बिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बिअर म्हणजे मद्याचाच एक प्रकार आणि हे काही तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. वयात आलेल्या प्रत्येक पोराला बिअर म्हणजे काय हे त्याच्या सवंगड्यांच्या मार्गदर्शनावरून वेळेआधीच कळते. ही बिअर पाश्चात्य देशांमध्ये अगदी सॉफ्ट ड्रिंक सारखी घेतली जाते. जसे आपण चहा पितो तशी ह्यांच्याकडे बिअर म्हणा ना! आपल्याकडे मात्र बिअर आजही निषिद्ध मानली जाते. अर्थात आपल्याकडे संपूर्ण दारू हे प्रकरणच प्रतिबंधित आहे म्हणा! पण मंडळी आज आम्ही तुमच्यासमोर याच बिअरचे आरोग्यावर होणारे काही चांगले परिणाम मांडणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील दारूच ती… तिचे काय चांगले परिणाम होणार आहेत, दारूमुळे होतं ते नुकसानच. तर तुमचही म्हणणं बरोबर आहे, पण हे नकारात्मक परिणाम तेव्हाच दिसतात जेव्हा दारू म्हणजे आपण चैनेची वस्तू समजतो आणि तिचे अति प्रमाणात सेवन करतो. आज आम्ही जे परिणाम सांगणार आहोत ते अनेक प्रकारच्या संशोधानातून अगदी कमी प्रमाणात बिअर घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर दिसून आले आहेत. नाहीतर उगाच बिअर चांगली… बिअर चांगली म्हणून हवी तेवढी घ्याल आणि इभ्रतीचे वाभाडे निघायचे.

१) कोलेस्ट्रॉलवर अनुकुल परिणाम

beer-effects-marathipizza01
getalife.com

बिअरमध्ये कोलेस्ट्रॉल नसतेच पण त्याचबरोबर ती शरीरातील कोलेस्ट्रॉलसाठी लाभदायक असते. नियंत्रित मात्रेत बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. HDL (लाभदायक) आणि LDL (घातक). बिअरमुळे शरीरातील HDL चे प्रमाण चांगले राहते. काही अभ्यासांनुसार रोज एक बिअर प्याल्याने शरीरातील HDL मध्ये सुमारे ४ टक्के वाढ होते.

 

२) हृदयविकारावर उपयोगी

beer-effects-marathipizza02
webmd.com

फ्रांसमधील खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली अत्यंत धोकादायक आहे. फॅटचे अधिक प्रमाण असलेले अन्न ते सेवन करतात तसेच धुम्रपानाचे प्रमाणही अधिक असते. तरी येथील लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी आहे. त्याचे कारण म्हणजे याठिकाणी रेड वाईन सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे. रेड वाईनमध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्याचप्रमाणे डार्क बिअरमध्येही त्याचे प्रमाण अधिक असते. ब्रिटीश मेडीकल जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधन अभ्यासाच्या मते रोज ठरावीक वेळेत तीन ड्रींक घेतल्यास हृदयरोगांचा धोका सुमारे २५ टक्क्यांनी कमी होतो.

 

३)  बिअर सेवन करणारे दीर्घायुषी

beer-effects-marathipizza03
telegraph.co.uk

जर तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक मद्यसेवन केले तर कॅन्सर होतो, तसेच इतर आजार होण्याची शक्यताही असते. पण अनेक संशोधनामधून हे देखील सिद्ध झाले आहे, की तुम्ही जरादेखील मद्यसेवन न करणे हेही आरोग्यासाठी चांगले नसते. संशोधनानुसार ठराविक मद्यपान करणारे व्यक्ती हे कधीही मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काळ आणि निरोगी जगतात. ठराविक मद्यपान करणाऱ्यांसाठी बिअर हा योग्य पर्याय असतो. कारण त्यात अल्कोहोल ठराविक प्रमाणात असते.

 

४) बी व्हिटॅमिनचा मुबलक पुरवठा

beer-effects-marathipizza04
wholehealthinsider.com

फिल्टर न केलेल्या किंवा अत्यंत कमी फिल्टर केलेल्या बिअरमध्ये व्हिटामीन बी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बिअर ठरावीक प्रमाणात सेवन करणे हे पोषकही ठरू शकते. तसेच हृदयविकाराच्या झटक्यांपासून संरक्षण करणाऱ्या फॉलीक असिडचे प्रमाणही बिअरमध्ये जास्त असते. तसेच बिअरमध्ये मॅग्नॅशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाणही चांगले असते.

 

५) कॅन्सरपासून संरक्षण 

beer-effects-marathipizza05
licdn.com

ओरेगॉन विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टोबेल मिरांडा यांच्या मते, बिअरचा आरोग्याशी असलेला सर्वात महत्त्वाचा संबंध म्हणजे त्यात कॅन्सरशी लढा देणारी तत्वे आढळतात. एक्झँथॉमॉल हे अँटिऑक्सीडंट कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या एन्झाइमशी लढा देत असतात.

 

६)  नैसर्गिक बिअर

beer-effects-marathipizza06
3.bp.blogspot.com

बिअरमध्येही काही रासायनिक तत्वे असतात असे सांगितले जाते. पण बिअर ऑरेंज ज्यूस किंवा दुधाप्रमाणेच पूर्णपणे नैसर्गिक असते, उलट काही ज्यूस आणि दुधाच्या पाकिटांवर तुम्हाला अशा प्रकारचे तत्त्वे असल्याची माहिती आढळू शकते. बिअरमध्ये अल्कोहोल आणि होप्स नैसर्गिकरित्या असल्याने त्याला प्रिझर्वेटिव्ह्जची गरजच भासत नाही. ज्याप्रमाणे ब्रेड तयार केला जातो, तेवढीच काय ती प्रक्रिया बिअरवरही केली जाते.

 

७) बिअरमुळे वजन वाढत नाही

beer-effects-marathipizza07
chababs.com

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार बिअरचे सेवन करणे आणि वजन किंवा पोटाची चरबी वाढणे यामध्ये काहीही संबंध नाही. बिअर पिणारे लठ्ठ असतात असा समज आहे. पण बिअर पिणे आणि लठ्ठपणा यात अगदी नाममात्र संबंध असल्याचे संशोधकांचे मत आहे. उलट ठरावीक प्रमाणात बिअर सेवन करणाऱ्यांचे वजन बिअर न पिणाऱ्यांच्या तुलनेत अधिक नियंत्रणात असते असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

 

८) रिलॅक्स/मनावरचा ताण कमी करण्यात मदत

beer-effects-marathipizza08
awesomejelly.com

नियंत्रणात किंवा ठरावीक प्रमाणात बिअर सेवन केल्यास तुम्हाला मित्रांबरोबरही याचा आनंद घेता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही रिलॅक्स करण्यासाठी सेवन करू शकता.

 

९) कॅलरीजचे प्रमाण कमी

beer-effects-marathipizza09
naturallyintense.net

बिअरमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेड्सचे प्रमाण अत्यंत कमी असते. तसेच फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल आढळत नाही. पूर्णपणे नैसर्गिक पेय म्हणून बिअर हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. गिनीजच्या १२ औंसमध्ये असणारे कॅलरीचे प्रमाण हे दुधाच्या 12 औंसमध्ये असणाऱ्या कॅलरीजएवढेच असते. ते म्हणजे १२.५, तसेच ते ऑरेंज ज्युसपेक्षाही (१५० कॅलरी) कमी असते. जर शरीरासाठी पोषक तत्वे मिळवण्याचा बिअर हा एकमेव मार्ग असेल तर तुम्ही दिवसभरातील कॅलरीची गरज भागण्यासाठी जागे असताना तासाला एक बिअर घेणे आवश्यक आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पण आपल्याकडे सध्याच्या घडीला तरी बिअर व्यतिरिक्त पर्याय उपलब्ध आहेत. बिअरपेक्षा कमी कॅलरिज असणारे नैसर्गिक पेय म्हणजे चहा, ब्लॅक कॉफी आणि पाणी होय.

१०)  पाण्यापेक्षा बिअर सुरक्षित

beer-effects-marathipizza10
express.co.uk

ही गोष्ट आपल्यापैकी बरेचजण हसण्यावारी नेतील पण विश्वास ठेवा ही खरी गोष्ट आहे की, जर तुम्हाला पाणी न पिण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर बिअर हा एक चांगला पर्याय ठरेल. स्थानिक बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांच्या तुलनेत ते अधिक सुरक्षित असते असे म्हणता येईल. बिअर तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर उकळली जाते. तसेच त्यानंतर ती अत्यंत स्वच्छ आणि हवाबंद बाटलीमध्ये पॅक केली जाते. ती लीक झाली तरी तिच्यात जीवघेणे बॅक्टेरिया तयार होत नाहीत.

काय आहे की नाही अविश्वसनीय पण उपयुक्त माहिती…पण तरीही अतिदारू वाईटच हे लक्षात ठेवा!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?