यांना अर्ध नग्नावस्थेत ठेवण्यात आले आहे, ज्यांच्यावर या सभ्य लोकांच्या नजरा आहेत.

 

human-zoo-inmarathi03

 

जर्मनी आणि इग्लंड येथील प्राणीसंग्रहालयात लोकांच्या मनोरंजासाठी या बंदींना नाचावे लागायचे.

 

human-zoo-inmarathi00

 

या चिमुकलीला बंदी बनवून तिला लोकांच्यासमोर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे..

 

human-zoo-inmarathi01

 

हा फोटो ‘ब्रोंक्स जू’चा आहे, जिथे एक आदिवासी चिंपांझीच्या बाळाला घेऊन आहे. 

 

human-zoo-inmarathi

 

मानवी प्राणीसंग्रहालय हे माणसाच्या विकृतीचे सर्वात भयानक उदाहरण आहे.

 

या मानवी प्राणीसंग्रहालयांवर नंतर टीका होण्यास सुरवात झाली, ज्यानंतर मानवी अधिकाराच्या नव्या युगाची सुरवात झाली. त्यानंतर या अमानवीय प्राणीसंग्रहालयांना नेहेमी करिता बंद करण्यात आले.

स्त्रोत : wittyfeed


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?