या मुख्यमंत्र्यांचा अवघ्या १९ महिन्यांचा नातू आहे करोडपती !

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

राजकारण हा पैश्याचा खेळ हे काही उगीचचं म्हटले जात नाही. याला कारण देखील ही राजकारणी मंडळी आणि त्यांची गडगंज संपत्तीचं आहे. त्यांची श्रीमंती पाहिली की कळत नाही हा माणूस जनतेच्या कल्याणासाठी राजकारणात उतरला की स्वत:च्या कल्याणासाठी..?? भारतात असे अनेक पैसेवाले राजकारणी आहेत ज्यांची  संपत्ती ऐकताच डोक चक्रावून जातं. त्यापैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू ! पण इतर राजकारण्यांप्रमाणे हा माणूस आपली संपत्ती लपवून न ठेवता जगजाहीर करतो हे विशेष! गेल्याच महिन्यात त्यांनी आपली संपत्ती पुन्हा एकदा घोषित केली.

InMarathi Android App

chandrbabu-nayadu-wealth-marathipizza01

स्रोत

तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष असलेले चंद्रबाबू नायडू सध्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीची घोषणा करताना एकूण संपत्ती आणि कर्जाचा उल्लेख केला. पण एका गोष्टीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या, ती गोष्ट म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा १९ महिन्यांचा नातू देवांश याच्या नावे असलेली संपत्ती आपल्या आजोबांपेक्षा खूपच जास्त आहे.

chandrbabu-nayadu-wealth-marathipizza03

स्रोत

===
===
===
===

चंद्रबाबू नायडू यांच्या परिवाराची एकूण संपत्ती ७७ करोड इतकी आहे. नायडूंची सध्याची संपत्ती आहे ६७ लाख रुपये, तर त्यांचा नातू देवांशच्या नावावर आहेत तब्बल २.४ करोड रुपयांचे फिक्स्ड डीपोझीट आणि त्याच्या बचत खात्यामध्ये २.३१ लाख रुपये जमा आहेत. हे इथेच संपत नाही, तर हैदराबादच्या जुबली हिल्स या हाय प्रोफाईल एरियामधील ९.५ कोटी किंमतीच्या घराचा देवांश मालक देखील आहे.

chandrbabu-nayadu-wealth-marathipizza02

स्रोत

चंद्रबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश याच्या म्हणण्यानुसार, चंद्रबाबू नायडूंकडे तशी एकूण ३.७३ करोड रुपयांची संपत्ती आहे परंतु त्यांच्यावर बँकेचे ३ करोड रुपयांचे कर्ज देखील आहे.

नायडूंच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्या नावावर ३३.६६ करोड रुपयांची संपत्ती आहे सोबतच त्या बिझनेस हेरीटेज फूड व्यवसायाच्या एम.डी. देखील आहेत.

chandrbabu-nayadu-wealth-marathipizza04

स्रोत

 

चंद्रबाबू नायडू हे तसे आंध्रप्रदेशमधील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व! आपण जाहीर केलेल्या संपत्ती व्यतिरिक्त थोडीशी संपत्ती देखील माझ्याजवळ असेल तर ते सिद्ध करा, मी ती संपत्ती त्या व्यक्तीच्या नावे करेन असे आव्हान चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या विरोधकांना दिले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *