' अमेरिकेतील पंख्यांना ४ तर भारतातील पंख्यांना ३ पाती, असं का? समजून घ्या… – InMarathi

अमेरिकेतील पंख्यांना ४ तर भारतातील पंख्यांना ३ पाती, असं का? समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

ऋतु कोणताही असो पंख्याशिवाय आपलं पानही हालत नाही. एसीला पसंती मिळत असली तरी पंख्याला पर्याय नाही हे देखील खरंच.

एसी यायच्या आधी आपल्याला बऱ्याच ठिकाणी कुलर बघायला मिळायचे, पण दमट हवेच्या ठिकाणी जसे की  मुंबई मध्ये कुलर हे फार कमी उपयोगी पडले, आणि मग त्यानंतर एसी ने कुलरची जागा घेतली त कायमस्वरूपी!

 

ac cooler inmarathi

 

पण यापूर्वीही जेंव्हा एसी किंवा कुलर अशा चैनीच्या वस्तू नव्हत्या तेंव्हा सुद्धा उकाडा तितकाच होता आणि तेंव्हा एका गोष्टीवर आपण सगळेच जणं फार अवलंबून होतो, तो म्हणजे सिलिंग फॅन अर्थात पंखा!

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंखा हे घरातील सर्वात उपयोगी साधन असते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. कारण या काळामध्ये प्रत्येकालाच त्याची गरज भासते.

तुम्ही काही घरांमध्ये लहान मुलांची यावरून भांडणे होताना देखील पहिली असतील, ती पण फक्त त्यांना स्वतःला हवा लागत नाही म्हणून.

तशी तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाची बाहेरून घरात आल्यावर आणि नेमकी घरातील लाईट गेल्यामुळे पंखा बंद असेल, तर चिडचिड होते – पण त्याच खोलीत आपण असू तर पंख्याशिवाय रहावत नाही.

इतकं की एखाद्या खोलीत गेल्यावर नकळत पंख्याच्या बटनवर हात जातोच!

याच महत्त्वपूर्ण पंख्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्या कधी लक्षात आल्या नाहीत.

 

 

fans inmarathi

प्रत्येक गोष्टीला काही ना काही तर्क असतो. परंतु आपल्या सभोवती अश्या कितीतरी गोष्टी असतात, ज्यांच्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. आपल्या छताला लटकलेल्या पंख्याला आपण नेहमी पाहतो, पण त्याच्याविषयी कधी विचार करत नाही.

या पंख्यांमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला कितीतरी प्रकार पाहायला मिळतील, सध्या तर घरातले लाईट्स आणि पंखे सुद्धा स्मार्ट झाले आहेत, Siri Alexa या अशा काही प्रगत तंत्रज्ञानामुळे तुमच्या आवाजावर घरातले फॅन्स आणि लाईट्स ऑपरेट होतात!

आपण कधी विचार तरी केला होता का कि इतकं सगळं विज्ञान पुढे जाईल?

 

alexa inmarathi

 

याहीपेक्षा काहीतरी वेगळंच नवीन गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत! पंख्याला ३ च पाती का असतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

तुम्हाला असे कधी वाटले नाही का? की आपल्या छताला लटकवलेल्या त्या पंख्याला ३ पातीच का असतात? चार किंवा सहा का नसतात?

यामागे सुद्धा काही तर्क आहेत ते आपण जाणून घेऊया.

 

fans in america inmarathi

 

आपल्या देशामध्ये तीन पात्यांचे पंखे खूप प्रसिद्ध आहेत. तर यूएसएमध्ये चार पात्यांचे पंखे प्रसिद्ध आहेत. यामध्ये सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे.

अमेरिकेमध्ये छताला लावलेल्या पंख्याचा उपयोग एअर कंडीशनला पर्यायी वस्तू म्हणून वापरतात. चार पात्यांचे पंखे हे तीन पात्यांवाल्या पंख्यापेक्षा मंद गतीने फिरतात. अमेरिकेतील लोकांना पंख्याची जास्त गरज भासत नाही –

चार पात्यांचा पंखा हा खोलीमध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. अश्या या चार पाती पंख्याचा विदेशामध्ये खूप उपयोग होतो.

भारतामध्ये चार पात्यांचे पंखे वापरले जात नाहीत, कारण भारतामधील लोक पंख्याच्या उपयोग हा फक्त पर्यायी उपाय म्हणून करत नाहीत.

भारतामधील लोकांचा पंखा लावायचा हेतू हा हवा मिळवणे हा असतो. कारण भारतातील सर्वच कुटुंब काही घरामध्ये ए.सी. लावू शकत नाहीत.

त्यामुळे हवा मिळवण्याचे पंखा हेच त्यांचे प्रमुख साधन असते. तीन पाती असलेला पंखा हा चार पाती असलेल्या पंख्यापेक्षा जलद गतीने फिरतो. त्यामुळे तो त्याच्यापेक्षा खूप चांगल्याप्रकारे आणि लवकर खोलीमध्ये हवा पसरवतो. तसेच हा पंखा खोली थंड ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हे पंखे भारतामध्ये खूप वापरले जातात.

fan

 

या उथळ, आधी म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत पंख्याचा वापर फक्त खोलीत हवा खेळती रहावी यासाठी केला जातो.

एकूणच वापरामागचा हेतूच वेगळा असल्यामुळे, साहजिकच दोन्ही देशात वापरल्या जाणाऱ्या पंख्यांचं डिझाईन वेगळं असतं!

मग मंडळी तुमच्या मनामध्येही कधी हा प्रश्न येऊन गेला असेल, तर वरील माहिती वाचून तुम्हाला त्याचे उत्तर नक्की मिळाले असेल…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?