' अमेरिकेबद्दल तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या १४ गोष्टी! वाचा

अमेरिकेबद्दल तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या १४ गोष्टी! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अमेरिका म्हणजे आजच्या घडीतील जागतिक महासत्ता होय. संरक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान प्रत्येकच बाबतीत हा देश जगातील सर्वच देशांपेक्षा सरस आहे. आज प्रत्येक क्षेत्रावर या देशाचे वर्चस्व आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून अमेरिकन राष्ट्रपतींची ओळख असते, यातच सारं काही आलं.

या अमेरिकेबद्दल तसं पाहता बहुतेक गोष्टी आपल्याला माहित असतात. पण मंडळी अश्याही काही गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्या कानी पडलेल्या नाहीत. यातील बहुतांश गोष्टी या रंजक आणि विस्मयकारक आहेत, चला तर जाणून घेऊयात काय आहेत त्या गोष्टी!

 

१) १९३० मध्ये आर्थिक मंदीमुळे हजारो अमेरिकन नागरिक सोव्हीएत संघात गेले होते.

 

america-fact-marathipizza01

 

२) १८६७ मध्ये अमेरिका देशाने रशियाकडून अलास्का हा प्रांत केवळ ७.२ मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता.

 

america-fact-marathipizza02

 

३) १९६२ मध्ये अमेरिकेने आकाशात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला होता. तो हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा १०० पटीने अधिक शक्तीशाली होता.

 

america-fact-marathipizza03

 

४) अमेरिकेत २० ते ३० च्या दशकात मद्यपानावर बंदी घातली होती. त्यावेळी विषारी औषधांमुळे १०,००० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

 

america-fact-marathipizza04

हे ही वाचा – अभिमानास्पद: नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये ‘भारतीय वैज्ञानिकाचा’ मोलाचा वाटा

५)  अमेरिकेतील मंडळी भरपूर जंक फूड खातात, हे तुम्हाला माहित असेलच. पण संपूर्ण अमेरिकेत मिळून किती जंक फूड खाल्लं जात असेल, हे ठाऊक आहे का?

हे पिझ्झाचं उदाहरण पहा. अमेरिकेत दररोज १०० एकर जमिनीच्या क्षेत्रफळा एवढे पिझ्झा खाल्ले जातात.

 

america-fact-marathipizza05

 

६) अमेरिकेत मुलांना जन्म देणाऱ्या जवळपास ४०% माता अविवाहीत आहेत.

म्हणजेच कुमारी माता होण्याचे प्रमाण अमेरिकेत फार जास्त आहे.

 

america-facts-inmarathi

 

७) अमेरिकेत मद्यपानकरून ड्रायव्हींग केल्याने दर तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

 

america-fact-marathipizza07

 

८) चिकन हे सुद्धा अमेरिकेतील मुख्य खाद्यांपैकी एक आहे. अमेरिकन्स आवडीने चिकनवर ताव मारतात.

एका सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार अमेरिकेचे नागरिक दरवर्षी ८ अब्ज रुपयांचे चिकन खातात.

 

america-fact-marathipizza08

 

९) सातत्याने नोकरी बदलण्याचा काळ सध्या सगळीकडेच दिसतो. निवृत्त होईपर्यंत एकाच ठिकाणी काम करणं हल्लीच्या तरुणांना आवडत नाहीच.

अमेरिकेत तर कर्मचारी सरासरी आवडघी ४.४ वर्ष एका नोकरीत टिकून असतात.

 

america-fact-marathipizza09

हे ही वाचा – “खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव

१०) नियमित स्वच्छतेसाठी अंघोळ अत्यंत महत्त्वाची असते. पण,

एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत रोज सुमारे ७ टक्के नागरिक आंघोळ करत नाहीत.

 

america-fact-marathipizza10

 

११) एका अंदाजानुसार अमेरिकेत धुम्रपानामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० नागरिकांचा मृत्यू होतो.

 

america-fact-marathipizza012jpg

 

१२) स्वच्छतागृह व्यवस्थित असणे आवश्यक असते. अमेरिकन्स या बाबतीत फारच जागरूक असल्याचं दिसून येतं.

अमेरिकन नागरिक टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी दररोज पाच सेन्ट्स इतका पैसा खर्च करतात.

 

america-fact-marathipizza13

 

१३) अमेरिकेतील लोकांचा सुद्धा पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास आहे बरं का मंडळी…

अमेरिकेत २५ टक्के अल्पवयीन मुले पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात.

 

america-fact-marathipizza14

 

१४) एक अमेरिकन व्यक्ती केनिया मधील ३२ नागरिकांना जगण्यास पुरेल एवढ्या साधनसंपत्तीचा वापर करतो.

 

america-fact-marathipizza15

 

तर अमेरिकेत घडणाऱ्या या काही गोष्टी आहेत, ज्या सहसा आपल्याला ठाऊक नसतात…

काय?…. वाचून बसला ना आश्चर्याचा धक्का!!! 

===

हे ही वाचा – अमेरिकेतील या भारतीय दाम्पत्याच्या श्रीमंतीचा संपूर्ण अमेरिका हेवा करत असेल…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?