'राम रहीम, खट्टर, साक्षी महाराज...देवा...माझ्या देशाला वाचव रे बाबा...!

राम रहीम, खट्टर, साक्षी महाराज…देवा…माझ्या देशाला वाचव रे बाबा…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: हर्षद बर्वे

===

खट्टर सरकार गेल्या तीन वर्षांत हरियाणात सपशेल फेल झालेले आहे. या तीन वर्षांत तीन मोठी तथाकथित आंदोलने झाली आणि त्यात ज्यांना अपयश आले. रामपाल नावाचे स्वयंभु संत आहेत ज्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. अटक होऊ नये म्हणून हजारो लोक एकत्र आले आणि शेवटी जवळपास वीस हजार जवान लागले कारवाई पूर्ण करायला. पाच महिला आणि एका बालकाचा जीव गेला.

दहा दिवस जाट आंदोलन झाले. कडी निंदा यापलीकडे दहा दिवस काही झाले नाही. अंदाजे पंचवीस हजार ते चौतीस हजार कोटींचा प्रॉपर्टी लॉस झाला. दहा दिवस नंगानाच सुरू होता, तीस लोकांचे जीव गेले.

काल पण हेच झाले. कडक सुरक्षा अपेक्षित असतांना आणि आधीचे असफलतेचे अनुभव गाठीशी असतांना इंटेनजन्सने सांगून देखील खट्टर साहेबांनी लष्कराला पाचारण केलंच नाही. हातात दंडुके घेऊन असलेले पोलीस आणि निमलष्कर दल निष्प्रभ झाले. लष्कराला पाचारण करावेच लागले. पहिलेच हे पाऊल उचलले असते तर कदाचित चाळीस लोकांचे जीव गेले नसते आणि अंदाजे हजार करोडची प्रॉपर्टी वाचली असती.

panchkula-marathipizza
ndtvimg.com

पंजाब आणि हरियाणात सच्चा डेराचे अनेक समर्थक आहेत. राम रहीमचे समर्थन भाजपने देखील मिळवले आणि अंदाजे बारा जागांवर त्यांना राम रहीमने विजय मिळवून दिला. हे समर्थन मिळवतांना राम रहीमवर हत्या, रेप आणि लोकांना नपुंसक बनवण्याचे आरोप आहेत हे भाजप सोयीस्कररीत्या विसरले. काँग्रेसचा सपोर्ट काढून भाजपला सपोर्ट दिल्याबद्दल भाजपने राम रहीमचे व्यवस्थित आदरातिथ्य केलं आहे. हरियाणाचे शिक्षण मंत्री राम विलास शर्मा यांनी राम रहीमला त्यांच्या वाढदिवसाला टॅक्स पेयर्सच्या खिश्यातून त्यांना न विचारता एक्कावन्न लाखांची देणगी जाहीर केली. त्याच वेळी क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी पन्नास लाख, मनीष ग्रोव्हर यांनी अकरा लाख आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी तीस लाखांची देणगी दिली. या देणग्या किम प्रित्यर्थ होत्या हे कोणीही सांगायला तयार नाही किंवा भाजप समर्थक याचा विरोध देखील करत नाही.

साक्षी महाराज नावाचे एक खासदार आहेत. खासदार आहेत म्हणजे संसदेत बसत असणार. त्याच संसदेत जिथे कायदा बनतो, त्याच संसदेच्या पायथ्यावर राष्ट्रऋषी डोके ठेवतात. यांचे म्हणणे आहे की लाखो अनुयायी लोकांचे कोर्ट ऐकत नाही पण तक्रारदाराचे मात्र ऐकले. त्यामुळे हिंसेला कोर्ट जवाबदार आहे. अरविंद केजरीवालच्या जीभेच्या ऑपरेशनच्या वेळी अनेकांनी आता कशी बोलती बंद झाली अश्या अनेक नर्मविनोदी पोस्ट टाकल्या होत्या. यांच्या जिभेचे काय करावे ?

दुदैव हे की काल भाजपने या व्यक्तव्याचा साधा निषेध ही केला नाही.

असे सगळे असतांना पार्टी विथ डिफ्रन्स उरतोच कुठे? खट्टरचा/अमरीनंदरचा राजीनामा मागण्या ऐवजी ८४ ची दंगल, २००२चे गोध्रा याचे आकडे फेकण्यात येतात. नॅशनल टीव्हीवर लोक बरळून जातता. नेहरूंनी गांधींनी या देशाची वाट कशी लावली याचे पुरावे देण्यात येतात जणू काही आधीचे सर्व प्राईम मिनिस्टर ( अटलजी सोडून ) तुमच्या मानेवर चाकू लावूनच निवडण्यात आले होते. यात काँग्रेसही मागे नाही. सत्ताधारी पक्षाच्या चुका शोधण्यात तिकडे पंजाब भडकतोय हे साफ विसरून टीका टिप्पणी सुरू आहे. समाज आणि देश म्हणून आपण नेमके कुठे जातोय याचा अंदाज मला तरी लागत नाही आहे. ज्या साध्वीवर अत्याचार झालेत, ज्यांना कोर्ट न्याय देणार आहे त्यांच्या मागे मात्र एकही नेता या देशात उभा नाही. ना राहुलजी ना नरेंद्र मोदी. एकाही नेत्याने त्यांच्या फेव्हर मध्ये ट्विट केल्याचे ऐकवत नाही.

२०२२ साली हे असले राजकारणी आपल्याला महासत्ता बनवणार. यात सर्व राजकारणी आलेत. एकीकडे आधीच्या लोकांनी काय केले याचे गळे काढत बसायचे आणि दुसरीकडे महासत्तेच्या आरत्या. एक पैर भूत पे और एक पैर भविष्य पे, इसिलीये हम वर्तमान पे लघुशंका करते है.

ram-rahim-marathipizza00

देश सध्या एका विचित्र ट्रान्झिशन मध्ये आहे. एकही विरोधी पक्ष सबळ नाही. बाबा, साधू संसदेत आहेत, चित्रविचित्र विधाने येतात आहेत. गाय नावाच्या पशूला आम्ही देवाचा दर्जा देऊन बसलो आहे. महाराष्ट्र सरकारचा विद्यविभूषित आणि हायली डेकोरेटेड न्यायाधीशावर भरवसा नाही. राजधर्मापेक्षा धर्मसत्ता मोठी आहेत असे स्टेटमेंट केले जाते. काँग्रेस साधी फिंगर प्रिंट्स सरकारकडे असावी की नाही यावर वाद घालतो आहे.

सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो कोणी बोलेल तो सध्या देशद्रोही ठरतोय. मग ते राऊत असो वा कुबेर. या अश्या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाची जवाबदारी शंभरपट वाढते. खट्टर, साक्षी सारख्या लोकांना आवरून, वेळेच बाजूला करून नवा पायंडा त्यांना घालता येणार आहे आणि हे गरजेचे देखील आहे. सध्या विरोधी पक्षात असलेले नेतृत्व चुकीने जरी या देशाचे पंतप्रधान झाले तर मॉडर्न भारताचा इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाहीत. अटलजींची सर्व चांगली कामे शेवटच्या बारा महिन्यात अनडन झाली होती. मोदींकडे अजूनही २१, महिने आहेतच. जो दिसत नाही त्यालाच अंडरकरंट म्हणतात.

गॉड सेव्ह माय नेशन

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?