' Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २ – InMarathi

Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग २

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : खुद्द आपल्या भारतात ही ठिकाणे असताना foreign trip ला जाऊन पैसे का वाया घालवता? – भाग १

===

आपल्या भारताला पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक, नैसर्गिक असा समृध्द वारसा लाभला आहे. या लेखाच्या मागील भागात आपण ७ अश्या ठिकाणांची माहिती घेतली ज्या हुबेहूब फॉरेन डेस्टिनेशन सारख्या भासतात. आज आम्ही आणखी अश्या काही ठिकाणांची माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

1. इंडिया गेट आणि आर्क दे ट्रायम्फे…

 

india gate-arc de triomphe -marathipizza
india gate-arc de triomphe

 

भारताची राजधानी म्हणजेच दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक इंडिया गेट हे पॅरिसच्या आर्क दे ट्रायम्फेची प्रतिकृती वाटावी इतके सारखे दिसतात. १९३१ साली एडविन लुटयेन्स यांनी इंडिया गेटची रचना केली होती.

सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात तसेच ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे.

भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेली अमर जवान ज्योती  इंडिया गेट येथे आहे. तेव्हा पॅरिस ला जाऊन आर्क दे ट्रायम्फेला बघण्यापेक्षा आपल्या इंडिया गेटला जाऊन या.

 

2. कुतुब मिनार आणि लिनिंग टावर… 

 

Qutub-Minar leaning tower-marathipizza
Qutub Minar and Leaning Tower

कुतुब मिनार आणि पीसा येथील लीनिंग टॉवर या दोन्ही वास्तू जणू जुळ्या आहेत असचं  वाटतं. कुतुब मिनार हा दक्षिण दिल्ली शहराच्या मेहरौली भागात स्थित जगातील सर्वात उंच टॉवर आहे.

ही इमारत पूर्णपणे विटांपासून बनलेली आहे. याची उंची ७२.५ मीटर आणि व्यास १४.३ मीटर आहे, जो कळस पर्यंत २.७५ मीटर होतो.  या इमारतीमध्ये ३७९ पायऱ्या आहेत.

आसपासच्या परिसरातही भारतीय कलेची उत्तम उदाहरणे आहेत. हा परिसर युनेस्को द्वारा जागतिक वारसा म्हणून मंजूर केला गेला आहे.

 

3. जामा मशिद आणि बादशाही मस्जिद…

 

jama and badshahi Masjid-marathipizza
Jama Masjid and Badshahi Masjid

दिल्ली येथील जामा मशिद आणि पाकिस्तानच्या लाहौर येथील बादशाही मशिद  या दोन्ही एकसारख्याच आहेत. १६५६ मध्ये सम्राट शाहजहांद्वारे जामा मशिद बांधण्यात आली. ही मशिद लाल आणि संगमरवर दगडांनी बनविली आहे. ही भारतातील सर्वात मोठी मशिद आहे.

 

4. जल महाल आणि ट्रेकाई कॅसल…!

 

Jal_mahal trakai castle-marathipizza
Jal Mahaland Trakai Castle

राजस्थानची राजधानी जयपूर येथील मानसागर सरोवरच्या मध्‍यभागी हा प्रसिद्ध आणि ऐतिहासिक महाल आहे. अरावली टेकड्यांच्या  पायथ्याशी हा महाल मानसागर सरोवराच्या मध्यभागी असल्याने त्याला ‘आई बॉल’ देखील म्हणतात. तसेच  याला ‘रोमँटिक महाल’ म्हणून देखील ओळखले जाते.

लिथुआनिया येथील ट्रेकाई कॅसलसाठी जयपूरचा हा जल महाल नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.

 

5. जैसलमेर वाळवंट आणि सहारा वाळवंट…

 

thar and sahara desert-marathipizza
Thar Desert and Sahara Desert

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट असून ते पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण आपलं जैसलमेरचं वाळवंट काही त्यापेक्षा कमी नाही, येथे थरचे वाळवंट आहे. हे भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे.

२००००० चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले हे वाळवंट आकारमानाने जगातील सातव्या व आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे वाळवंट आहे.

 

6.  कुंभलगढ किल्ला आणि दि ग्रेट वॉल ऑफ चायना…

 

kumbhalgadh-wall china wall-marathipizza
Kumbhalgadh Fort Wall and The Great Wall Of China

कुंभलगढ़चा किल्ल्याला केवळ राजस्थानमधेच नव्हे तर भारताच्या सर्व किल्ल्यांमध्ये एक विशेष महत्व आहे. हा किल्ला राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात आहे. हा किल्ला महाराणा कुंभ यांनी बांधला होता.

या किल्ल्याला ‘अजयगढ’ म्हणून देखील ओळखला जात होते, कारण हा किल्ला जिंकणे अतिशय अवघड होते. चीनच्या भिंतीनंतर या किल्ल्याची भिंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भिंत आहे. त्यामुळे दि ग्रेट वॉल ऑफ चायना ला जाण्याऐवजी कुंभलगढ़ किल्ल्याला भेट द्या.

 

7. राजाबाई टॉवर आणि बिग बेन…

 

rajabai-tower big ben-marathipizza
Rajabai Tower and Big Ben

मुंबई तशी तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातलंच एक म्हणजे मुंबईचं राजाबाई टॉवर. मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात स्थित या टॉवरची उंची ८५ मित्र आहे. राजाबाई टॉवर म्हणजे दुसरं बिग बेनच!

मग उगीचच लंडन ला जाऊन बिग बेन बघण्यापेक्षा मुंबईतलं राजाबाई टॉवर बघा…!

तर मंडळी बघितलं आपल्याच भारतात किती तरी अशा वास्तू आहेत ज्यांच्यासमोर त्या परदेशातील वास्तूही फिक्या पडतात. मग आता परदेशात फिरायला जाण्याआधी या ठिकाणांचा विचार करायला हरकत नाही…

अशीच काही आणखीन ठिकाणांची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत या लेखाच्या पुढच्या भागात…

पुढील, तिसऱ्या, अंतिम भागाची लिंक : Foreign trip वरचे पैसे वाचवा – भारतातील ह्या डेस्टिनेशन्स ला जा – भाग ३

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?