' रोहित वेमुलाची आत्महत्या - राजकारण, चौकशी अहवाल आणि - एक दुर्लक्षित सत्य!

रोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक: सागर शिंदे

===

रोहित वेमुला आत्महत्ये प्रकरणी निवृत्त न्यायाधीश रूपनवाल यांनी नुकताच चौकशी अहवाल प्रसिद्ध केला. आणि रोहित ने वैयक्तिक कारणाने आत्महत्या केल्याचे म्हटले. रोहित च्या आत्महत्येनंतर डाव्या चळवळींनी या घटनेचे भांडवल करत तथ्यहीन आरोप केले. ‘रोहित चा संस्थात्मक खून झाला. तो दलित होता त्याच्यावर विद्यापीठाने कार्यवाही केली आणि म्हणून त्याने आत्महत्या केली’. तो दलित होता की नव्हता हा वादच योग्य वाटत नाही. तो डाव्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता होता हे महत्वाचं आहे.

rohit-vemulla-marathipizza01
intoday.in

एक प्रश्न पडतो कि, पीएचडी करणारा, संघटनेचे नेतृत्व करणारा, अन्यायाविरुद्ध झगडणारा, चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्याने असल्या कार्यवाहीने आत्महत्या केली?

विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीमुळे (हॉस्टेल मधून काढले) आत्महत्या केली असे म्हणणे हे त्याच्यावर अन्याय करणारे आहे. रोहित ने आत्महत्ये पूर्वी लिहिलेल्या पत्रात आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही.

‘No one has instigated me, whether by their acts or by their words to this act. This is my decision and I am the only one responsible for this.

रोहित च्या आत्महत्ये पूर्वीचा घटनाक्रमाकडे लक्ष वेधत संस्थात्मक हत्येचा आरोप होतो. काय घडले आत्महत्ये पूर्वी? तर रोहित हा ASA (Ambedkarite Students Association) या चळवळीचा कार्यकर्ता होता त्यांनी याकुब मेनन च्या फाशीला विरोध केला आणि म्हणून ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आणि त्यांच्यात वाद झाला होता. भांडणे झाली. आणि म्हणून विद्यापीठाने कार्यवाही केली. आता असा वाद हा अनेक विद्यापीठांच्या कँपसवर असतोच. वैचारिक मतभेद असतात. रोहितने या वादाचा उल्लेख पत्रात का केला नाही? त्याचे पत्र नीट वाचल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होतो. त्याला विज्ञान लेखक व्हायचे होते. वैयक्तीक जीवनात तो अनेक कारणांनी दुःखी होता. तो स्वतःला एकाकी समजायचा. आणि त्याने त्याच्या पत्रात काही ओळी खोडल्या होत्या. त्यात त्याच्या संघटने संदर्भातील निराशा स्पष्ट जाणवते.

तो लिहितो –

ASA, SFI, anything and everything exist for their own sake. Seldom the interest of a person and these organisations match. To get power or to become famous or to be important in between boundaries and to think we are up to changing the system, very often we overestimate our acts and find solace in traits.

रोहित ने चळवळींच्या चरित्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

rohit-vemulla-marathipizza02
frontline.in

समाजातील काही संघटना एखाद्या समस्येवर केवळ जहाल मांडणी करून, आंदोलन करून, आक्रमक भाष्य करून, समाजात काही चांगले होऊच शकत नाही असे वातावरण निर्माण करतात. पण समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष सकारात्मक काम करीत नाहीत. समस्या जिवंत ठेऊन समाजात त्याचे भांडवल करून नकारात्मकता, द्वेष पसरवतात. अशा संघटनांकडे तरुण आकर्षित होतात मात्र कालांतराने समस्या सुटत नाही हे लक्षात आल्यावर त्यांचा भ्रमनिरास होऊन मनात निराशा निर्माण होते. रोहितनेही आपल्या पत्रात ही निराशा स्पष्टपणे मांडली आहे. पण चळवळीतील कार्यकर्त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

कोणाच्याही द्वेषाचे राजकारण न करता आत्मीयता, बंधुभावाच्या विचाराने व्यवहार होण्याची आज गरज आहे. दलित – सवर्ण, डाव्या – उजव्या च्या वादात किती अडकावे?! कार्यकर्ते एकदम झापडे लावून टोकाचा विरोध करणार असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, शोषण, विषमता, अंधश्रद्धा, जातीअंत हे अनेक प्रश्नकधी सुटणार?  स्वातंत्र्यानंतर लोकशाही व संवैधानिक मार्गांनी या प्रश्नांची तीव्रता अनेक अंशी कमी झाली. पण पूर्णतः प्रश्न सुटले मात्र नाही. आपण ठरवले तर कोणत्याही समस्या सुटू शकतात हा विचारांमधला सकारात्मकपणा आणि आशावादी दृष्टीकोन कायम राहील अशी आपली कार्य पद्धती व दृष्टिकोन असायला हवा. म्हणजेच निराश, हताश न होता, संघर्षातून कोणत्याही समस्येवर मात करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण मनात बाळगून सामाजिक, आर्थिक लोकशाही निर्मितीसाठी बंधुभावाने जिद्दीने काम करण्याची आवश्यकता आहे.

जय हिंद, जय भिम.

संदर्भ :

रोहित चे suicide letter :

Times of India आणि The Indian Express मधील रोहित ने त्याच्या suicide letter मधील खोडलेल्या ओळींविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या. आणि युजीसी संकेतस्थळावरील रुपणवाल अहवाल. लिंक दिल्या आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/Hyderabad-University-student-Rohith-Vemula-felt-unions-failed-him-hints-his-suicide-letter/articleshow/50676434.cms

http://www.ugc.ac.in/ugc_notices.aspx

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “रोहित वेमुलाची आत्महत्या – राजकारण, चौकशी अहवाल आणि – एक दुर्लक्षित सत्य!

  • January 15, 2019 at 11:41 pm
    Permalink

    अशी सगळी तथ्ये दडवून माध्यमांत भलत्याच कंड्या पिकवायच्या व अभाविपच्या सहानुभूतीदारांना सतत बॅकफूटवर ठेवायचे या पुरोगामी दहशतवादाच्या चिंधड्या उडवणारा लेख आहे.
    too good!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?