' प्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० "भारतीय शोध"..!

प्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारताच्या प्राचीन त्वतेचे जेवढे दाखले द्यावेत तेवढे कमीच आहेत. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही, कारण तसे पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत. या प्राचीन भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या हे देखील तितकेच खरे.

तेव्हाची संस्कृती ही त्या काळाच्या मानाने अधिक प्रगत आणि ज्ञानी होती आणि त्यांनी लावलेले काही शोध आपण आजही वापरतो यावरूनच त्यांच्या श्रेष्ठतेची कल्पना करता येते.

शुन्य, संस्कृत, साप-शिडीचा खेळ, रेडिओ आणि वायरलेस संचार सेवा, फ्लश टॉयलेट, गणिताची पट्टी आदी शोध प्राचिन भारतात लावण्यात आले होते.

परंतु, पण दुर्दैवाने काळाच्या ओघात ते हरवून गेले आणि आज तेच शोध जणू पाश्चिमात्यांनी लावले आहेत असा एक गोड गैरसमज आपल्या तरुण पिढीच्या मनात आहे. तोच दुर करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर त्या प्राचीन शोधांची माहिती मांडत आहोत जे भारतीय लोकांनी लावले होते.

 

नैसर्गिक रेशम…

natural-silk-marathipizza
devereyarns.co.uk

लोकर, खादी याप्रमाणेच नैसर्गिक रेशम सर्वात आधी भारतात शोधण्यात आले. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहत असलेले लोक खादीचा वापर करीत असत. त्यांच्याजवळ नैसर्गिक पद्धतीने रेशम मिळवण्याचे तंत्रज्ञान होते. प्राचीन भारतात याचा वापर करण्यात येत होता. तसेच निर्यातही केली जात असे. याप्रमाणेच चांगली लोकर प्रथम जम्मू-काश्मीरमध्ये बनविण्यात आली होती.

 

क्रूसिबल स्टील…

steel-maarathipizza
straightrazorplace.com

उच्च गुणवत्ता असलेले स्टील प्राचीन भारतातील दक्षिणेकडील भागांत तयार केले जात असे. ज्या पद्धतीने हे स्टील तयार केले जात होते त्याच पद्धतीने क्रूसिबल तंत्रज्ञानाचा वापर करून स्टील घडविण्यात येते. याअंतर्गत शुद्ध लोखंड वितळवून एका कंटेनरमध्ये काच आणि लाकडांसोबत ठेवले जाई. त्यानंतर शुद्ध स्टील बनत असे.

 

बंदर…

port-marathipizza
thehindubusinessline.com

भारत पहिला असा देश आहे, जेथे इसवीसन पूर्व २००४ मध्ये समुद्र किनाऱ्यांवर बंदर होते. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी लोथलमध्ये पहिले बंदर उभारले होते. त्यासाठी त्या काळातील अत्याधुनिक समुद्र विज्ञान आणि इंजिनिअरिंगचा वापर करण्यात आला होता. समुद्राच्या लाटा आणि हायड्रोग्राफीचे ज्ञान वापरून हे बंदर बांधण्यात आले होते.

 

कापूस कातणारा चरखा…

spinning-wheel-marathipizza
etsystatic.com

कापूस कातण्याचा चरखा, ज्याला कापूस जिन म्हटले जाते, यात कापसाच्या बोंडातून बिज काढले जाते. अजिंठा आणि वेरूळ येथील गुफांमध्ये मिळालेल्या पुराव्यांवरून इसवीसन पूर्व ५०० मध्ये हाताने चालविण्यात येणाऱ्या या मशिनला तेव्हाही चरखाच म्हटले जात असे. कालानुरूप या मशिनमध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे चांगल्या खादीचे विदेशात निर्यात केले जात असे.

 

शाम्पू…

shampoo-marathipizza
tqn.com

शाम्पूचा शोध भारतात पहिल्यांदा लावण्यात आला होता. त्याला आधी चांपो म्हटले जायचे. १७६२ च्या जवळपास मुघलकालीन शासनकालामध्ये बंगालच्या नवाबांनी याचा उपयोग केला होता. तेव्हा डोक्याची मालिश करण्यासाठी याचा तेलाच्या रुपात उपयोग केला जायचा. त्याचेही काही प्रकार होते.

 

हिरा…

diomond-marathipizza
americangemsociety.org

दागिन्यांमध्ये वापरला जाणार हिरा पहिल्यांदा भारतीय खाणींमध्ये सापडला होता. मध्य भारतात हिऱ्यांचे मोठे भंडार सापडले आहे. १८ व्या शतकात भारत एकमेव देश होता जेथे हिरा सापडला होता. त्यानंतर भारताने हिऱ्याची निर्यातही सुरू केली होती. यासोबतच प्राचीन भारतीयांना हिऱ्याची उपयोगीता, हिरा कापण्याची क्षमता आणि चमक टिकवून ठेवण्याचे तंत्रज्ञान अवगत होते.

 

बुध्दिबळ…

chess-marathipizza
atlasobscura.com

चतुरंगा नंतर बुद्धिबळाचा शोध लावण्यात आला होता. गुप्त वंशकाळात ६ व्या शतकाच्या जवळपास भारतात याचा शोध लावण्यात आला. प्राचिन काळापासून हा खेळ खेळला जात होता.

 

शाई…

ink-marathipizza
wonderopolis.org

शाई ही लिखाणासाठी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. याचा शोध भारतात लावण्यात आला होता. प्राचीन भारतातील पांडुलिपिमध्ये काळ्या रंगाची शाई वापरली जात असे. जळालेली राळ, चारकोल, हाडे आणि कार्बन यांच्या मिश्रणातून शाईची निर्मिती होत असे.

 

सर्जरी…

surggery-marathipizza
wikimedia.org

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी प्रथम भारतात करण्यात आली, याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन चिकित्सक सुश्रुत यांनी पहिल्यांदा अशी सर्जरी केली होती. त्यांनी वापरलेल्या पद्धतीचे अरेबिक भाषेत भाषांतर करण्यात आले. त्यानंतर ती युरोपमध्ये गेली. त्यांनी एका गोल सुईचा वापर करीत मोतिबिंदू काढला होता.

 

बटण…

button-marathipizza
4.imimg.com

शर्ट-पॅण्ट आणि इतरही कपड्यांमध्ये बटण लावलेले असतात, आता तर त्याला एक फॅशन एक्सेसरी म्हणून देखील वापरली जाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की बटणचा शोध प्रथम भारतात लावण्यात आला. याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.

सिंधू नदीच्या खोऱ्यात बटण वापरत असलेले लोक राहत होते. शिंपल्यांना वेगवेगळे आकार देऊन त्यात छिद्र करण्यात येत होते. लवकरच त्यात बदल झाला. त्याच्या डिझाईनमध्ये सुधारणाही करण्यात आल्या होत्या.

झाला ना आता गैरसमज दूर? हे पाश्चिमात्यांचे नाहीत, तर आपल्या पूर्वजांचे शोध आहेत!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “प्राचीन भारतात लागलेले पण पाश्चिमात्यांच्या नावे खपवले जाणारे १० “भारतीय शोध”..!

  • August 24, 2017 at 6:13 pm
    Permalink

    krupaya thos purave asalyashivay ashi mahiti faku naka.shampoo surfactant base asto to telat vaparalach jau shakat nahi else it will dry off the skin and remove excessive lipids.another thing shampoo cha shodh yababat thod purave asatil tarch ithe taka else khoti mahiti puravun website famous karnyachya cheap trick madhe aamhi he samaju va pudhil post cheap tricks samajun vachalya janar nahit!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?