' या दहीकालोत्सवात मुंबई आणि परिसरातील ह्या ५ प्रसिद्ध दहीहंड्यांना नक्की भेट द्या!

या दहीकालोत्सवात मुंबई आणि परिसरातील ह्या ५ प्रसिद्ध दहीहंड्यांना नक्की भेट द्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

दहीहंडी हा मराठी माणसाच्या अगदी जिवाभावाचा सण! गणेशोत्सव वगळता अजून कोणत्या सणाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असतील तर तो म्हणजे दहीहंडी! या सणाला बालगोपाळांनी एकत्र येऊन दोन–तीन महिन्यांत केलेल्या परिश्रमांचा कस लागतो. सर्व बालगोपालांनी जेवढ्या थरांचा सराव केलेला असतो, तेवढे थर लावण्याचा ते पूर्णपणे पर्यंत करतात. या थरांच्या वेडापायी झालेले अपघात पाहता, गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने थरांची मर्यादा घातली होती, या मर्यादेमुळे अनेक मंडळांचा हिरमोड झाला होता. या मंडळांनी या निर्णयाविरुद्ध याचिका न्यायालयामध्ये सादर केली होती, या याचिकेच्या आधारावर उच्च न्यायालयाने आपला निर्णय मागे घेतला आणि बालगोपालांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तर आता पुन्हा एकदा नव्या जोशात सगळी दहीहंडी मंडळे संपूर्ण मुंबईभर आणि उपनगरात आपला डंका वाजवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या या जोशाला प्रोत्साहन देतात मुंबईतील मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या!! आज आपण मुंबई आणि परिसरातील प्रसिद्ध ५ दहीहंड्यांविषयी जाणून घेऊया!!

 

१.संकल्प प्रतिष्ठान, वरळी

dahihandi marathi.pizza01

संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर आयोजित करतात. वरळीच्या जी.एम. भोसले मार्गाच्या जांभोरी मैदानावर ही दहीहंडी बांधण्यात येते. या दहीहंडीला बॉलीवुडचे दिग्गज कलाकार उपस्थित राहत असल्याने ही दहीहंडी खूप प्रसिद्ध आहे. तसेच ही दहीहंडी मुंबईमधील सर्वात उंच असलेल्या दहीहंड्यांपैकी एक आहे.

 

२.आनंद चॅरीटेबल ट्रस्ट, ठाणे

dahihandi marathi.pizza02

ठाण्यामधील आनंद चॅरीटेबल ट्रस्टची दहीहंडी ही देखील एक प्रसिद्ध दहीहंडी आहे. आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्या दहीहंडीचे आयोजन शिवसेनेचे खासदार राजन विचारे करतात. ही दहीहंडी ठाण्यामधील जांभळी नाका येथे आयोजित करण्यात येते. दहीहंडीच्या सणाला आता खूप मोहक रूप प्राप्त झाले आहे, तरीसुद्धा या ठिकाणी असलेले लोक मोठ्या निष्ठेने आणि प्रेमभावनेने या हंडीचे आयोजन करतात.

 

३.रानडे रोड, दादर

dahihandi marathi.pizza03

दादरच्या रानडे रोडवरची दहीहंडी ही मुंबईतील प्रसिद्ध दहीहंड्यांपैकी एक दहीहंडी आहे. या दहीहंडीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. येथे जेव्हा संपूर्ण मुंबईभरातून येणाऱ्या बाळगोपाळांची छोटी पथके थर लावायची कसरत करतात तेव्हा त्यांची ती मेहनत पाहून अगदी स्तब्ध व्हायला होते.

.
४.संकल्प प्रतिष्ठान, ठाणे

dahihandi marathi.pizza04

ईशान्य मुंबई काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात येणारी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी देखील अतिशय प्रसिद्ध आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये निरनिराळ्या लोककलांचे कार्यक्रम सादर केले जातात. ठाण्याच्या रघुनाथ नगरमध्ये ही दहीहंडी बांधण्यात येते. या दहीहंडीला मुंबई आणि ठाण्यामधील खूप मंडळे उपस्थिती लावतात.

 

वांद्रे कॉलनी दहीहंडी

dahihandi marathi.pizza05

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आणि मुंबई युवामोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांच्या सहकार्याने या  दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. मुंबईमधील सर्वात लक्षवेधी दहीहंडी म्हणून या दहीहंडीचा नावलौकिक आहे. मुंबईतील सर्वच मोठ्या मंडळांना आयोजकांतर्फे येथे येण्यासाठी खास आमंत्रण असते म्हणे! तसेच मुंबईच्या जवळ पडत असल्याने येथे बघ्यांची आणि बालगोपाळांची मोठी गर्दी असते.

मंडळी तुम्हाला देखील माहित असतील अश्या काही मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील मोठ्या दहीहंड्या तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

One thought on “या दहीकालोत्सवात मुंबई आणि परिसरातील ह्या ५ प्रसिद्ध दहीहंड्यांना नक्की भेट द्या!

 • August 14, 2017 at 8:59 pm
  Permalink

  1,रघुनाथ नगर ची दहीहंडी काँग्रेस तर्फे नाही, शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांची आहे
  2, टेभी नाका दही हंडी, फिफा 2017 चा माहोल तयार होईल, महाराष्ट्रातील पहिली मनांची दहीहंडी आयोजक एकनाथ शिंदे
  3, संस्कृती प्रतिष्ठान, लोकमान्य नगर ठाणे, प्रो कबड्डी चा माहोल , आयोजक प्रताप सरनाईक
  4, मनसे दहीहंडी: भगवती मैदान ठाणे, 4 मंडळ 10 थराची सलामी देणार, आयोजक, अविनाश भोसले

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?