नक्की वापरुन बघा, सहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या या ‘१०’ मजेशीर ट्रिक्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्याच्या युगामध्ये माणसांना एकवेळ जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण मोबईल आणि इंटरनेट या गोष्टी हव्याच असतात. त्या त्यांच्या जीवनातील मुलभूत घटक आहेत.
“गुगल” सुद्धा माणसाची एक जीवनरेखा बनलेलं आहे. माणसाला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल किंवा काही जाणून घ्यायचं असेल तर तो दुसरा कसलाही विचार न करता त्या गोष्टीची माहिती गुगलवर सर्च करतो आणि गुगलसुद्धा त्याबद्दल आपल्याला योग्य ती माहिती शोधून देतं.
यावरून आपण कल्पनाही करू शकत नाही की, जर गुगल नसतं तर आपण आपल्याला हवी ती माहिती कुठून आणि कशी काय मिळवली असती. आरोग्याविषयी काही समस्या असो किंवा जीवनाविषयी काही समस्या असो आपल्या सगळ्या समस्यांचे निवारण या ठिकाणी केलं जातं
आपल्यातील बहुतेक लोकांना हे माहित नसेल की, गुगल हे फक्त एक सर्च इंजिन नसून अजून बरंच काही आहे. जर आपल्याला गुगलमध्ये लपलेल्या रंजक गोष्टी कळल्या तर आपल्यासाठी गुगल हे एक मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज आहे. चला मग जाणून घेऊया गुगलमध्ये कोणत्या रंजक गोष्टी लपलेल्या आहेत…
–
हे ही वाचा – एकेकाळी अडगळीच्या खोलीत सुरू झालेल्या या कंपन्या आज करत आहेत कोट्यवधींची उलाढाल!
१. बॅरेल रोल…
गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Do a barrel roll” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर तुमची स्क्रीन वर्तुळाकार गोल फिरेल.
२. द अटरी ब्रेकआउट गेम
जर तुम्ही खूप कंटाळलेले असाल आणि तुम्हाला काही मनोरंजक खेळ खेळायचे असतील तर तुम्ही गुगलचा अटरी ब्रेकआउट हा गेम खेळू शकता. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये तुम्ही “Atari breakout” हे वाक्य टाईप करून एन्टर केल्यानंतर जी सर्वात पहिली प्रतिमा येईल त्यावर क्लिक केल्यानंतर हा गेम सुरू होतो.
३. गुगलच्या क्षेत्राशी काही प्रयोग करू इच्छित असाल तर…
आपल्यातील बहुतेकांना हे माहित नसेल, गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याच्या सर्च बॉक्समध्ये “Google Sphere” हे टाकून झाल्यानंतर लगेच एन्टर न करता, त्याच्याच खाली दिलेल्या “I’m feeling lucky” वर क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण स्क्रीन गोलाकार आकार बनवेल. हे खूप अप्रतिम दिसतं.
४. फिल्प क्वाइन
आपल्याला जर टॉस करायचा असेल तर आपण गुगलच्या फिल्प क्वाइन या ट्रिकचा वापर करू शकतो. त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर त्याठिकाणी दिलेल्या माइक वर क्लिक करून “फ्लिप क्वाइन” असे बोलावं.
–
हे ही वाचा – आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर!
५. गुगल ग्रॅव्हीटी
हे अजून एक वेळ घालवण्यासाठी वेगळे वैशिष्ट्य गुगलने दिले आहे. त्यासाठी गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर “Google Gravity” असे टाइप करावे आणि “I’m feeling lucky” वर क्लिक करावे, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरील भागांचे तुकडे इकडे – तिकडे उडताना दिसतील.
–
हे ही वाचा – आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर!
६. फक्त चेहरा
या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या फोटोमधील फक्त त्यांचे चेहरे पाहायचे असल्यास पाहू शकता.
याचा वापर तुम्ही फोटो सर्च मारल्यानंतर प्रतिमा विभागामध्ये गेल्यानंतर सॉर्टिंगसाठी तुम्हाला खूप पर्याय दिलेले असतात, त्यासाठी डावीकडील टूल्स या पर्यायामध्ये जावे.
७. मेलीझा
गुगलच्या या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला एलियनशी गप्पा मारता येतील, म्हणजे तसं भासवलं जातं. Google Earth 5 या वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये “Meliza” टाइप करा आणि आतमध्ये जा.
८. टाइमर सेट करा
या वैशिष्ट्याचा उपयोग टाइमर सेट करण्यासाठी होतो. त्यासाठी फक्त सर्च बॉक्समध्ये “Set timer for 5 minutes” टाइप करा आणि जादू बघा.
९. लहान मुलांना प्राण्यांचे आवाज ऐकावा
हे गुगलच वैशिष्ट्य कदाचित तुम्हाला माहित नसेल. फक्त सर्च बॉक्समध्ये “Cat noises” टाइप करा आणि एन्टर करा. त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू शकता.
१०. प्ले पॅक मॅन
हा पॅक मॅन नावाचा गेम खेळण्यासाठी सर्च बॉक्समध्ये “Pac-Man” टाइप करा आणि एन्टर करा आणि त्यानंतर तुम्ही हा मनोरंजक गेम खेळू शकता.
उत्सुकता असेल तर ह्या ट्रिक तुम्ही नक्की करून पहा…
===
हे ही वाचा – गुगल डुडल्स कोण तयार करतं? ह्याची सुरवात कशी झाली?? जाणून घ्या रंजक माहिती!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.