' जन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’! – InMarathi

जन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज हास्यजगत खूप पुढारलेलं आहे. एक प्रोफेशन म्हणून आज हास्य जगताकडे पाहिलं जातं. लोकांना हसवण्याचा धंदा करत स्वत: यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आज जगभरात आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्याच देशातील कपिल शर्माचं उदाहरण घ्या ना. एवढंच काय मराठमोठ्या निलेश साबळे आणी त्याच्या टीमकडे पहा. लोकांना पोटधरून हसायला लावण्याचे कसब त्यांच्याकडे आहे आणि याचं प्रतिभेने त्यांना प्रसिद्ध केले आहे.

 

kapil sharma show InMarathi

 

पण पूर्वीच्या काळी कॉमेडी वगैरे करून करियर सोडा साधं पोट भरणं देखील मुश्कील होतं, अश्या वेळेस एका व्यक्तीने कॉमेडीलाच आपलं जीवन अर्पण करून हे शिवधनुष्य उचललं आणि संपूर्ण विश्वातील लोकांना हसवण्याचा वसा घेतला.

कोणतेही अश्लील हावभाव नाहीत, कोणताही संवाद नाही निव्वळ मूक हास्य अभिनय! तो व्यक्ती म्हणजे ज्याला आधुनिक हास्य जगताचा निर्माता म्हटले तरी वावगे ठरू नये असा – खट्याळ, खोडकर आणि तितकाच प्रेमळ चार्ली चॅप्लिन होय!

हे ही वाचा – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! चार्ली चॅप्लीन जीवन प्रवास : भाग १

 

Charlie-Chaplin-InMarathi

 

चार्ली चॅप्लिनला सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर नावाने देखील ओळखले जायचे. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. या व्यक्तीने जगाला जितके हसवले आहे, तितकेच गोंधळात टाकले आहे.

त्याचे कारण म्हणजे या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत काही गोष्ट, चला तर आज त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती आपण घेऊया.

 

Charlie-Chaplin-1 InMarathi

 

चार्ली चॅप्लिनच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे त्याचा जन्म! आजही लोक त्यांच्या जन्माबाबत संशोधन करण्यात गुंतले आहेत.

चार्लीचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला होता. एमआय-5 या ब्रिटिश गुप्तचर संस्थेने गोळा केलेल्या माहितीत सर्वात जुना पुरावा १९२० मध्ये तयार करण्यात आलेला चार्लीचा पासपोर्ट आहे. ‘एमआय-5’ने १९५२ मध्ये लंडनच्या पॅडलिंघम हिल परिसरात तपास केला होता.

तेथे १८८९ मध्ये चॅप्लिन आडनावाशिवाय चार्ल्स वा चार्ली नावाच्या कोणत्याही मुलाचा जन्म झाला नसल्याचे तपासाअंती सिद्ध झाले होते.

 

Charlie-Chaplin-marathipizza02

 

२०११ मध्ये चार्लीला १९७० च्या दशकात लिहिलेले एक पत्र उजेडात आले. त्यावरून लक्षात येते की, त्याचा जन्म स्टॅफोर्डशायरच्या ब्लॅकपॅच पार्कमध्ये लमाणांच्या तांड्यात झाला होता.

त्याचे साम्यवादाशी संबंध होते, असेही म्हटले जाते. तो साम्यवादी संघटनांना निधी पुरवत असल्याचा संशय होता. तो आरोप सिद्ध झाला असता तर त्याच्यावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली असती.

चार्लीबाबत असेही बोलले जाते की, त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. आणखी काही लोकांच्या मते, तो रशियातील ज्यू होता आणि त्याचे नाव इस्रायल थॉर्नस्टीन होते.

चार्लीबाबत एफबीआयने केलेल्या तपासाचा २ हजार पानी अहवाल आहे. मात्र, ‘एमआय-5’ला वाटत होते की, चार्लीपासून देशाला कसलाही धोका नाही. तरीही एफबीआयने १९५३ मध्ये त्याच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घातली होती. नंतर मात्र तो स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला.

दुसरी गोष्ट म्हणजे चार्लीने स्वत: जरी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला मोशन पिक्चर्सची भीती वाटायची. तेव्हा मोशन पिक्चर्सचा जमाना सुरु झाला होता.

तरी देखील चार्ली चॅप्लिनने १९३० मध्ये २ मूकपट तयार केले. चॅप्लिनने स्वत: हे दोन्ही सिनेमे शुन्यातून उभारले होते. परंतु या सिनेमात डायलॉग टाकले नाही. कुठे कुठे बस, रेडिओ आणि काही साहित्याचा आवाज येत होता… तेवढंच काय ते!

 

Charlie-Chaplin-marathipizza03

 

चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधी यांच्याशी त्याची लंडनमध्ये झालेली भेट! ही भेट घेतल्याचे चॅप्लिनने आपल्या डायरीत लिहून ठेवले होते.

आधुनिक युगात यंत्रामुळे माणसाचे शोषण होत असल्याचे गांधींजींनी त्याला सांगितले होते. गांधींच्या या वाक्याने प्रभावित झालेल्या चॅप्लिनने पुढे ‘टाइम मशीन’ नामक एक सिनेमा रिलिज केला होता.

 

Charlie-Chaplin-marathipizza04

 

चार्ली चॅप्लिनने कमी वयाच्या तरुणींशी विवाह केला होता. चॅप्लिनचे पाच विवाह झाले होते. २९ वर्षीय चॅप्लिनने १६ वर्षीय ईदना हिच्याशी पहिला विवाह केला. नंतर १६ वर्षीय लीटा ग्रेसोबत दुसरा, तिसरा विवाह पॉलेट गोडार्डसोबत तर चौथा पॉलेट हिच्याशी केला होते.

चॅप्लिनन ५४ व्या वर्षी ओना ओनेल हिच्याशी विवाह केला होता. तेव्हा ओना अवघ्या १८ वर्षाची होती. चार्ली चॅप्लिनला एकून ११ मुले असल्याचे म्हटले जाते.

चार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. ६ जुलै, १९२५ रोजी प्रसिद्ध झाल्या ‘टाइम मॅगझिन’ च्या कव्हर पेजवर चार्लीला स्थान देण्यात आले होते.

 

Charlie-Chaplin-2 InMarathi

 

ज्याप्रमाणे चार्लीचा जन्म हा नाट्यमय घटनांनी वेढेलेला होता, त्याचप्रकारे त्याच्या मृत्युपश्चातही काही नाट्यमय घटना घडल्या. चॅप्लिनने आपले संपूर्ण आयुष्य मूकपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मितीच्या कार्यात अर्पण केले होते.

चॅप्लिनने आपल्या फिल्मी करियरमध्ये खूप सिनेमे केले. १९६० मध्ये ‘अ काउंटेस फ्राम हॉंगकॉंग’ हा चॅप्लिनचा शेवटचा सिनेमा ठरला. शूटिंग संपल्यानंतर चॅप्लिनची प्रकृती अचानक बिघडली. अखेर २५ डिसेंबर १९७७ रोजी चॅप्लिनने जगाचा निरोप घेतला. चॅप्लिनचा मृत्यू स्वित्झर्लंडमध्ये झाला.

 

नंतर वेवेमध्ये त्याचे पार्थिव शरीर दफन करण्यात आले. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या दोन महिन्यांतच चॅप्लिनच्या पार्थिव शरीराची चोरी झाली होती. तब्बल ११ दिवसांनी १७ मे १९७८ रोजी जिनेव्हा येथील तळ्याजवळ चॅप्लिनच्या मृतदेहचा शोध लागला होता.

पुन्हा त्या मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून तो जमिनीत सहाफुट खोल पुरण्यात आला.

अश्या या जगाला हसवणाऱ्या अवलियाचे आयुष्य नेहमीच नाट्यमय राहिले.

 

===

हे ही वाचा – दोन विनोदवीरांच्या घरच्या विचित्र चोऱ्या : पु. ल. आणि चार्ली – एक अशीही आठवण

==

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?