' पुरुषांनो, `या’ देशात जाण्याचा विचार चुकूनही करू नका… – InMarathi

पुरुषांनो, `या’ देशात जाण्याचा विचार चुकूनही करू नका…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

फार पूर्वीचा काळ हा गुलामगिरीचा होता. राजा किंवा बडी श्रीमंत मंडळी यांच्याकडे सर्रासपणे गुलाम असत. घरात केवळ नोकरदार नसून, गुलामच असत. त्यांना हवं तसं वागवावं आणि राबवून घ्यावं एवढंच या बड्या धेंडांना ठाऊक असायचं.

पूर्वीसारखी गुलामगिरी आता मात्र जगात कुठेही उरलेली नाही. आज सर्वांनाच समान अधिकार आहेत. पुरुष महिला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

आज प्रत्येक क्षेत्रात सर्वांना आपले कर्तुत्व दाखवण्याच्या समान संधी मिळत आहेत. तरीही अनेकदा स्त्रीयांना समान हक्क दिले जात नसल्यावरून वादंग निर्माण होतो, चर्चा केल्या जातात. अगदी आंदोलनांच्या घटनाही घडतात.

महिलांवर होणारा अत्याचार, त्यांच्यावर लादली जाणारी बंधनं यांबाबत होणारी आंदोलनं तुम्ही सुद्धा पाहिली, ऐकली असतीलच!

मात्र नेमकी हीच परिस्थिती पुरुषांच्या बाबतीत उद्भवली तर!

पण मंडळी आज या समानतेच्या जगात एक ठिकाण असेही आहे जेथे स्त्रिया पुरुषांना गुलामासारखं वागवतात. काय म्हणता…? असे होणे शक्य नाही.

पहिल्यांदा तुमचा विश्वास बसणारच नाही, पण मग प्रत्यक्षात या देशाची माहिती घेतली तर… चला तर आज ह्या आधुनिक जगतातील गुलामगिरीबद्दल जाणून घ्याच!

 

owk-marathipizza01

===

===

हे ठिकाण म्हणजे एक छोटेखानी देश म्हणूनच ओळखला जातो. या देशाचे नाव आहे- ‘अदर वर्ल्ड किंगडम’! जेथे केवळ महिलाराज चालतं.

नावाप्रमाणेच एका वेगळ्या विश्वासारखा या देशाचा कारभार आहे. सारं काही अगदी निराळं, इतकं की ज्यावर चटकन विश्वास बसणार नाही.

१९९६ साली चेक रिपब्लिक या युरोपीय देशापासून वेगळं होऊन या देशाने स्वत:चा वेगळा संसार थाटला. म्हणजेच तब्बल २५ वर्षांपूर्वी हा देश अस्तित्वात आला आहे.

या देशात राणीचे ‘सरकार’ आहे. देशाची राणी पॅट्रिसिया-१ ही आहे. खरं तर तिचा येथे एकछत्री अंमल आहे. या देशाला इतर राष्ट्रांनी देशाचा दर्जा दिलेला नसला तरी, या देशाची स्वतःची राजधानी आहे. तिचे नाव आहे ब्लॅक सिटी!

 

owk-marathipizza02

 

चेक रिपब्लिकमधील या देशाची स्वतंत्र ओळख आहे. त्यांचा स्वतःचा झेंडा, चलन, पासपोर्ट आणि पोलिस फोर्स आहे.

गंमत म्हणजे, येथील मूळ निवासी या महिलाच आहेत. येथे पुरुषांना जनावरांप्रमाणे वागवले जाते. पुरुषांना येथे गुलामापेक्षा जास्त महत्त्व दिले जात नाही.

या देशाच्या निर्मीतीमध्ये २ मिलिअन डॉलर म्हणजे तब्बल १२ कोटी रुपये खर्च झाले होते.

 

owk-marathipizza03

 

या आगळ्यावेगळ्या देशात दुसर्‍या देशातून आलेल्या पुरुषांना राणीसाठी खुर्ची बनावे लागते. त्यांच्यावर राणी विराजमान होते.

येथील गुलामांना दारू प्यायची असेल तर ती त्याच्या मालकिणीच्या पायावर टाकली जाते आणि मग त्याला मिळते.

महाराणी पॅट्रिसिया – १ हिलाच देशाच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. तिने या देशाचे नागरिकत्व हवे असलेल्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत.

 

owk-marathipizza04

 

या नियमांनुसार, अशी कोणतीही महिला जी स्वतःच्या संमतीने संबंध ठेवण्याची पात्रता ठेवते. तसेच तिचे किमान १८ वर्षे वय पूर्ण असावे.

तिच्याकडे स्वतःचा एक तरी पुरुष गुलाम असला पाहिजे.

अदर वर्ल्ड किंगडमच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. महिलेला कमीत कमी पाच दिवस महाराणीच्या महालात राहावे लागेल.

 

owk-marathipizza05

 

या देशाचे क्षेत्रफळ तीन हेक्टर म्हणजे साधारण ७.४ एकर इतके असून या देशात अनेक इमारती आहेत. २५० मीटरचे ओव्हल ट्रॅक, लहानसे तळे आणि मैदान आहे.

येथील मुख्य इमारत म्हणजे महाराणीचा महाल. येथूनच संपूर्ण देशाचे प्रशासन चालते. या महालात भोजनाचा मोठा हॉल, ग्रंथालय, दरबार, यातनागृह (जेथे गुलामांचा छळ केला जातो ती जागा), शाळा, जिम आणि कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंग, अंधार कोठडी आहे.

त्याशिवाय स्विंमीग पूल, रेस्टॉरंट आणि नाइट क्लब देखील आहे.

 

owk-marathipizza06

 

काय? कधी विचार केला होता का, की असंही काहीतरी अस्तित्वात असेल म्हणून…?

आजही काही प्रमाणात पुरुषप्रधान असलेल्या आपल्या देशात ही अशी संस्कृती असलेला देश आहे, हे मान्य करणं सुद्धा काहीसं कठीणच आहे. पण, हा असा देश अस्तित्वात आहे, हे मात्र खरं!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?