'महाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी!

महाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा होणार कमी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

प्लास्टिक कचरा हा पर्यावरणाशी निगडीत सर्वात त्रासदायक problems पैकी एक आहे. पर्यावरण खात्याला tension आलंय अशी ही समस्या सोडवण्याचं केंद्र आणि राज्य सरकारने मनावर घेतलं आहे. त्यासाठी, एक अभिनव मार्ग निवडल्या गेलाय…प्लास्टिकचा सदुपयोग करून घेण्याचा…!

प्लास्टिक म्हणलं की “कचरा”च डोळ्यासमोर येतो. प्लास्टिकचे काही चांगले पण उपयोग आहेत…हे उपयोग करून घेण्यासाठी विशेष कष्ट घेतले आणि प्लास्टिकचा कचरा, तिकडे वळवला, तर समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. हाच विचार करून – सरकारने एक पाऊल उचललं आहे.

image.adapt.990.high.plastic_oil_plastic_pieces.1415721182099

 

८ मार्च २०१६ रोजी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ह्यांनी ‘नागपूर महानगरपालिकेत’ एका कार्यक्रमात टार रोड मध्ये प्लास्टिक कचरा वापरण्याच्या योजनेचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हापासून ह्यावर आवश्यक ते संशोधन होत आहे. आणि आता महाराष्ट्र सरकारच्या शिफारस पुस्तिकेत ‘प्लास्टिक कचरा’ वापरण्यावर विशेष भर दिला गेला आहे.

हज्जारो कोटींच्या रस्त्यांमध्ये काय वापरायचं – तर प्लास्टिकचा कचरा! कारण –

  • प्लास्टिकचा वापर केल्याने डांबरी रस्त्याचे काही मुख्य गुणधर्म जसे की Marshall stability, strength, fatigue life ह्यांमध्ये कमालीचा फरक पडून रस्त्याचं आयुष्य वाढतं.
  • रस्त्याचा water resistance, म्हणजेच, पाण्याशी दोन हात करण्याची ताकद वाढते
  • रस्त्याची पत सुधारते

म्हणजेच – सुधारित गुणधर्माचा चांगला रस्ता, कमी खर्चात…!

ह्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व राज्य सरकारांना IRC (Indian Roads Congress) च्या निर्देशांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Road_Repairing_Work_-_Padmapukur_Water_Treatment_Plant_Road_-_Howrah_2011-12-18_0407

 

Indian Roads Congress च्या मते,

एकूण टार च्या वजनाच्या ५% प्लास्टिक कचरा वापरला, तर आपल्याला हवे असलेले फायदे साध्य होतील. म्हणजे प्रत्येक १०० किलो टार मागे ३-६ किलो प्लास्टिक चा कचरा आपण वापरू शकतो.

 

तर मित्रांनो, वापरातील प्लास्टिक पिशव्या आता कमी झाल्याच आहेत, तरी ज्या आहेत त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या ह्या प्रयत्नाला आपण शुभेच्छा देऊया!

स्रोत : The better India

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 49 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?