' लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज... काय बेस्ट आहे?

लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय बेस्ट आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न संस्थेला भारतीय परंपरेत महत्त्व असलंं, तरी प्रत्येक लग्नाची स्वतंत्र अशी गोष्ट असते. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं कवितेत म्हटलं गेलं, तरी प्रत्येकाची गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळी असते.

कुणी प्रेमातं पडून लग्न करतं, तर कुणाचा साग्रसंगीत मुलगी पाहण्याचा कार्यक्रम भरविला जातो.

प्रेम विवाह अर्थात लव्हमॅरेज करणा-या जोडप्यांचेही अनेक रंजक किस्से असतात. काहींना घरच्यांचा विरोधाला तोंड द्यावं लागतं, तर काहींचा प्रमाचा मार्ग अगदीच सोपा, हळुवार असतो. लव्ह मॅरेज करणाऱ्यांकडून  कायमच प्रेमविवाहांना पाठिंबा दिला जातो, तर अरेंज मॅरेज करणारी जोडपी लग्नानंतरही सुरु होणाऱ्या  प्रेमकथेतली गंमत सांगतात.

तुमचीही अशीच कथा असेल ना ? तुम्ही लव्ह मॅरेज केलयं की अरेंज ? अजून विवाह बंधनात अडकला नसाल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीत तुमचा जोडीदार निवडायला आवडेल ?

 

 

marriage01-marathipizza

 

पूर्वापार चालत आलेला कांदेपोह्यांचा कार्यक्रम आजही घराघरात साजरा होतो. नवीकोरी साडी आणि साजशृंगार केलेली मुलगी, तिला पाहण्यासाठी आलेला मुलगा आणि त्यांचे कुटुंबीय हे चित्र तुमच्याही घरात दिसले असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फार पूर्वी या सोहळ्याला वधुपरीक्षा म्हटलं जायचं, यावेळी प्रत्यक्ष मुलालाही सोबत न घेता केवळ घरातील ज्येष्ठ मंडळींकडून मुलगी पाहण्याचा सोहळा केला जायचा त्यावेळी इतरांना मुलगी पसंत पडल्यास त्यानंर दोघांची भेट व्हायची.

काळानुसार या पद्धतीत बदल होत गेले, तरी त्यानंतरही मुलीला मुलाच्या कुटुंबियांकडून, स्वयंपाक येतो का ? शिवणकाम येतं का ? गाणं म्हणता येतं का ? असे काही ठराविक प्रश्न विचारले जातातंच.

 

Marriage-Certificate inmarathi

 

अरेंज मॅरेज म्हणजे केवळ एका भेटीतच मुला-मुलीला एकमेकांची पसंती विचारली जायची. सुरवातीच्या काळात केवळ मुलाची पसंती आली, तरी लग्न ठरल्याचे जाहीर व्हायचे. हल्ली बदलत्या काळानुसार या पद्धतीत चांगलेच बदल झाले आहेत.

अरेंज मॅरेजेससाठी अनेक मॅट्रिमोनियल साईट्स वापरल्या जात असून त्यावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

त्यामुळे मुलगा-मुलगी यांना निवडीचा समान हक्क मिळाला आहे, हल्ली वधुवर सुचक मेळावा असो वा ऑनलाईन साईट्स असो, आपल्या निकषांत योग्य असलेल्या मुलाची तसेच मुलीची माहिती मिळाल्यानंतर प्रथम मुलगा-मुलगी भेटतात.

 

farhan-aditi-inmarathi

गप्पांमधून एकमेकांचा स्वभाव जाणून घेतात, त्यानंतर दोघांची पसंती असल्यास कुटुंबाची गाठभेट होते, आणि नंतरच लग्न ठरते.

ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, त्याच फक्त नाव आपल्याला कळलेलं असत आणि त्याच्यासोबतच्या काही मोजक्या औपचारिक भेटींमध्ये त्याला ओळखून आयुष्यभराचा निर्णय घ्यायचा ही बाब अनेकांना कठीण वाटते.

मात्र अरेंज मॅरेज करणारी अनेक जोडपी एकमेकांना पुरेपुर जाणून घेतल्याशिवाय बोहल्यावर चढतचं नसल्याचं दिसतं.

 

marriage02-marathipizza

 

आता लव्ह मॅरेज, म्हणजे अरेंज मॅरेजच्या अगदीच विरुद्ध प्रकार. एका महाविद्यालयात शिकणारे मित्र मैत्रिणी किंवा एकाच ऑफिसातील दोन सहकारी…  आयुष्याच्या नेमक्या कोणत्या वळणावर तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल, हे कुणालाही सांगता येत नाही.

सुरवातीला असलेली मैत्री एकमेकांच्या सहवासाने प्रेमात बदलते, त्यानंतर विचारांन्ती दोघांकडून लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना असली, तरी प्रेम ते लग्न हा प्रवास अनेकांसाठी कठीण असतो. काही जोड्यांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळतो, मात्र अनेकांच्या लव्हस्टोरीत अडथळे येतातचं.

 

sairat inmarathi

 

जातपात, धर्म, आर्थिक स्तर, रुप अशा अनेक मुद्द्यांवरून प्रेमवीरांना कुटुंबाचा विरोध सहन करावा लागतो.

घरगुती भांडणांमुळे अनेकदा जोड्यांना घरातून पळून जाऊन लग्न करावे लागते, मात्र युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असं म्हणत लव्हमॅरेज करणारी जोडपी आपलं प्रेम यशस्वी करण्यासाठी काय वाटेल ते करण्यासाठी तयार असतात.

अरेंजमध्ये घरचे मुला-मुलीला भेटवतात, पण इथे मुलं आपल्या कुटुंबीयांना भेटवतात.

 

marriage04-marathipizza

 

त्यानंतर उजाडतो तो लग्नाचा दिवस, पूर्वी अरेंज मॅरेज असलेल्या विवाहसोहळ्यात वधुवर अवघडलेले असायचे. लग्नाची उत्सुकता असली, तरी अनोळखी जोडदीरासह आपलं संपूर्ण आयुष्य घालवायचं, त्याच्या / तिच्या सवयी, आवड यांची काहीचं माहिती नसल्याने लग्नात वधुवरांना दडपण यायचं.

आता ही परिस्थिती पुष्कळशी बदलेली आहे. आता विवाहापुर्वी अनेक महिन्यांचा कालावधी एकमेकांसमवेत, तसेच एकमेकांच्या कुटुंबासमवेत घालविला जात असल्याने नवा जोडीदार, त्याचे कुटुंबीय याबाबत भिती उरत नाही, किंबहुना यामध्ये मुली जास्त उत्साहाने सहभाग घेत नव्या घराशी ओळख करून घेत असल्याने, लग्नानंतरही त्यांना फारसे दडपण येत नाही.

लव्ह मॅरेजमध्ये जोडीदारावर विश्वास असला, तरी नव्या कुटुंबाबद्दल मुलींना उत्सुकता असतेच, लव्ह मॅरेजमध्ये अंतरजातीय, तसचं आतंरधर्मिय लग्न केलं जातं. त्यामुळे लग्नानंतर वरवधुंना नव्या परंपरा, भाषा, चालीरिती शिकून घ्याव्या लागतात.

 

marriage03-marathipizza

अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर एकमेकांना जाणून घेत, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेत संसार करावा लागतो. लव्ह मॅरेजमध्ये जोडीदाराबाबत सगळी माहिती असली, तरी त्याचे कुटुंबिय, त्यांच्या सवयी जाणून घेण्यासाठी वधुला मेहनंत करावी लागते.

 

marriage05-marathipizza

 

अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज, संसाराचा हा प्रवास सुंदर असला, तरी त्यासाठी दोघांनी जबाबदारी पेलणं महत्वाचं आहे.

तुमचं लग्न कोणत्या प्रकारे झालं, कोणत्या पद्धतीने झालं, लग्नात किती खर्च झाला या सगळ्यापेक्षाही संसाराची सुरवात ही एकमेकांच्या साथीने, विशवासाने करणं गरजेचं आहे.  लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज, संसाराची गाडी सुरळीत चालावी असं वाटत असेल, तर जोडीदाराशी असलेलं आपलं नातं अधिक  हे विश्वास, प्रेम आणि आदर यांच्या बळावर सुरु केलं पाहिजे.

असो… सांगायचा मुद्दा एवढाच की अरेंज असो वा लव्ह लग्न करत असताना किंवा करवून देत असताना ज्यांना आयुष्य सोबत घालवायचं आहे त्यांचा विचार नक्की करा कारण संसार त्यांना थाटायचा आहे…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?