सभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आपल्या आयुष्यात सकारात्मकता किती आवश्क आहे हे आपण सर्व लोक जाणतोच. पण त्यासारखंच, आपण negativity पासुन दुर राहायला हवं. नकारात्मक गोष्टी आपली energy झपाट्याने कमी करतात. उत्साह संपवतात.
आपल्या जीवनात, आपल्या सभोवताली घडत असलेल्या चांगल्या घटनांतून सुख, समाधान, प्रेरणा मिळवायची असेल तर negative factors पासून दूर जाणं अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या सभोवतालच्या अशाच 5 गोष्टींची ही यादी…5 अश्या नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात.
1 – लोक काय म्हणतील
हा आहे सगळ्यात मोठ्ठा अडथळा, आपण ह्या गोष्टींचा खुप विचार करतो. त्यामुळे आपल्या आवडी निवडी, आपला interest लपवत फिरतो. त्याने होतं काय? आपण आतल्या आत घुसमटत राहतो…! उपयोग मात्र शून्य. लोक शेवटी चुका काढणारच. त्यामुळे लोकांना खुश करण्याच्या प्रेशरमध्ये राहण्याचा काही उपयोग नाही!
2 – वातावरण
ह्यात सगळंच वातावरण आलं. जिथं आपण राहतो, काम करतो, फिरायला जातो. वातावरणामुळे आपल्यावर कळत नकळत positive-negative संस्कार होत असतात. आणि त्यातून आपण घडत जातो. आपण नकारत्मक वातावरणात अडकलो तर “पुढे” जाण्याची प्रक्रियाच बंद पडते. आपली वैचारिक प्रगती खुंटते – आणि मग – डबक्यात राहुन बेडकाने समुद्राचे स्वप्न पाहील्या सारखं होत राहतं.
3 – वाढतं tech-फॅड
Tech फॅड मुळे आपण आळशी होत आहोत. जिनक्रम बदलतोय. झोप तर इतकी सावध झालीय की टुंग वाजलं की जागा. ह्याने झोप अपुरी होतीये, आत्मशांती हरवतीये आणि नकारात्मकता वाढते.
4 – अपेक्षांच ओझं
“बचपन से ब्राइट स्टुडंट था, मां बाप को लगा ये अपनी गरीबी मिटाएगा…प्रेशर बढता गया – और मार्क्स घटते गये” खरं बोल्लाय शर्मन ईडीयटस् मध्ये.
आपण एकीकडे विशाल समुद्रात उतरायची स्वप्नं बघत असतो आणि ह्या अपेक्षा पायातली बेडी होऊन अडकवुन बसतात.
5 – दृष्टीकोण
कुणी point of view म्हणतं तर कुणी attitude. गोष्ट एकंच. कधी आपण दुरुन डोंगर साजिरे म्हणत लांबच थांबतो तर कधी डोंगराला underestimate करतो. परिस्थितीचा आढावा नं घेणारा दृष्टीकोण narrow-minded बनवतो तर समोरच्याला तुच्छ लेखणारा दृष्टीकोण नकारात्मकता वाढवतो.
तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांना बजावुन सांगा :
“दुऽर हो जाओ मुझसे…You are not allowed”
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Mastch re abhiii……. (y)
Excellent Information & Truth