' एकेकाळचा पडद्यावरचा व्हिलन आज आहे मेगास्टार!

एकेकाळचा पडद्यावरचा व्हिलन आज आहे मेगास्टार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अक्षय शेलार

===

आता साउथमधील फिल्म इंडस्ट्री बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आहे. तशी ती पूर्वीही होतीच, पण आता उत्पन्न, भारतभरातील जबरदस्त फॅन फाॅलोइंग, डब्ड चित्रपटांची वाढती संख्या, इत्यादी गोष्टींमुळे आता तिथे आधीपेक्षा जरा जास्तच ‘आनंदी आनंद गडे’ स्थिती आहे.

पण ’80, ’90 च्या दशकात आणि ’20 व्या शतकात असे नव्हते. तेव्हा अगदी मोजकेच अभिनेते देशभर माहित असायचे आणि त्यांच्या नावावरचं सिनेमे चालायचे. यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे चिरंजीवी…

 

chiranjeevi-marathipizza01

 

रजनीकांत, कमल हसन अशा साउथमधील काही मोजक्याच पण उत्तम आणि सर्वज्ञात कलाकारांना समकालीन असलेला हा कलाकार त्यांच्याच रांगेत बसण्याइतका उत्तम अभिनय तर करतोच, शिवाय मानधन, पाॅप्युलॅरिटीमध्येही हा त्यांना तगडी तोड देतो.

२२ ऑगस्ट १९५५ मध्ये पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथुर गावातील एका काॅन्स्टेबलच्या घरी याचा जन्म झाला. खरं नाव ‘कोन्डिला सिवा शंकरा वरा प्रसाद’ असं असलं तरी आता तो केवळ चिरंजीवी या एकाच नावाने ओळखल्या जाण्याइतपत त्याने काम केलंय.

काॅमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलेल्या या माणसाला मात्र अगदी आधीपासूनच अॅक्टिंगची आवड होती. याच आवडीमुळे तो १९७६ मध्ये ‘मद्रास फिल्म युनिव्हर्सिटी’मध्ये दाखल झाला आणि इथूनच त्याने अभिनयाचे धडे गिरवायला सुरूवात केली.

‘अंजनेय’ या हिंदू देवतेचं उपासक असलेलं त्याचं कुटुंब होतं. त्यामुळेच त्याच्या आईने त्याला ‘चिरंजीवी’ हे नाव स्क्रीन नेम म्हणून निवडण्यास सांगितले. ज्याचा अर्थ सर्वज्ञात आहे तो म्हणजे ‘अमर’.

पुढच्याच दोन वर्षांत त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९७८ मध्ये त्याचं ‘पुनाधिरल्लु’ या त्याच्या पहिल्या चित्रपटावर काम चालू होते. पण ‘प्रानम करीदु’ हा त्याचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ठरला.

शिवाय, याच वर्षी आलेल्या ‘आय लव्ह यू’ आणि ‘इडी कथा काडु’ या दोन चित्रपटांत त्याने अ‍ॅन्टी हिरोदेखील साकारले, हे विशेष. शिवाय, ‘इडी..’मध्ये त्याने कमल हसनच्या विरूद्ध हा रोल साकारला.

या आणि पुढील दोन वर्षांमध्ये त्याच्या सुमारे चौदा फिल्म्स रिलीज झाल्या.

याच काळात तो थेट लीड रोलमध्ये दिसू लागला. १९८२ मधील ‘शुभलेखा’साठी त्याला त्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याच काळात त्याचे बऱ्यापैकी नाव झाले होते. चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हिट होत होते. पुन्हा १९८५ मध्ये लगेच त्याला दुसरा फिल्मफेअर मिळाला.

 

chiranjeevi-marathipizza02

 

या दशकात त्याचे बरेच चित्रपट आले. पण महत्त्वाचं म्हणजे ते बाॅक्स ऑफिसवर चालले आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे चिरंजीवीला एक स्टारडम प्राप्त झाले. त्याच्या नावापुढे रजनी आणि कमल इतकंच मोठं वलय निर्माण झालं.

१९९० संपेपर्यंत तो साउथमधील सर्वांत जास्त प्रसिद्ध अभिनेता झाला होता. शिवाय, या वर्षअखेरीस त्याच्या नावावर काही फिल्मफेअर तर होतेच, पण राज्य शासनाचा नंदी पुरस्कारदेखील होता.

शिवाय, त्याला ‘तेलुगू सिनेमांचा बाॅस’ म्हटलं जाऊ लागलं. याच काळात त्याने बाॅलिवुडमध्येही पदार्पण केलं. ‘प्रतिबंध’ आणि ‘आज का गुंडा राज’ हे त्याचे काही हिंदी सिनेमे आणि हिंदी प्रेक्षकांनीही त्याला डोक्यावर घेतले.

प्रतिबंध हा त्याचा हिंदीबाबत तरी जरा उजवा सिनेमा म्हणता येईल. किमान मला तरी तो तसा वाटला. यानंतरही तो सलग १९९९ पर्यंत लागोपाठ चित्रपट करत होता.

पण त्यानंतर जरा उशीराच, २००२ मध्ये बऱ्याच गॅपनंतर आला त्याचा ‘इंद्रा’. हा ‘इंद्र’, इंदर, वगैरे बऱ्याच नावांनी प्रसिद्ध झाला आणि आता तर तो एक कल्ट क्लासिक बनलाय.

या चित्रपटाने त्याचे आणि इतरांचेही सर्व रेकॉर्ड्स मोडलेच, शिवाय अभिनयाबाबतही हा चित्रपट बराच नावाजला गेला. यानंतर तर त्याचं नाव खरोखर सुवर्णाक्षरात लिहिण्याइतपत ठळक झालं होतं आणि हे सर्व तो डिझर्व्हही करतो.

 

mega-star-inmarathi

 

चिरंजीवीने इतर काहीही केले असो, पण अजूनही बहुतांशी लोक त्याला इंद्र या चित्रपटातील भूमिकेसाठीच ओळखतात. त्यांना त्याचं फक्त स्क्रीनवरील नावच माहित आहे, चिरंजीवी, बस्स.

बाकी कशाशीही त्यांना काहीच देणं लागत नाही. यातील बहुतेक लोकांनी तर त्याचे इतर किती चित्रपट पाहिले असतील ही शंकाच आहे. पण काही लोक फक्त ‘त्या’ एका क्षणासाठी, एका घटनेसाठी जन्म घेतात असं म्हणतात ते उगीच नाही.

हेच चिरंजीवीला लागू पडतं. तो फक्त इंद्रच्या भूमिकेसाठीच जन्मला. बाकी त्याने काही केलं नसतं तरी चाललं असतं.

मला चांगलं आठवतंय, २००६-२००७ आणि त्यानंतरचीदेखील काही वर्षं व्हिडिओ प्लेयरचा जमाना होता आणि आमच्या काकाकडेही एक प्लेयर होता.

त्यावेळी आम्ही आणलेली ‘इंद्रा – दि टायगर’ची सीडी आणि त्यावरील चिरंजीवीचा लख्ख फोटो, या दोनही गोष्टी मला ठळक आठवत आहेत.

भारावून जाणं म्हणजे काय असतं, हा अनुभव याच चिरंजीवीने आम्हाला दिलाय. रजनीकांत कितीही मोठा स्टार असला तरी चिरंजीवी तो चिरंजीवीच.

आज तो भले आंध्रमधील एक राजकीय नेता, वगैरे आहे. पण आमच्यासाठी कायमच तो दोन तीन दशकांपूर्वी होता तसाच सुपरस्टार आहे आणि राहिल.

 

chiranjeevi-marathipizza03

 

त्याचं घर म्हणे साउथमधील सर्वांत मोठं आणि आदरातिथ्य केलं जाणारं घर आहे. त्याच्या घरातील आचाऱ्यांनी म्हणे क्लास उतप्पा की डोसा की आणखी कुठल्या तरी पदार्थाचा एक नवीन प्रकार तयार केलाय.

कधीतरी त्याच्या याच घरी जाऊन, त्याला भेटून, त्याच्या घरचा तो पदार्थ खाण्याची खूप इच्छा आहे. लवकरच ती इच्छा पूर्णत्वास येवो.

शिवाय, लवकरच त्याचा आणखी एखादा चित्रपटही येवो, हीच अपेक्षा आहे. बाकी त्याच्या नावाप्रमाणेच चित्रपटांच्या इतिहासात अमर असणाऱ्या मेगास्टार ‘चिरंजीवी’ नामक चिरतरुण वादळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?