'योगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण

योगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: प्रविण कुलकर्णी

===

नुकतीच उत्तर प्रदेशातून एक बातमी आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशांसाठी एक वेब पोर्टल सुरु केलं. त्यानुसार सर्व मदरशांना त्यांची माहिती त्यावर टाकावी लागेल. त्यामुळे त्यांना मिळणारं अनुदान, शिक्षक कर्मचारी वर्ग, त्यांचे पगार, मदरशांची चल अचल संपत्ती याची संपूर्ण माहिती सरकारला मिळू शकेल. मिळणारे अनुदान त्याच कारणासाठी खर्च होते आहे का, हे देखील कळू शकेल.

अनेक मदरशातून शिक्षकांना कागदोपत्री पूर्ण पगार दिल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात कमी पगार दिला जातो. अशा मुद्दाम शिल्लक ठेवलेल्या पैशाचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी केला जातो असे आरोप तर पूर्वीपासूनच केले जात आहेत. मदरशांमधून स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनालाही झेंडावंदन करण्यास व राष्ट्रगीत गायले जाण्यासही विरोध केला जात आहे. यामुळे या शंकेला वाव मिळतो. परवा एका मदरशात तर राष्ट्रगीताऐवजी ‘सारे जंहा से अच्छा’ गायलं गेलं. त्या पार्श्वभूमीवर एकूणच मदरशांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यपद्धतीविषयी, आर्थिक व्यवहाराविषयी सरकारला माहिती असणं आवश्यक होऊन बसलं आहे.

madrasas-narathipizza01
newstimenow.com

आम्ही महाविद्यालयात असताना प्रा.वसंतराव मुळे शिकवत होते. तेव्हा त्यांनी एक घटना सांगितली.

चीन मध्ये साम्यवाद आहे आणि साम्यवादी विचारधारा धर्म मानत नाही. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या कार्ल मार्क्सच्या विचारावरच साम्यवाद उभा आहे. मग चीनमध्ये मुसलमानांची काय अवस्था आहे, हे पाहण्यासाठी आपलं एक शिष्टमंडळ तिथे अभ्यास दौऱ्यावर गेलं. तेव्हा त्यांनी मशिदी आणि मदरशांना भेटी दिल्या. मदरशात एक मौलवी मुलांना शिकवत होते हे त्यांनी पाहिलं आणि तेवढ्यावरून त्या शिष्टमंडळाने “चीन मध्ये मुसलमानांना धार्मिक स्वातंत्र्य आहे” असं प्रमाणपत्र देऊन टाकलं.

नंतर असं कळलं की, मौलवी मदरशामध्ये मुलांना कुराण किंवा हादिस नाही तर साम्यवाद शिकवत होते. त्यांच्या हातात साम्यवादाचं पुस्तक होतं.

विसाव्या शतकाच्या शेवटी सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन अनेक देश निर्माण झाले. त्यातील कजाकिस्तान, उझबेकिस्तान (बाबर मूळचा इथलाच) हे मुस्लिम देश असूनही तिथे कट्टर इस्लामी अतिरेकी वादाला थारा नाही. त्याचं कारण सोव्हिएत रशियाच्या काळात मदरशातून दिलं जाणारं शिक्षण हे आहे. तिथे काय शिकवावं हेच सरकारच्या हातात असल्याने देशद्रोही किंवा देशविरोधी शिक्षणाचा अंतर्भाव पाठयपुस्तकात होणे शक्यच नव्हते.

आचार्य गोविंददेव गिरी रामकथा सांगताना कौत्स मुनीची कथा सांगतात. कौत्साला गुरुदक्षिणा देण्यासाठी काही सुवर्णमुद्रांची आवश्यकता असते. म्हणून तो अयोध्येला जातो. त्यावेळचे अयोध्या नरेश रघुराजा त्याचं स्वागत करतात आणि क्षेमकुशल झाल्यावर प्रश्न करतात की –

‘आश्रमात सगळं ठीक आहे ना? गुरुकुलात सध्या कोणते विषय शिकवले जातात?’

आचार्य म्हणतात –

त्याकाळी राजाचं एवढं बारीक लक्ष शिक्षणपद्धतीवर होतं, असणं आवश्यक आहे.

madrasas-narathipizza02
media2.intoday.in

दुर्दैवाने सध्या देशात शैक्षणिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक शिक्षणसंस्था, विद्यापीठातुन चुकीचा, विकृत इतिहास शिकवला जातोय. त्यातूनच कोवळ्या मनांवर वाईट संस्कार होऊन आपण शोषित असल्याची भावना त्यांच्यात बळावते. अल्पसंख्यांकांवर फार अन्याय होतो आहे, त्यासाठी लढा दिला पाहिजे अशा प्रकारे पद्धतशीरपणे मुलांचा ‘ब्रेनवॉश’ केला जातो. अलिगड मुस्लिम विद्यापिठासारख्या संस्था हे त्याचं विशाल रूप आहे. या संस्थांशी संबंधित लोक देशाच्या संवैधानिक सर्वोच्च पदावर विराजमान झाले तरी त्यांना देशात ‘असुरक्षित’ वाटतं. पुढे हीच मुलं नक्षलवादी होतात किंवा अतिरेकी होऊन देशविरोधी कारवायांमध्ये ओढली जातात.

मध्यंतरी मुस्लिम संस्थांकडून मुसलमानांसाठी स्वतंत्र परीक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी पुढे आली होती. पाठ्यपुस्तकं त्यांचीच, शिकवणारे तेच, शिकणारी मुलं त्यांचीच – त्यात सरकारचा हस्तक्षेप नको; ही त्यांची भूमिका आहे. हेच राज्यांतर्गत स्वतंत्र राज्य निर्माण करणं आहे. याची परीणती फुटीरतावादात होते हे वेगळे सांगायला नको.

अशा वेळी योगी सरकारने मदरशांसाठी शैक्षणिक नीती नियमावली तयार करून या विषवल्लीच्या मुळावरच घाव घालण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “योगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण

  • August 30, 2017 at 5:08 am
    Permalink

    महाराष्ट्रातील काही पुरोगामी दहशतवाद्यांना हे पटणार नाही.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?