'हे १० घरगुती उपचार तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत!

हे १० घरगुती उपचार तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणसाला नेहमीच शरीराच्या कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनाच कधी पाय दुखणे, छातीत दुखणे, मळमळ होणे, घसा खवखवणे आणि इतर अनेक समस्या उद्भवतात.

काही आजार हे आनुवांशिक असतात तर काही आजार आपण स्वतःहून ओढवून घेतो, पण या आजारांवर काहीतरी उपाय शोधायलाच हवे, आनुवांशिक होणाऱ्या आजाराचा त्रास कमी करता येऊ शकतात!

पण आपल्या निष्काळजीपणाने होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी उपाय करायला हवेत!

 

acidity inmarathi

 

अश्या आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नसतो. त्यामुळे आपण त्यावर कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतो.

पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही उपयोगात आणून तुम्ही डॉक्टरचा खर्च वाचवू शकता आणि घरातच मोफत स्वत:चा उपचार करू शकता.

चला मग जाणून घेऊया आपण स्वत:च स्वत:चे डॉक्टर कसे बनू शकतो ते! तर या उपायांविषयी आपण सविस्तरपणे या लेखात माहीती घेऊया!

 

१. पूर्ण दिवसभर चालून घरी आल्यानंतर आपले पाय दुखू लागतात, तेव्हा एका वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्यात ३ चमचे बेकिंग सोडा टाकून एकत्र करावे आणि त्यामध्ये थोडा वेळ पाय ठेवावेत,

त्यामुळे तुमचे पाय स्वच्छ तर होतीलच त्याचबरोबर ते दुखणार सुद्धा नाहीत.

 

Home made dremetics.marathipizza
aws.livestrongcdn.com

 

२. लिस्टरीन एक अद्भुत औषधी आहे. यात एक असे तेल असते जे ऍन्टीसेप्टीक आणि विरोधी दाहक औषध म्हणून वापरले जाते.

जर तुमच्या पायाला फोड आले किंवा पाय कुजले असतील तर उबदार पाण्यामध्ये एक चतुर्तांश कप लिस्टरीन टाकून त्यामध्ये आपले पाय बुडवून ठेवा!

हे तुमच्या कुजणाऱ्या पायावर खूप विलक्षण काम करेल आणि तुमचे पाय लवकर पूर्ववत होतील.

 

Home made dremetics.marathipizza1
goodhealthacademy.com

 

३. चहा हे आपल्यासाठी केवळ पेयाचे काम करणारे नसून ते तुम्हाला उन्हामुळे येणाऱ्या डागापासून सुद्धा वाचवू शकते.

उकळत्या पाण्यामध्ये ३ टी-बॅग टाकून ते एकत्र करा. ते चांगल्याप्रकारे उकळ्यानंतर त्यामध्ये थोडा बर्फ टाकून ते आपल्या टॉवेलमध्ये टाकून त्या डागांवर चोळावे.

 

dots on body inmarathi
healthline

 

४. तुमचा घसा जर खवखवत असेल तर थोडेसे सफरचंदाचे व्हिनेगर थोड्याशा पाण्यामध्ये टाकून गुळण्या करा. असे केल्याने तुमच्या घशाची खवखव थांबेल.

 

apple vinegar-marathipizza
healthline.com

 

५. पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी प्या, असे केल्याने छातीतील जळजळ आणि ऍसिडस् कमी होतील.

 

Home made dremetics.marathipizza4
www.naturallivingideas.com

 

६. जखम झाली असल्यास त्या जखमेवर मध लावून त्यावर पट्टी लावावी, असे केल्याने जखम लवकर बरी होईल.

 

honey inmarathi
feel healthy life

 

७. एक कप आल्याच्या चहामध्ये थोडेसे मध आणि लिंबाचा रस घाला आणि तो चहा प्या. असे केल्याने तुमच्या पोटामध्ये होणारी मळमळ थांबेल.

 

Home made dremetics.marathipizza6
i.ytimg.com

 

८. जर तुम्ही लसून खात असाल, तर तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये लसून एकत्र करून त्याच्या गुळण्या करा, असे केल्याने तुमचा घसा साफ होतो.

 

garlic inmarathi
medical news today

 

९. जर तुम्हाला झोपेची समस्या असेल, तर तुम्ही चेरी चावून खाल्याने ही समस्या दूर करू शकता, कारण चेरीमध्ये मेलाटोनिन असते, जे झोप चांगली लागण्यास मदत करते.

 

cherry inmarathi
garden of life

 

१०. जर तुम्ही रात्री मद्यपान केले असेल, तर दुसऱ्या दिवशी तुमचे डोके दुखतात, म्हणून अश्यावेळी रात्री झोपण्याआधी बी-५० ची गोळी घ्या आणि मग झोपा.

असे केल्याने तुम्हाला सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटेल.

Home made dremetics.marathipizza9

Home made dremetics.marathipizza9
www.solgar.com

असे हे उपाय घरातल्या घरी केल्याने आजारांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता.

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?