' धक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती!

धक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचा मृत्यू हा आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक होता. आजवर कोणत्याही भारतीय महिलेला जमली नाही ती अवकाशाला गवसणी घालणारी कामगिरी तिने करून दाखवली.

 

nasa-marathipizza01
jansatta.com

नासाच्या सर्वात महत्त्वाच्या मिशन्सपैकी एक असं हे मिशन अगदी सुरळीत पार पडलं, पण पृथ्वीवर परतताना त्यांच्या अंतराळयानात काहीतरी बिघाड झाला आणि त्या अपघातात त्या मिशनवरील सर्वच अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

पण या प्रकरणाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, कल्पना चावला व तिच्या सहकाऱ्यांचे पथक पृथ्वीवर सुरक्षित परत येऊ शकणार नाही, ही बाब नासाच्या मिशन कंट्रोल रूमला माहीत होती. परंतु अंतराळवीरांना ही बाब सांगण्यात आलेली नव्हती.

 

nasa-marathipizza02
wikimedia.org

अंतराळ यान कोलंबियाचे प्रोग्रॅम मॅनेजर राहिलेले वेन हेल यांनी हा खुलासा केला. अंतराळ मोहिमेवरून परत येताना १ फेब्रुवारी २००३ रोजी अमेरिकेचे कोलंबिया हे यान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यात कल्पना चावलासह सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. याबाबत भाष्य करताना हेल म्हणतात की,

या यानात असा बिघाड निर्माण झाला होता की, तो दुरुस्त होऊ शकत नव्हता. हे यान इंटरनॅशनल स्पेस सेंटरपासूनही बरेच दूर होते. त्यामुळे रोबोटिक आर्मद्वारे हा बिघाड दुरुस्त करणेही शक्य नव्हते.

अमेरिकन वृत्तवाहिनी एबीसीने दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिकरित्या या मोहिमेतील त्रुटी मान्य करणारे हेल हे पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

वेन हेल यांचा ब्लॉग तुम्ही येथे वाचू शकता.

 

nasa-marathipizza03
nasa.gov

हेल यांनी म्हटले आहे की,

मिशन मॅनेजमेंट टीमचे फ्लाइट डायरेक्टर जॉन हारपोल्ड यांनी या बिघाडावर चर्चा केली होती. त्यांचे म्हणणे असे होते की, आम्ही टीपीएस थर्मल प्रोटेक्शन सिस्टिममध्ये निर्माण झालेला बिघाड कुठल्याही परिस्थितीत दुरुस्त करू शकत नाही. जर तो बिघडला असेल तर त्याच्या दुरुस्तीचा प्रयत्न न करणेच योग्य राहील. मला असे वाटते की, कोलंबियाच्या चालक टीमला त्याबाबत सांगू नये.

हेल यांच्या मते, अंतराळवीरांचा मृत्यू हा निश्चीतच होता, कोणत्याही परिस्थितीत त्यांना वाचवणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण करण्याऐवजी त्यांनी अचानक मृत्यूला कवटाळणे सोयीस्कर होते.

अन्यथा जर त्यांना या बिघाडाची कल्पना दिली असती आणि त्यांना यानातून बाहेर पडण्यास सांगितले असते तर अंतराळातच कुठेतरी भटकले असते, जेथून त्यांचा शोध घेणे मुश्कील झाले असते.

 

nasa-marathipizza04
dailymail.co.uk

यात नासाची चूक आहे असं म्हटलं तरी, नीट विचार केला तर लक्षात येतं की, जे त्यांच्या हातातच नव्हतं त्यात त्यांना दोष देऊन तरी काय उपयोग?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “धक्कादायक : कोलंबियाच्या अपघाताची नासाला कल्पना होती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?