' चकमक फेम ते शिवसेनेचे नेते, वादग्रस्त प्रदीप शर्मांचा प्रवास जाणून घ्या – InMarathi

चकमक फेम ते शिवसेनेचे नेते, वादग्रस्त प्रदीप शर्मांचा प्रवास जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी  NIA च्या अधिकाऱ्यांनी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापे टाकले होते. प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात.

प्रदीप शर्मा मुंबई पोलीस खात्यामधील ८० च्या दशकातील एक असे नाव जे ऐकल्यावर मोठ-मोठ्या गुन्हेगारांना घाम फुटत असे. प्रदीप शर्मा यांनी त्यावेळी सर्व गुंडांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या हिट लिस्टमध्ये कोणाचे नाव कधी येईल, याचा नेम नव्हता.

चित्रपटामध्ये जसे एखाद्या गोष्टीला रंगवून सांगितलेले असते, तशीच काहीशी रंगतदार त्यांच्या खऱ्या जीवनाची गोष्ट आहे.

 

pradeep sharma inmarathi

 

त्यांना २००८ मध्ये छोटा राजनचा खास माणूस लखन भैय्या याच्या खोट्या एनकाउंटरमध्ये नाव आल्याने सर्विसमधून काढण्यात आले होते.

मुंबईच्या या गाजलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनात अनेक चढ-उतार आले, चला मग आज त्यांच्या जीवनाचा आढावा घेऊया!

 

sharma encounter inmarathgi

 

प्रदीप शर्मा यांचा जन्म १९६१ मध्ये झाला. उत्तरप्रदेशच्या आग्रामधून महाराष्ट्राच्या धुळे या जिल्ह्यामध्ये शर्मा यांचे कुटुंब राहण्यासाठी आले होते.

त्यांचे वडील धुळे शहरातील डिग्री महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे शिक्षक होते. पण मुलगा सरळ पोलीस फोर्समध्ये गेला.

प्रदीप शर्मा यांनी मुंबई पोलीस सर्विस कमिशनची परीक्षा पास केली आणि पोलीस खात्यामधील सर्वात नामवंत अधिकारी अरविंद ईनामदार यांच्या देखरेखीखाली नाशिकच्या पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले.

या बॅचमधून पोलिसांची खूप खतरनाक एनकाउंटर गँग निघाली होती. प्रदीप शर्मा, प्रफुल भोसले, शिवाजी कोलेकर, विनायक सावडे, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, राजू पिल्ले, अशोक बोरकर, असलम मोमीन.

राजू पिल्ले वगळता हे इतर सर्व पोलीस अधिकारी जनतेच्या आणि मिडीयाच्या नजरेमध्ये मोठे स्टार बनले आणि अंडरवर्ल्डच्या नजरेमध्ये खुपू लागले.

 

pradeep sharma shivsena inmarathi

हे ही वाचा – “तुमचा दाऊद तर आमचा गवळी”, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती

प्रदीप शर्मा यांची पहिली पोस्टिंग माहीम पोलीस स्टेशनमध्ये झाली. तिथूनच त्यांना स्पेशल ब्राँचमध्ये पाठवण्यात आले. याच काळामध्ये प्रदीप शर्मा यांची जवळीक छोटा राजन गँगशी वाढली. ओ.पी. सिंह हा प्रदीप शर्मा यांचा खबऱ्या होता. त्याच्या मृत्युनंतर शर्मा हे दाऊद गँगकडे वळले.

मुंबईमध्ये ८०च्या दशकामधील शेवटचा काळ असा होता, जेव्हा अंडरवर्ल्डशी निगडीत सर्व लोकांना एक-एक करून एनकाउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी यमसदनी धाडत होते.

पोलिसांना पूर्णपणे सूट मिळाली होती. कोणत्याही डॉनचा एनकाउंटर केल्यानंतर मिडिया ब्रीफिंगमध्ये प्रदीप आणि त्यांचे साथीदार सांगत असत की,

आम्ही गुन्हेगारांना पकडत होतो. पण त्याने सहयोग केला नाही, त्यांनी पलटवार करण्याचा आणि पळण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही गोळ्या मारल्या.

 

pradeep sharma inmarathi

 

प्रदीप शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी आतापर्यंत खूप एनकाउंटर केले आहेत. स्वतः प्रदीप शर्मा यांच्या नावावर सस्पेंड होण्याच्या आधीपर्यंत ११२ एनकाउंटर होते.

प्रदीप शर्मा यांनी विनोद मटकर, परवेज सिद्धिकी, रफिक डब्बावाला, सादिक कालिया आणि लष्कर-ए-तोयबाच्या तीन सहकाऱ्यांना संपवले होते.

या काळामध्ये एनकाउंटरच्या या रक्तपाताला नाइलाज असल्याने पोलिसांची परवानगी मिळाली होती.

या काळामध्ये प्रदीप शर्मा, विजय साळसकर, असलम मोमीन यांची पोच अंडरवर्ल्डच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत होती. प्रदीप शर्मा आपल्या एनकाउंटर ऑपरेशनमुळे कित्येकवेळा चर्चेमध्ये आले होते.

पण हळूहळू मिडीयाने या वारंवार होणाऱ्या एनकाउंटर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, तेव्हा पहिल्यांदा प्रदीप शर्मा यांचे नाव प्रकाशझोतात आले.

तेव्हापर्यंत सिनियर इनस्पेक्टर पदापर्यंत बढती मिळालेल्या प्रदीप शर्मांबद्दल एक दावा केला जायचा की, मुंबईमधील कोणत्याही ठिकाणच्या खंडणी वसूल केलेल्या पैश्यांमध्ये त्यांची भागीदारी नेहमी असते.

 

pradeeo sharma phone inmarathi

 

भू-माफियासारखे काम करून एका बिल्डर मित्रासाठी प्लॉट हडपण्याच्या आरोपाबरोबरच, २००३ मध्ये त्यांच्या कैदेमध्ये असलेल्या ख्वाजा युनुसच्या मृत्युनंतर प्रदीप शर्मा यांचे ट्रान्सफर करण्यात आले.

लखन भैय्याच्या खोट्या एनकाउंटरमध्ये प्रदीप शर्मांचे नाव आले, अंडरवर्ल्डमध्ये असलेली त्यांची पोच आणि कोट्यवधींची संपत्ती यांसारख्या सर्व गोष्टी प्रदीप शर्मा यांच्या विरोधात गेल्या.

त्यामुळे पोलीस खात्यातील एक जिगरबाज एनकाउंटर स्पेशालिस्ट मध्यंतरी जणू गायबच झाला होता. पण आता पुन्हा एकदा प्रदीप शर्मा पोलीस खात्यात (ठाणे पोलीसमध्ये खंडणी विरोधी पथकात) रुजू झाले.

 

pradeep sharma shivsena inmarathi

 

आपल्याला पुन्हा सेवेत रुजू करुन घ्यावं यासाठी शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती अनेक महिने शर्मा यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने बहुतेक राजकारणात प्रवेश करणार पोलीस वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होती.\

मात्र त्याआधी महाराष्ट्र गृह खात्याने प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलिस सेवेमध्ये दाखल करून घेतली होती

या बातमीने आणखी कोणाला काही फरक पडला असेल किंवा नसेलही पण गुन्हेगारांचे धाबे नक्की दणाणले असतील…

लेकिन पिक्चर अभी बाकी है दोस्त…

२०१९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रात खासदारकीची निवडणूक लढवली, ते महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध राजकीय पक्ष शिव-सेनेकडून तिकीट घेऊन नालासोपारा या विभागातून उभे राहिले! तेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता!

 

pradeep sharma inmarathi

हे ही वाचा – गेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी

पण ही निवडणूक ते सपशेल हरले, बहुजन विकास आघडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी तब्बल ४०००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांना या निवडणुकीत मागे टाकले!

११९ एन्काउंटर करणारे प्रदीप शर्मा यांना या निवडणुकीच्या मैदानात मात्र हार पत्करावी लागली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?