एक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

‘डब्लूडब्लूई’ हा असा शो आहे जो जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील बहुतेक तरुणांचा हा आवडता शो आहे. या मधील रेसलिंग पाहून तरुणांमध्ये वेगळाच जोश निर्माण होतो. या शोमधील सुपरस्टार जेव्हा एकमेकांशी भिडतात, ते पाहण्याची मजा काही वेगळीच असते. या नावजलेल्या शोमधील रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन हा सर्वांचाच आवडता असा खेळाडू आहे. ४५ वर्षाच्या या रेसलरने आता हॉलीवुडमध्ये आपले पाय जमवले आहेत. यादरम्यान त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अश्या या आपल्या लाडक्या रॉक विषयी आज आम्ही आपल्यासाठी एकही अशा गोष्टी घेऊन आलो आहोत ज्या वाचून तुम्हलाही आश्चर्य होईल.

The rock.marathipizza
sciencefiction.com

१. फास्ट अँड फ्युरीयसमधील रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन याने केलेला रोल हा त्याच्यासाठी लिहिण्यात आलेला नव्हता. हा रोल टॉमी ली जोन्सला लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सनुसार हा रोल एका वृध्द व्यक्तीसाठी लिहिण्यात आला होता, पण फास्ट फाइव्हमध्ये लुक हॉब्सने त्या रोलच्या विरुद्ध पात्र समोर आणले. लोकांना हे पात्र खूप आवडल्याने ड्वेन जॉन्सनला फास्ट अँड फ्युरीयसच्या पुढील भागांमध्ये सुद्धा रोल मिळाला.

२. तीन मिनिटांमध्ये १०५ सेल्फिंचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम ड्वेन जॉन्सनने केला. सॅन अॅनड्रेसच्या प्रिमियरवेळी त्याने हा रेकॉर्ड केला होता. २००२ मध्ये त्याने ‘द स्कॉर्पियन किंग’ या चित्रपटासाठी ५.५ मिलियन डॉलर एवढे मानधन घेतले होते. यामध्ये त्याने लीड रोल केला होता. सर्वात पहिल्यांदा लीड रोल करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ड्वेन जॉन्सन हाच सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला.

३. २००० मध्ये सॅटरडे नाइट लाइव्ह यांनी रेसलिंग सेलिब्रिटी ड्वेन जॉन्सन याला हा शो होस्ट करण्यास सांगितले आणि तिथूनच त्याच्या हॉलीवुडमधील करीयरची सुरुवात झाली.

The rock.marathipizza1
mshcdn.com

४. ड्वेन जॉन्सन याला फुटबॉल हा खेळ खूप आवडत असे. त्याला खूप मोठा स्टार फुटबॉलपटू व्हायचे होते. १९९१ मधील नॅशनल चॅम्पियन्स संघामध्ये तो खेळला देखील होता. त्याच्या शालेय जीवनामध्ये तो खूप फुटबॉल खेळायचा.

५. १९९८ मध्ये द रॉक म्हणजेच ड्वेन जॉन्सन याने पहिल्यांदा डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियनशिप जिंकली, त्यावेळी त्याचे वय फक्त २६ वर्ष होते. त्यावेळी तो सर्वात तरुण डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियन झाला. त्याने वयाच्या ३० वर्षापर्यंत ६ वेळा डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याचा हा रेकॉर्ड २००२ पर्यंत कायम होता, २००२ मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ब्रॉक लेसनरने ही डब्ल्यूडब्ल्यूएफ चॅम्पियनशिप जिंकली आणि तो सर्वात तरुण चॅम्पियन झाला.

The rock.marathipizza2
businessinsider.com

६. ड्वेन जॉन्सन याला स्टार ट्रेक: व्हॉयेजरमधील द पेंडीर चॅम्पियनच्या भूमिकेने आपल्या करियरमध्ये पुढे जाण्यास मदत केली. यामध्ये त्याने एका रेसलरचीच भूमिका निभावली आहे.

७. ड्वेन जॉन्सनचे वडील आणि त्याचे आजोबा हे सुद्धा रेसलर होते. त्याचे कुटुंब हे रेसलिंगमध्ये यशस्वी झालेल्या कुटुंबापैकी एक कुटुंब आहे. about.com नुसार त्याच्या कुटुंबामधील पाच सदस्य हे डब्ल्यूडब्ल्यूईचे हॉल ऑफ फेम आहेत. त्यांचे स्वतःचे रेसलिंग स्कूल सुद्धा आहेत. ज्यामधून डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार बतिष्टाने प्रशिक्षण घेतलेले आहे.

The rock.marathipizza3
.whatculture.com

८. ड्वेन जॉन्सन याला पुस्तके लिहिण्याचा देखील छंद आहे. २००२ मध्ये त्याने लिहिलेले ‘द रॉक सेज’ हे पुस्तक खूप विकले गेले होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीमध्ये हे पुस्तक पहिल्या नंबरला होते.

एक फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या रॉकचा रेसलर ते हॉलिवूड अभिनेता पर्यंत झालेला प्रवास खरचं अतिशय रंजक आहे…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?