'ग्राहकांचे "हे" अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील...

ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बँक हे ठिकाण काही वेगळेच असते, कारण तिथे जाण्यासाठी कितीही कंटाळा आला असला तरी काही महत्त्वाचे काम असल्यास आपल्याला तिथे जाणे भाग पडते. बँकेची कामे करणे सर्वांसाठीच सोपे नसते. काहींना ही कामे करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

नवीन खाते उघडणे, लोन घेणे यांसारख्या आणि बँकेशी निगडित इतर अनेक कामे करण्यासाठी बहुतेक लोकांना अडचणी येतात.

ग्राहकांना बरेचदा आपल्या अधिकारांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यापुढे या समस्या निर्माण होतात.

या अडचणींपासून सुटका होण्यासाठी रिजर्व बँकेकडून तयार करण्यात आलेले बँकिंग कोड्स अँड स्टॅन्डर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआई) ने बँक ग्राहकांना खूप सारे अधिकार दिले आहेत. आम्ही तुम्हाला अश्या १० अधिकारांविषयी सांगणार आहोत, जे लक्षात घेऊन तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता..

 

Bank customer rights.marathipizza

 

१. खाते उघडण्याचा अधिकार…

कोणतीही बँक फक्त स्थायी पत्ता नसल्याने देशामध्ये कोठेही राहणाऱ्या भारतीय नागरिकाचे खाते उघडण्यासाठी कधीही नकार देऊ शकत नाही.

 

bank-inmarathi

 

२. फंड ट्रान्सफरचा अधिकार…

कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेमधून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) च्या माध्यमातून ५०,००० रुपयापर्यंतची रक्कम कोणत्याही इतर बँकेच्या खात्यामध्ये जमा करू शकतो. त्यासाठी संबंधित बँकेमध्ये त्या व्यक्तीचे खाते असणे गरजेचे नाही.

 

NEFT-Taxscan InMarathi

 

३. चेक कलेक्शन उशिरा झाल्यास भरपाई…

चेक कलेक्शनमध्ये बँकेकडून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यावर ग्राहकांना भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. भरपाईची रक्कम साधारण व्याज दराच्या हिशोबाने चुकवली जाईल.

 

Bank customer rights1.marathipizza

 

४. सिक्युरिटी परत मिळवण्याचा हक्क…

जर एखाद्या ग्राहकाने बँकमधून लोन घेतले आहे आणि त्यासाठी सिक्युरिटी दिली असेल, तर या प्रकरणामध्ये पूर्ण लोन फेडल्यानंतर १५ दिवसांच्या आतमध्ये सिक्युरिटी परत मिळाली पाहिजे.

 

Money Management-inmarathi

 

५. सूचनेचा अधिकार…

बँक आणि तुमच्यामध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला, तर बँकेला असे करण्याच्या ३० दिवस आधी नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे.

 

right-to-Information-inmarathi

 

६. अनधिकृत पैसे काढल्यास ग्राहक दोषी नाही…

ग्राहकाच्या बँक खात्यामधून अनधिकृत काढलेल्या पैशांसाठी ग्राहकाला दोषी ठरवता येत नाही. त्याला सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची असते.

 

Bank customer rights2.marathipizza

 

७. नकार देण्याचे कारण जाणून घेण्याचा अधिकार…

जर बँक कोणतीही सुविधा देण्यासाठी नकार देत असेल, तर ग्राहकाला त्यामागचे कारण जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.

 

why-no-inmarathi

 

८. थर्ड पार्टी प्रोडक्ट्स…

कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला जबरदस्ती थर्ड पार्टी प्रोडक्ट्स विकू शकत नाही. थर्ड पार्टी प्रोडक्ट म्हणजे असे उत्पादन जे संबंधित बँकेचे नसते. दुसऱ्या कुठल्यातरी कंपनीने ते उत्पादन बँकेला विकण्यासाठी दिलेले असते आणि बँकेला ते विकण्याचा मोबदला दिला जातो.

 

 

९. गुप्तता ठेवण्याचा अधिकार…

ग्राहकांची खाजगी माहिती गुप्त ठेवणे बँकेची प्रमुख जबाबदारी आहे. बँक तुमची खाजगी माहिती तुमच्या संमतीशिवाय कोणालाही सांगू शकत नाही.

 

Bank customer rights3.marathipizza

 

१०. तक्रार निवारण अधिकार…

बँकेला ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचे पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे बँकेचे काम आहे.

 

complaint-inmarathi

 

रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी हे अधिकार निश्चित केले आहेत. या अधिकारांच्या विरोधात न जाता प्रत्येक बँकेने ग्राहकांना सेवा द्यावी असेही निर्देशित केले आहे.

तुमच्या बँकेत तुमच्या किंवा इतरांच्या बाबतीत या अधिकारांचे हनन होताना दिसून आले तर थेट वरिष्ठांकडे जा. सुलभ बँकिंग का ग्राहकांचा हक्क आहे आणि हा हक्क पूर्ण करायला बँका बांधील असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील…

  • July 25, 2019 at 8:23 am
    Permalink

    Loan repayment related rules

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?