रिमोट, मोबाईल की पॅड आणि कीबोर्डवरील ५ या अंकावर डॉट का असतो? जाणून घ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

न्यूमॅरिक कि-पॅडचा वापर खूप ठिकाणी केला जातो. तुम्ही खूप ठिकाणी या कि-पॅडचा वापर टेलिफोन, मोबाईल हँडसेट आणि रिमोट कंट्रोल यांसारख्या जवळजवळ सर्वच डिव्हाइसेस झालेला तुम्ही पहिला असेलच. या प्रत्येक कि-पॅडच्या ५ या अंकाच्या ठिकाणी उठाव डॉट किंवा बार असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहेत का – की या डॉट किंवा बारचा उपयोग काय असतो? याचा वापर करण्यामागे काही तरी उद्देश नक्कीच असतो, त्यामुळेच त्याला या कि-पॅडमध्ये स्थान मिळाले आहे.

चला मग जाणून घेऊ या ह्या डॉटचा वापर करण्यामागे काय उद्देश असतो ते…

 

5 dot.marathipizza
upload.wikimedia.org/wikipedia

कि-पॅडमधील ५ या अंकावर असलेला उठाव बार किंवा डॉट हा खासकरून अंध व्यक्तींना या कि-पॅडचा वापर करता यावा यासाठी देण्यात आलेला असतो.

न्यूमॅरिक कि-पॅडमध्ये ५ हा अंक मध्यभागी असतो. त्यामुळे या डॉट किंवा बारच्या आधारे अंध व्यक्तींना संपूर्ण कि-पॅडचा वापर करणे शक्य होते. आपल्याला माहित आहे की, ५ या अंकाच्या बरोबर वरती ८ हा अंक असतो, तसेच ५ अंकाच्या बरोबर खाली २ हा अंक असतो, आजूबाजूला ४ आणि ६ हे अंक असतात. ४ या अंकाच्या वर ७ आणि खाली १ हा अंक असतो आणि ६ या अंकाच्या वर ९ आणि खाली ३ हा अंक असतो. अशी ही या कि-पॅडची रचना असते.

५ हा अंक मध्यभागी असल्याकारणाने अंध व्यक्ती हाताची हालचाल जास्त न करता संपूर्ण कि-पॅड योग्यप्रकारे हाताळू शकतात. तसेच नंबरही सहज डायल करू शकतात.

5 dot.marathipizza.2
store.storeimages.cdn-apple.com

जरी सुरुवातीस या कि-पॅडची रचना अंध व्यक्तींसाठी करण्यात आली असली तरी, या गोष्टीचा उपयोग आपल्या लोकांना सुद्धा खूप होतो. या सोयीमुळे कि-पॅड न पाहता आपण नंबर किंवा अंक डायल करण्यास सक्षम बनतो. हा बार किंवा डॉट रात्री किंवा अंधारामध्ये खूप उपयुक्त ठरतो. संगणकाच्या की-बोर्डवर देखील F आणि J या दोन बटनांवर सुद्धा हा उठावदार बार असतो. या दोन बटणांद्वारे आपण संपूर्ण की-बोर्ड हाताळू शकतो.

 

5 dot.marathipizza.1jpg
t.wallpaperweb.org

अश्या या उठावदार बारचा खूप उपयोग केला जातो. मग तुम्ही विचार कराल की, आजच्या स्मार्टफोन युगामध्ये याचा वापर कसा काय होणार, कारण या फोनमध्ये न्यूमॅरिक कि-पॅडच नसतो. आजचे स्मार्टफोन कि-पॅडवाले नसल्याने सॅमसंग, आय-फोन यांसारख्या स्मार्टफोनमध्ये व्हॉइस कमांड हा पर्याय देण्यात आलेला आहे. नोकिया आणि इतर जुन्या कि-पॅडच्या फोनना देखील हा उठावदार बार किंवा डॉट दिलं जात असे.

सहाजिक आहे की या तंत्रामुळे खूप लोकांचा फायदा झाला आहे, कीपॅड वापरणं बऱ्यापैकी सोपं झालं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?