'ती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी!

ती आता रडत नाही, तर खंबीरपणे लढून जग काबीज करते : भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपला देश हा एक पुरुष प्रधान देश आहे, जिथे स्त्री-पुरुष समानता हे केवळ पुस्तकातच वाचायला मिळतं. वास्तविक पाहता अजूनही आपल्या देशात स्त्री आणि पुरुष समान  नाहीत, आजही अमुक काम हे केवळ पुरुषांनीच करायला हवं, महिलांनी फक्त घरात लक्ष द्यायचं, पुरुषाची बरोबरी करू नये अशा प्रकारची विचारसरणी चालते. भलेही शहरांत  हे कमी दिसत असलं तरी आजही खेड्यापाड्यांत स्त्रियांना नेहमी दुय्यम वागणूकच दिली जाते. पण खरं बघितलं गेलं तर स्त्री-आणि पुरुष हे दोघेही सारखेच आहेत, आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामच करत नाही आहेत तर त्यांच्याही पुढे जात आहेत. स्त्रीने ठरवलं तर ती आपल्या इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर यशाचे शिखर गाठू शकते. हेच सिद्ध करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा ७ महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांना पार करत भारताचं नाव जगात उंचावलं…!

 

1. भक्ती शर्मा

bhakti-sharma-marathipizza
alchetron.com

भक्ती शर्मा ही एक भारतीय महिला जलतरणपटू आहे. जिने १४ जानेवारी २०१५ ला अंटार्टिक महासागरात एक अंश डिग्री तापमानात २.२५ किलोमीटर अंतर ५२ मिनिटांत पार करून वर्ल्ड रेकॉर्ड बनविला. हा रेकॉर्ड आपल्या नवे करणारी भक्ती ही जगातील सर्वात लहान आणि आशियातील पहिली महिला आहे. भक्तीचा जन्म ३० नोव्हेंबर १९८९ साली झाला. अडीच वर्षांची असल्यापासूनच तिने जलतरण (स्विमिंग) करण्यास सुरवात केली. २००३ साली तिने पहिल्यांदा उरण बंदर ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत १६ किलोमीटर समुद्राच्या पाण्यात जलतरण केलं होत.

 

2. अरुणिमा सिन्हा

Arumina Sinha-marathipizza
mid-day.com

अरुणिमा सिन्हा ही माउंट एवरेस्ट चढणारी पहिली भारतीय विकलांग महिला आहे. तसेच ती माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूही आहे. अरुणिमा उत्तर प्रदेशात सीआईएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. पण २०११ साली अरुणिमा यांना एका अपराधीक दुर्घटनेला सामोरे जावं लागलं, १२ एप्रिल २०११ साली लखनऊ  ते दिल्ली जात असताना काही दरोडेखोरांनी लुटमारीच्या उद्देश्याने अरुणिमा यांची सोन्याची चेन आणि त्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, अरुणिमा यांनी दरोडेखोरांना विरोध केला तेव्हा त्यांनी अरुणिमा यांना बरेली जवळ चालत्या ट्रेनमधून बाहेर भेकले. या दुर्घटनेत अरुणिमा यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. तरी या दुर्घनेने खचून न जात त्यांनी हिम्मत दाखविली, २१ मे २०१३ साली त्यांनी जगातील सर्वात उंच अशा माउंट एव्हरेस्टची चढाई करून इतिहास घडवला. अशा ही अरुणिमा सिन्हा केवळ विकलांगांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

 

3. हर्षिनी कान्हेकर

harshini kanhekar-marathipizza
mrigaa.com

हर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते. मुली या नाजूक असतात त्यांनी मेहनतीचं किंवा धोकादायक काम करायला नको असं मानणाऱ्यांसाठी हर्षिनी एक चपराकच. हर्षिनी यांना भारतीय सेनेत प्रवेश घ्यायचा होता, ती वर्दी घालणं  हे तीच स्वप्न होत, पण ती एक फायर फायटर बनली. नागपूरच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज येथे त्यांनी २००२ साली प्रवेश घेतला, या कोर्स मध्ये प्रवेश घेणारी ती पहिलीच महिला होती. इतर फायर फायटर प्रमाणेच ती देखील बचाव कार्य करते, यादरम्यान अवजड उपकरणे देखील ती सांभाळते. तिच्या मते कुठलही काम हे केवळ पुरुष किंवा महिलांसाठी नसते.

 

4. मेरी कॉम

mary-kom-marathipizza
india.com

मेरी कॉम यांची कहाणी तर आपल्या सर्वानाच माहित आहे, २०१४ साली प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटाने यांची कहाणी जगासमोर आणली.१ मार्च १९८३ साली मणिपूर येथे मेरी कॉमचा जन्म झाला. तिने पाच वेळा ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅंपियनशिप’ जिंकली आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. तर २०१० च्या आशियाई खेळांत कांस्य आणि २०१४ च्या आशियाई खेळात तिने स्वर्ण पदक कमविले होते. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे एआईबीए ने त्यांना ‘मॅग्निफिसेंट मेरी’ हे नाव दिले.

 

5. पूजा ठाकूर 

Pooja Thakur-marathipizza
thewire.in

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा भारतात आले असताना  इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व करणाऱ्या पूजा ठाकूर या पहिल्या महिला ठरल्या. राजस्थानच्या विंग कमांडर पूजा ठाकूर या भारतीय वायुसेनेच्या प्रशासकीय  मुख्यालयातील प्रचार कक्ष ‘दिशा’ येथे कार्यरत आहेत.

 

6. रश्मी बन्सल

Rashmi_Bansal-marathipizza
yourstory.com

रश्मी बंसल ही एक भारतीय नॉन-फिक्शन लेखिका, उद्योजक आणि युवा तज्ञ आहे. २०१६ साली तिने उद्योजकतेवर सात पुस्तक लिहिली. तिच पहिलं पुस्तक ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ याच्या५.००,००० प्रती विकल्या गेल्या. भारतात प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये हा एक रेकॉर्ड आहे.

 

7.  दीपिका पल्लीकल

dipika pallikal-marathipizza
pinterest.com
दीपिका पल्लीकल स्क्वॅश या खेळात जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तर भारतात १९ वर्षाखालील खेळाडूंमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे.
अशा या भारताच्या रणरागिणी देशातीलच नाही जगातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. 

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?