' पेंटॅगॉन – अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक, एक रंजक इतिहास – InMarathi

पेंटॅगॉन – अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक, एक रंजक इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पेन्टागोन…. जगाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या शक्तिशाली संरक्षण दलाचे भक्कम मुख्यालय… जगतील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश होतो.

तब्बल ६० लाख स्वेअर फुट जमिनीवर पसरलेल्या अवाढव्य अश्या पेन्टागोनबद्दल आज अगदी इत्यंभूत माहिती जाणून घेऊया!

 

Pentagon-marrathipizza01
theamericanconservative.com

 

२७ मे १९४१ रोजी जर्मनीने सोवियेत युनियन वर केलेल्या आकस्मिक हल्ल्यानंतर ३ आठवड्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रेन्क्लीन डी. रुझव्हेल्ट यांनी अमेरिकेमध्ये आणीबाणी जाहीर केली. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते. दुसरीकडे अमेरिकेचे वॉर डिपार्टमेंट अगदी वेगाने वाढत चालले होते.

एव्हाना वॉशिंग्टनच्या १७ इमारतींमध्ये २४,००० कर्मचारी अहोरात्र काम करत होते. पुढील वर्षी हाच कर्मचाऱ्यांचा आकडा वाढून ३०,००० होण्याची शक्यता होती. अमेरिकन सरकारला आपले वॉर डिपार्टमेंट शक्य तितके मजबूत हवे होते, त्या मागे एकच कारण होते ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची झळ थेट आपल्या नागरिकांना बसू नये.

शेवटी निर्णय झाला आणि वाढत्या वॉर डिपार्टमेंटला एकाच जागी एकत्र आणण्यासाठी इमारत उभारण्याचे काम सुरु झाले. ११ सप्टेंबर १९४१ रोजी पेन्टागोनच्या बांधकामाला सुरुवात झाली.

तब्बल १०,००० पेक्षा अधिक कामगार या इमारतीच्या बांधकामासाठी झटत होते. तरीही काही केल्या ठरलेल्या वेळेनुसार काम होत नव्हते. शेवटी एक वेळ अशी आली जेव्हा १५,००० कामगारांना २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करावे लागले.

३० एप्रिल १९४२ रोजी पेन्टागोनमध्ये पहिल्या कर्मचाऱ्यने पाउल ठेवले. पण अधिकृतरीत्या इमारत ही १४ जानेवारी १९४३ रोजी खुली करण्यात आली. पोटोमॅक नदीवर वसलेली ही इमारत म्हणजे एक महाकाय वसाहत म्हणावी इतकी मोठी आहे.

पेन्टागोनच्या बांधकामासाठी पहिल्यांदा ३ कोटी ५० लाख डॉलर्सची तरतूद करण्यात आली होती, पण शेवटी इमारत तयार झाली आकडा उघड करण्यात आला तेव्हा लक्षात आले की, इमारत उभारणीसाठी दुप्पट म्हणजे जवळपास ७ कोटी ५० लाख डॉलर्सचा खर्च आला आहे.

 

Pentagon-marrathipizza02
wikimedia.org

 

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आता पेन्टागोनचा उपयोग काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. कारण पेन्टागोन कार्यरत ठेवण्याचा खर्च अतिशय जास्त होता. अनेकांनी असेही मत मांडले की, गरज नसताना फुकटचा खर्च करण्याची गरज नाही. जेव्हा गरज भासेल तेव्हाच त्याचा उपयोग करण्यात यावा.

अनेकांनी या इमारतीचा हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी सारखा वापर करण्यात यावा असेही सुचवले. पण सरकारने मात्र नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट अंमलात आणून पेन्टागोन ही इमारत संरक्षण खात्याच्याच अखत्यारीत ठेवली.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आता शीत युद्धाचे वादळ घोंघावू लागले होते. अश्या वेळेस अमेरिकेचे संरक्षण दल अतिशय मजबूत स्थितीत असावे म्हणून तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रुमॅन यांनी अमेरिकेचे नौदल, सैन्य आणि वायुदल यांनी पेन्टागोनमध्ये एकत्रित काम कारावे असा मनसुबा व्यक्त केला.

पुढे जागतिक पटलावर अनेक घडामोडी घडल्या. १९४९ च्या ऑगस्ट महिन्यात रशियाने सैबेरियावर अणुहल्ला केला, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाची जुंपली, तेव्हा प्रत्येक वेळी अमेरिकेने या कलहात सहभाग घेतला आणि परिस्थिती शमवण्याचा प्रयत्न केला, या सर्व घडामोडीत पेन्टागोनची भूमिका महत्त्वाची ठरली, कारण येथूनच अतिशय शांत डोक्याने विचार करून सर्व चाली खेळल्या जात असत.

१९५० पर्यंत पेन्टागोनमधील कर्मचारी संख्या ३३,००० च्यावर पोचली होती आणि सातत्याने वाढत होती. एकवेळ अशी आली जेव्हा सर्वच राष्ट्रांना अमेरिकेच्या वाढत्या संरक्षण दलाची जाणीव झाली. जागतिक महासत्ता बनणाऱ्या अमेरिकेचे पेन्टागोन हे प्रतिक बनले होते.

पण अमेरिकेच्या या वाढत्या ताकदीला शह दिला व्हियेतनाम या देशाने, व्हियेतनाममध्ये अमेरिकन सैन्याची झालेली हानी पाहून सामान्य अमेरिकन नागरिक खवळला.

२१ ऑक्टोंबर १९६७ रोजी युद्धाला विरोध करणारे तब्बल ३५,००० विरोधक पेन्टागोनवर चाल करून गेले. त्यांना रोखण्यासाठी २००० सैनिक तयार होते अश्रुधुराचा मारा करायला.

 

Pentagon-marrathipizza03
marchonpentagon1.weebly.com

 

ज्या देशवासीयांच्या रक्षणार्थ पेन्टागोनची निर्मिती झाली होती, त्याच पेन्टागोनला आता नाईलाजाने आपल्याच देशवासीयांविरोधात संघर्ष करावा लागला. रात्रभर सगळा सावळा गोंधळ सुरु होता, अखेर विजय पेन्टागोनचाच झाला.

एकाही आंदोलकाला मारहाण झाली नाही की कोणी जखमी झाले नाही. अतिशय संयमीरित्या पेन्टागोनने ती स्थिती हाताळली. पण युद्धाला विरोध करणाऱ्यांचा राग काही शमला नव्हता.

१९७२ च्या मे महिन्यात एका गटाने अतिशय शिताफीने पेन्टागोनच्या वूमन रेस्टरूममध्ये एक बॉम्ब लावला. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली नाही, परंतु पेन्टागोनचे ७५ हजार डॉलर्सचे मात्र नुकसान झाले.

१९९२ मध्ये पेन्टागोनच्या नुतनीकरणाचा घाट घातला गेला. त्यासाठी तब्बल १ बिलियन डॉलर्स मंजूर करण्यात आले. पण दरम्यानच्या काळात पुन्हा खर्च वाढल्याने आणि काम वेळेत न झाल्याने काम थांबवल्याचे सांगण्यात आले. पण त्या मागचे खरे कारण होते अमेरिकेने केनिया आणि टांझानियामध्ये १९९८ मध्ये टाकलेले बॉम्ब्स!

११ सप्टेंबर २०००१ मध्ये पेन्टागोनचे नुतनीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले. आणि त्याच दिवशी सकाळी ९:३७ च्या सुमारास अमेरिकन एयरलाईन्सचे फ्लाईट 77 येऊन पेन्टागोनवर आदळले.

हा कोणताही अपघात नव्हता, हा घातपात होता. अमेरीकेवर झालेला दहशतवादी हल्ला. ते विमान हायजॅक करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे निर्माण झालेली आग तब्बल ३६ तासांनंतर विझवली गेली.

 

Pentagon-marrathipizza04
army.mil

 

या दुर्घटनेत १८९ जीव मृत्युमुखी पडले, त्त्यापैकी १३५ लोक हे पेन्टागोनमधील कर्मचारी होते, तर उर्वरित ६४ लोक हे विमानातील प्रवाशी होते, त्यात विमानाचे अपहरण करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा देखील समावेश होता.

अल-कायदा कडून याचा बदला घेण्याचे पेन्टागोनने ठरवले होतेच, पण तेवढ्यात इराकमध्ये युद्धाचे ढग जमू लागले आणि पेन्टागोनचे संपूर्ण लक्ष तिकडे केंद्रित झाले.

पेन्टागोनला पुन्हा नव्याने उभे राहायचे होते, त्यासाठी प्रथमच ठरलेल्या वेळात म्हणजे ११ सप्टेंबर २००२ मध्ये पेन्टागोन पुन्हा सज्ज झाले येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी!

असा आहे हा पेन्टागोनचा आजवरचा प्रावास, कधी अमेरिकेला भेट दिलीत तर बाहेरून का होईना पण पेन्टागोन एकदा तरी प्रत्यक्ष डोळ्याने पाहाच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?