सुरेश प्रभूंच्या रेल्वेचं मार्कशीट!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपण सगळ्यांनीच नवीन सरकारच्या नव्या रेल्वे मंत्र्यांची जादू एव्हाना ऐकली आणि अनुभवली असेलच.

कुणा प्रवाश्याचं अचानक उद्भवलेलं आजारपण असो की कुणाच्या सामानाची चोरी.
कुणाची रेल्वे-बद्दलची तक्रार असो वा कुणाची आपल्या लेकरांच्यासाठीची काळजी – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सरांनी रेल्वेच्या सोयीपासून ते प्रतिसादाच्या कार्यक्षमतेत आमुलाग्र बदल घडवले आहेत. आजकाल नागरिकांना सुरेश सर एकच tweet लांब असल्यासारखे आहेत.

Suresh-Prabhu-marathipizza

 

तर दोन वर्षानंतर मूल्यमापन चाचणी होतांना प्रभूंनी केलेले छोटेसे उपाय आणि बदल कसे फळ देतायत ते बघुया.

 

१) एकूण 2828 किमी ब्रॉड गेज रेल्वे रूळ टाकून २००९-२०१४ सालच्या पेक्षा ८५% जास्त काम केलं आहे. २००९-२०१४ साली कामाचा वेग प्रतिदिन ४.३ किमी होता जो ह्या दोन वर्षात प्रतिदिन ७.७ किमी झाला आहे.

२) २०१६-१७ सालचा भांडवली खर्च मागील पाच वर्षांच्या भांडवली खर्चाच्या जवळजवळ दुप्पट म्हणजेच रु ९४,००० कोटी आहे.

३) गेल्या पाच वर्षाच्या मानाने एकूण विद्युतीकरणाच्या कामात ह्या दोन वर्षात खूप मोठी झेप घेतली आहे. मागील पाच वर्षात सरासरी ११८४ किमी काम झालंय तर ह्या वर्षी १७३० किमी च काम एका वर्षात झालंय.

 

indian-railways-marathipizza 01

 

४) सोशल मिडिया वापरून २४ तासांसाठी सुसज्ज अशी तक्रार निवारण यंत्रणा तयार केली आहे जी प्रत्येक तक्रारीवर काम करेल.

५) रेल्वेच्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ रेल्वे’, Clean my Coach Service, रेल्वे स्टेशन साठी cleanliness audits अश्याप्रकारे उपाय केले आहेत.

६) केटरिंग, wheelchair, bedroll सारख्या सोयी ‘E’ करून त्यांचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता यावा ह्याकडे खास लक्ष दिल आहे.

indian-railways-marathipizza 02

 

७) भारताची पहिली सेमी-हायस्पीड ट्रेन – “गतीमान एक्स्प्रेस” धावू लागली आहे.

८) अनेक स्थानकांवर हाय-स्पीड इन्टरनेट पुरवलं जात आहे. २०१८ पर्यंत ही सेवा ४०० स्थानकांवर सुरू करण्याचं लक्ष्य आहे.

९) पारदर्शक आणि जबाबदार अशी “ई-टेंडरिंग” व्यवस्था सुरू झाली आहे. ह्यामुळे कामाची गती आणि विश्वासार्हता वाढली आहे.

थोडक्यात काय – संथ आणि कंटाळवाणी भारतीय रेल्वे आता एकदम ‘गतिमान’ आणि interesting होतीये असं दिसतंय.

गुड गोइंग मिस्टर प्रभू ! 🙂

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 50 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?