'भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी तुम्हालाही जगण्याची नवी प्रेरणा देईल

भारताच्या ७ अज्ञात रणरागिणींची कहाणी तुम्हालाही जगण्याची नवी प्रेरणा देईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला देश हा एक पुरुष प्रधान देश आहे, जिथे स्त्री-पुरुष समानता हे केवळ पुस्तकातच वाचायला मिळतं. वास्तविक पाहता अजूनही आपल्या देशात स्त्री आणि पुरुष समान  नाहीत.

आजही अमुक काम हे केवळ पुरुषांनीच करायला हवं, महिलांनी फक्त घरात लक्ष द्यायचं, पुरुषाची बरोबरी करू नये अशा प्रकारची विचारसरणी दिसते. भलेही शहरांत हे कमी दिसत असलं तरी आजही खेड्यापाड्यांत स्त्रियांना नेहमी दुय्यम वागणूकच दिली जाते.

पण खरं बघितलं गेलं तर स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच आहेत. आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामच करत नाहीत, तर त्यांच्याही पुढे जात आहेत.

स्त्रीने ठरवलं तर ती आपल्या इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर यशाचे शिखर गाठू शकते. हेच सिद्ध करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे पार करत भारताचं नाव जगात उंचावलं…!

 

1. भक्ती शर्मा

 

bhakti-sharma-marathipizza

 

भक्ती शर्मा ही एक भारतीय महिला जलतरणपटू आहे. जिने १४ जानेवारी २०१५ ला अंटार्टिक महासागरात एक अंश डिग्री तापमानात २.२५ किलोमीटर अंतर ५२ मिनिटांत पार करून वर्ल्ड रेकॉर्ड बनविला.

हा रेकॉर्ड आपल्या नावे करणारी भक्ती ही जगातील सर्वात लहान आणि आशियातील पहिली महिला आहे. भक्तीचा जन्म ३० नोव्हेंबर १९८९ साली झाला.

अडीच वर्षांची असल्यापासूनच तिने जलतरण (स्विमिंग) करण्यास सुरुवात केली. २००३ साली तिने पहिल्यांदा उरण बंदर ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत १६ किलोमीटर समुद्राच्या पाण्यात जलतरण केलं होत.

 

2. अरुणिमा सिन्हा

 

Arumina Sinha-marathipizza

 

अरुणिमा सिन्हा ही माउंट एवरेस्ट चढणारी पहिली भारतीय विकलांग महिला आहे. तसेच ती माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूही आहे.

पण २०११ साली अरुणिमा यांना एका दुर्घटनेला सामोरं जावं लागलं, १२ एप्रिल २०११ साली लखनऊ ते दिल्ली जात असताना काही दरोडेखोरांनी लुटमारीच्या उद्देश्याने अरुणिमा यांची सोन्याची चेन आणि त्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

अरुणिमा यांनी दरोडेखोरांना विरोध केला तेव्हा त्यांनी अरुणिमा यांना बरेली जवळ चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. या दुर्घटनेत अरुणिमा यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला.

तरी या दुर्घटनेने खचून न जाता त्यांनी हिम्मत दाखविली, २१ मे २०१३ साली त्यांनी जगातील सर्वात उंच अशा माउंट एव्हरेस्टची चढाई करून इतिहास घडवला. अशी ही अरुणिमा सिन्हा केवळ विकलांगांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

 

3. हर्षिनी कान्हेकर

 

harshini kanhekar-marathipizza

 

हर्षिनी कान्हेकर ही भारताची पहिली महिला फायर फायटर आहे. या पुरुष प्रधान देशात हर्षिनी त्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणास्रोत आहे जी लैंगिक विषमतेपुढे जाऊन काहीतरी करू पहाते.

मुली या नाजूक असतात त्यांनी मेहनतीचं किंवा धोकादायक काम करायला नको असं मानणाऱ्यांसाठी हर्षिनी एक चपराकच! हर्षिनी यांना भारतीय सेनेत प्रवेश घ्यायचा होता, ती वर्दी घालणं  हे तीच स्वप्न होतं.

पण ती एक फायर फायटर बनली. नागपूरच्या नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज येथे त्यांनी २००२ साली प्रवेश घेतला. या कोर्स मध्ये प्रवेश घेणारी ती पहिलीच महिला होती.

इतर फायर फायटर प्रमाणेच ती देखील बचाव कार्य करते, यादरम्यान अवजड उपकरणे देखील ती सांभाळते. तिच्या मते कुठलही काम हे केवळ पुरुष किंवा केवळ महिलांसाठी नसतं.

 

4. मेरी कोम

 

mary-kom-marathipizza

 

मेरी कोम यांची कहाणी तर आपल्या सर्वानाच माहित आहे. २०१४ साली प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटाने यांची कहाणी जगासमोर आणली.

१ मार्च १९८३ साली मणिपूर येथे मेरी कोमचा जन्म झाला. तिने पाच वेळा ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅंपियनशिप’ जिंकली आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले होते.

तर २०१० च्या आशियाई खेळांत कांस्य आणि २०१४ च्या आशियाई खेळात तिने स्वर्ण पदक कमविले होते. त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे एआईबीए ने त्यांना ‘मॅग्निफिसेंट मेरी’ हे नाव दिले.

 

5. पूजा ठाकूर 

 

Pooja Thakur-marathipizza

 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा भारतात आले असताना  इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व करणाऱ्या पूजा ठाकूर या पहिल्या महिला ठरल्या.

 

6. रश्मी बन्सल

 

Rashmi_Bansal-marathipizza

 

रश्मी बंसल ही एक भारतीय नॉन-फिक्शन लेखिका, उद्योजक आणि युवा तज्ञ आहे. २०१६ साली तिने उद्योजकतेवर सात पुस्तक लिहिली. तिचं पहिलं पुस्तक ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ याच्या ५.००,००० प्रती विकल्या गेल्या. भारतात प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये हा एक रेकॉर्ड आहे.

 

7.  दीपिका पल्लीकल

 

dipika pallikal-marathipizza

दीपिका पल्लीकल स्क्वॅश या खेळात जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर झेप घेणारी पहिली भारतीय खेळाडू आहे.
अशा या भारताच्या रणरागिणी देशातीलच नाही जगातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?