' आज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती! – InMarathi

आज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: : facebook.com/InMarathi.page

===

तुमची स्वप्ने मोठी असतील आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही जर तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.

जीवनामध्ये अशक्य असे काही नाही, याचाच प्रत्यय एम. रवी यांनी दिला आहे. आज आपण भिलाई स्टील प्लांटचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. रवी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

m ravi.marathi pizza
http://thehitavada.com

एम. रवी यांनी आपल्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने आपले जीवन पूर्णपणे बदलले आहे, आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बंगल्यामध्ये २० वर्षांपूर्वी त्यांना जाण्यासाठी मनाई होती, आज त्याच बंगल्यात ते राहत आहेत.

भिलाई स्टीलचे इतर अधिकारी सुद्धा त्या बंगल्याच्या भव्यतेविषयी नेहमी चर्चा करत असत. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या बंगल्याविषयी खास आकर्षण होते.

एम. रवी यांनी सांगितले की, १९९७ – ९८ मध्ये जेव्हा भिलाई स्टील प्लांटमध्ये एजीएम एसएमएस-१ मध्ये रुजू झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला बंगला दाखवण्यासाठी नेले होते.

 

bhilai-plant-ceo-marathipizza
सदर बंगल्याची प्रतिमा ही केवळ संदर्भासाठी आहे.

एम. रवी यांच्या मुलाने भिलाई स्टील प्लांटच्या एम. डीचा बंगला पाहण्याची इच्छा व्यक्त केली, त्याला समजावून सुद्धा तो ऐकला नाही. त्यामुळे त्याच्या हट्टापाई एम. रवी यांनी त्याला एम. डीचा बंगला पाहण्यासाठी घेऊन जाणे भाग पडले.

त्यांनी आपल्या स्कूटरवरून मुलाला एम. डीचा बंगला दाखवण्यासाठी नेले. पण तेथे गेल्यावर त्यांना तेथील सुरक्षा रक्षकांनी आत सोडले नाही. त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांगितले की, हा भिलाई स्टील प्लांटच्या एम. डीचा बंगला आहे, एखादा बगीचा नाही ज्यामध्ये कोणीही फिरायला येऊ शकेल.

 

m ravi.marathi pizza1
http://sundaycampus.com

ऑगस्ट २०१६ मध्ये जेव्हा एम. रवी भिलाई स्टील प्लांटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले, तेव्हापासून ते या बंगल्यामध्ये राहत आहेत. बंगला क्रमांक -१, ताल्पुरी, भिलाई ते या घराचे मुख्य मालक आहेत.

एम. रवी आणि त्यांच्या मुलाला २० वर्षांपूर्वी या बंगल्यामध्ये जाण्यापासून थांबवले होते, ही घटना एम. रवी विसरले होते. परंतु त्यांच्या मुलाला ती घटना अजूनही लक्षात आहे आणि त्यानेच आपल्या वडिलांना म्हणजेच एम. रवी यांना त्या घटनेबद्दल आठवण करून दिली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com . तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: : facebook.com/InMarathi.page । Copyright (c) मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?