' हैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” का आहेत? विचारात पाडणारं “जळजळीत” वास्तव! – InMarathi

हैदराबादी मुस्लिम “पाकिस्तान प्रेमी” का आहेत? विचारात पाडणारं “जळजळीत” वास्तव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतीय मुस्लिम “पाकिस्तान धार्जिणा” आहे असं सर्रास बोललं आणि समजलं जातं. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्यावेळी अमुक ठिकाणच्या मुस्लिम मुहल्ल्यात भारताची विकेट पडली / पाकिस्तान जिंकला की फटाके वाजतात असं सांगितलं जातं.

 

Owaisi Inmarathi

 

असं सरसकट सर्वांना एकाच तराजूत मोजण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य याचा प्रत्येक आरोप करणाऱ्याने स्वत: विचार करायला हवा.

अन्यथा भारतीय एकात्मतेला तडे जाणे निश्चित आहे. विशेषतः मुस्लिम बहुल भागांत अश्या अविश्वासाच्या वातावरणाचा प्रभाव जास्त आढळून येतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काश्मीर प्रमाणे हैद्राबाद हा देखील भारतातील मुस्लीमबहुल भागांपैकी एक भाग. फाळणीच्या वेळेस पाकिस्तानने हैद्राबादची मागणी केली होती. परंतु अशी मागणी निव्वळ बालिशपणा असल्याने ती अस्तित्वात आली नाही. परंतु ही मागणी पाकिस्तानने का केली तर तेथील एक गट त्यांच्या बाजूने होता.

 

haidrabad-muslim-marathipizza01
deccanchronicle.com

आज भारतातील सर्वच मुस्लिम समुदायावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. मग वंदे मातरमचा विषय असो, तीन तलाकचा विषय असो किंवा नेहमीच चघळला जाणारा काश्मीर-फाळणी-पाकिस्तानचा विषय असो. त्याबद्दल मुस्लिमांची नेमकी भूमिका जाणून घ्यायला प्रत्येक बिगर मुस्लिम उत्सुक असतो.

पाकिस्तान प्रश्नाबाबत देशातील सर्वात मोठा मुस्लिम प्रांत असलेल्या काश्मीर मधल्या मुस्लिमांना आपल्या बाजूने धरून ठेवण्यात आपण अपयशी ठरलो असल्याचे तेथील फुटीरतावादी गट आणि पाकिस्तान समर्थक जनता नेहमीच दाखवून देत असतात. पण आता याच पाकिस्तान प्रश्नाबाबत देशातील दुसरा मोठा प्रांत असलेल्या हैद्राबादमधील मुस्लिमांचे काय मत आहे ह्याबद्दलही संभ्रमाचं वातावरणच आहे.

मध्यंतरी हैद्राबादमधील मुस्लिम तरुणांना पाकिस्तान प्रेमाचा डोस देऊन त्यांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरु आहे अशी बातमी चर्चेत होती. क्वोरा या सोशल प्लॅटफॉर्मवर असाच काहीसा प्रश्न एका व्यक्तीने विचारला की,

“हैदराबादचे मुस्लिम भारता ऐवजी पाकिस्तानचे समर्थन करतात का?”

 

hyderabad-inmarathi
tripadvisor.in

त्यावर २ मुस्लिमांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, ज्या ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणाऱ्या प्रत्येकानेच वाचाव्या अश्याच आहेत.

स्वत: हैद्राबाद मध्ये राहणारा शारिकझमा हा तरुण म्हणतो,

हो….मी हे अजिबात नाकारणार नाही की हैद्राबादमधील मुस्लिम हा पाकिस्तानचे समर्थन करतो.

“पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा तो मुस्लिम आहे जो अशिक्षित आहे, बिनडोक आहे, जो स्वत:ला मौलवी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींच्या आणि हैद्राबादमधील मुस्लिम पक्षांच्या उग्र राजकीय प्रभावाखाली आहे.”

“आपल्या शत्रू राष्ट्राला चांगले म्हणवणाऱ्या या मुस्लिमाला आपण नक्की काय करतोय, काय बोलतोय याची जराही कल्पना नाही.”

पुढे तो म्हणतो –

तुम्ही जेथे कुठे हे वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की हैद्राबादमधील तरुण वर्गाला पाकिस्तानबद्द्दल प्रेम आहे, ते १००% खरे आहे, पण त्यांना हे प्रेम करायला शिकवणारे येथीलच राजकारणी आहेत.

“हळूहळू ते संपूर्ण मुस्लिम समुदायाचे विचार दुषित करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज भारताविषयी प्रेम बाळगणाऱ्या खऱ्या मुस्लिमांना देखील दोष सहन करावा लागत आहे.”

 

 

शारिकझमा पुढे स्वतःबद्दल काय म्हणतो पहा –

मी स्वत: हैद्राबादी मुस्लीम आहे. मला भारताविषयी अतिशय प्रेम आहे. आजही भारताने पाकिस्तानला क्रिकेटमध्ये हरवल्यावर आम्ही तितकाच जल्लोष करतो जेवढा प्रत्येक सच्चा भारतीय करतो. आम्ही येथे दांडिया खेळतो, गणेशचतुर्थीला देणगी देतो आणि ती प्रत्येक गोष्ट करतो जी धर्माचा विचार न करता भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.

आणि –

मी एवढचं  सांगतो की प्रत्येक धर्मामध्ये मेंढ्यांचा असा स्वार्थी कळप असतो जो आपल्या उपद्व्यापाने संपूर्ण समुदायाला संकटात आणतो आणि तसेच काहीसे आज भारतातील मुस्लिम समुदायाबरोबर होत आहे.

 

haidrabad-muslim-marathipizza02
farm8.staticflickr.com

आता आपण आणखी एका मुस्लिम तरुणाचं याच प्रश्नावरचं मत जाणून घेऊ.

मोईन इख्तार अली हा तरुण आपली प्रतिक्रिया देताना म्हणतो,

मी मुळचा हैद्राबादचा नाही. माझे काही नातेवाईक उत्तर प्रदेश आणि हैद्राबादमध्ये राहतात. तेथे गेल्यावर मला पाकिस्तान समर्थकांची वाढती संख्या प्रकर्षाने जाणवली आणि मुख्य म्हणजे माझी तेथील काही भावंडे देखील या खोट्या प्रचाराला बळी पडली आहेत आणि एक भारतीय म्हणून मला याचे अतिशय दु:ख आहे.

“मी त्यांना जमेल तसे समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याची शिक्षा म्हणून माझ्या एका भावंडाने मला त्याच्या वॉट्सअप ग्रुप मधून काढून टाकले. तो त्या ग्रुपचा अॅडमीन आहे.”

ह्या पुढे मोईन जे म्हणतोय ते लक्षपूर्वक वाचा –

मजेशीर गोष्ट ही आहे, की तो दहावीमध्ये दोनदा नापास झाला आहे. त्याच्याकडे कामधंदा काही नाही, म्हणून तो सध्या हैद्राबाद मधील काही राजकीय पक्षांचा प्रचार करण्याचे काम करतो. हा प्रचार कोणता ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

haidrabad-muslim-marathipizza00

“पाकिस्तानचे समर्थन करणारा प्रत्येक मुस्लिम हा अश्याच पार्श्वभूमीतून वर आलाय. त्यांचे शिक्षण झालेले नाही, त्यांना जगात काय चालले आहे ते माहित नाही. त्यांना येथील स्थानिक राजकारणी हवे तसे वापरून घेत आहेत आणि याची त्यांना पुसटशी कल्पना देखील नाही.”

याचाच प्रत्यय म्हणून स्वत:ला भारतीय मानणाऱ्या मुस्लिमाला देखील पाकिस्तान समर्थक वा हिंदू विरोधी ठरवून दोष दिला जातो. त्याबद्दल प्रत्युत्तर देखील आम्ही करू शकत नाही. कारण जेव्हा आपलेच घर दुषित असेल तर त्याबद्दल इतरांशी भांडून उपयोग तो काय?

अशी आहे आजची स्थिती.

 

haidrabad-muslim-marathipizza03

 

देश आणि धर्माचा अभिमान असणे किंवा तो अभिमान बाळगताना त्याविरोधात बोलणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणे ही काही वाईट गोष्ट नाही. पण आपण त्यांना उत्तर देताना इतर धर्माला सरसकट धारेवर धरणे, प्रत्येक व्यक्तीला दोष देणे हे आपल्याच देशासाठी भल्याचे नव्हे हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.

कारण, सरसकटीकरण केल्याने आपण भारतप्रेमी मुस्लिमांचं जीवनही कठीण करून बसतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?