' मृत्यूवर विजय मिळवणारा ‘डेडमॅन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘अंडरटेकर’च्या अचाट गोष्टी! – InMarathi

मृत्यूवर विजय मिळवणारा ‘डेडमॅन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘अंडरटेकर’च्या अचाट गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

जगभरातील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शो म्हणजे – डब्लू डब्लू ई! जगभरातील तरुण वर्गाला या शो ने इतके प्रचंड वेड लावले आहे की, हा शो स्क्रिप्टेड असतो हे माहिती असून देखील त्याची पॉप्यूलॅरिटी तसूभरही कमी झालेली नाही.

कारण जरी हा शो खोटा असला तरी त्यातील सुपरस्टार इतकी ‘खरी’ वाटावी अशी फाईट करतात की त्यात अधिकच इंटरेस्ट निर्माण होतो.

याच सुपरस्टारपैकी सर्वात गाजलेला डब्लू डब्लू ई सुपरस्टार म्हणजे अंडरटेकर होय!

 

Undertaker-inmarathi

 

अंडरटेकरचे खरे नाव मार्क विल्यम कॅल्वे होय! रेस्लेमेनियाच्या ३३ व्या पर्वात रोमन रिंग्जकडून पराभव पत्करल्यानंतर अंडरटेकरने निवृत्ती स्वीकारली. पण आजही अंडरटेकर प्रेक्षकांच्या मनातून दुर झालेला नाही.

चला आज या प्रेक्षकांच्या सर्वात आवडत्या रेसलरबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया!

१. अंडरटेकरला मोटारसायकलचे प्रचंड वेड आहे. 

 

Undertaker-inmarathi

 

अंडरटेकरकडे हार्ले-डेविडसन आणि वेस्ट कॉस्ट चॉपर्स यांसारख्या मोटर सायकलचा संग्रह आहे. त्याने पहिली मोटर सायकल १९९१ मध्ये खरेदी केली होती, जेव्हा त्याने सर्व्हायव्हर सीरीजमध्ये डब्लू डब्लू एफ चॅम्पियनसाठीच्या मॅचमध्ये हल्क होगनला हरवले होते.

२. अंडरटेकर हा उत्तम बास्केटबॉलपटू होता

 

Undertaker-inmarathi

 

अंडरटेकर हा एक प्रतिभाशाली बास्केटबॉल खेळाडू होता. त्याला लहानपणापासूनच बास्केटबॉलची आवड होती. टेक्सास वेस्लेयनला बास्केटबॉलच्या मॅच खेळायला जाण्याआधी २ वर्षापासून टेक्सास महाविद्यालयामध्ये तो बास्केटबॉल खेळत होता.

३. अंडरटेकरने ब्रॅड पिट आणि एंजेलिना जोली यांना एकदा आपले घर भाड्याने दिले होते.

 

undertaker-facts-inmarathi

 

रॉन चार्लीस, ज्याने अंडरटेकरचे घर तयार केले, तो सांगतो की,

या घराचा सर्वोत्तम भाग म्हणजे, त्याच्या एका बाजूला अंडरटेकरच्या सांगण्यावरून सरावासाठी वेगळ्या रेसलिंग रिंगची उभारणी केली आहे.

हे अतिशय मोठे घर आहे, आणि अश्या मोठ्या घरामध्ये त्याला साजेशी मोठी खोली आणि त्यात मोठा बेड अंडरटेकरला हवा होता आणि यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागली हे वेगळ्याने सांगायला नको, पण शेवटी अंडरटेकरने स्वत:ला हवे तसेच ते घर बनवून घेतले.

ब्रॅड पिट एका नवीन चित्रपटाच्या शुटींगसाठी अंडरटेकर राहत असलेल्या भागामध्ये आला होता, तेव्हा आपली पत्नी एंजेलिना जोली हिची गैरसोय होऊ नये म्हणून ब्रॅड पिटने अंडरटेकरचे टेक्सासमधील घर भाड्याने घेतले होते.

४. अंडरटेकरला तीन मुले आहेत

 

undertaker-facts-inmarathi

 

अंडरटेकरची पहिली पत्नी जॉडी हिला एक मुलगा आहे, त्याचे नाव गनर आहे. त्याचा जन्म १९९३ ला झाला होता.

त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सारा आहे, साराला दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव चेसी, तिचा जन्म २००२ मध्ये झाला होता आणि लहान मुलीचे नाव ग्रेसी आहे, तिचा जन्म २००५ मध्ये झाला होता.

५. अंडरटेकर हा MMAचा मोठा चाहता आहे.

 

undertaker-facts-inmarathi

 

अंडरटेकर हा मिक्स मार्शल आर्ट्सचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याने MMA च्या अनेक सामन्यांना स्वत: प्रेक्षक म्हणून न चुकता हजेरी लावली आहे.

६. अंडरटेकर संगीताचा मोठा चाहता आहे. 

 

undertaker-facts-inmarathi

 

अंडरटेकरला गाण्यांची, संगीताची प्रचंड आवड आहे. तो निक केवच्या संगीताचा खूप मोठा चाहता आहे. निक केवची बर्थ डे पार्टी आणि द बॅड सिड्स हि गाणी त्याला भयंकर आवडतात असे त्याने स्वत:हून एका मुलाखतीत कबुल केले होते.

तसेच ZZ Top, AC/DC, Kiss, Black Sabbath, Guns N’ Roses, Metallica, Iron Maiden and Black Label Society यांसारखे बँड सुद्धा त्याच्या आवडीचे आहेत.

७. अंडरटेकरला गोल्फ हा खेळ आवडतो.

 

undertaker-facts-inmarathi

 

एक मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, त्याला गोल्फ खेळायला सुद्धा आवडते. मी खूप वाईट गोल्फ खेळतो, म्हणून मी सहसा तो लोकांसमोर खेळत नाही, पण त्यात प्राविण्य मिळवण्याची माझी खूप इच्छा आहे.

८. त्याचे रिंग मधले सर्वात पहिले नाव केन द अंडरटेकर असे होते.

 

undertaker-facts-inmarathi

 

आपल्या रेसलिंग कारकीर्दीमध्ये अंडरटेकर आठवेळा वेगवेगळ्या नावांनी रिंगमध्ये उतरला होता. जेव्हा तो पहिल्यांदा रिंगमध्ये उतरला होता, तेव्हा त्याला “मास्टर ऑफ पेन” म्हणून ओळखले जाई.

त्यानंतर त्याला Texas Red, The Punisher, Punisher Dice Morgan, Commando, Mean Mark Callous and, my personal favorite, Kane The Undertaker ही नावे मिळाली,

९. रेस्लेमेनिया मधील एक विजय त्याने डिसक्वालीफिकेशनने मिळवला होता.

 

undertaker-facts-inmarathi

 

नवव्या रेस्लेमेनिया इवेंटमध्ये जेव्हा अंडरटेकरचा जायंट गोन्झालेझ बरोबर सामना होता, तेव्हा हा सामना अंडरटेकर डिसक्वालीफिकेशनने जिंकला होता.

त्यावेळी जायंट गोन्झालेझ याने कपड्यावर क्लोरोफॉर्म लावून अंडरटेकरला बेशुद्ध केले होते, पण थोड्या वेळाने अंडरटेकरने परत येऊन त्याच्याशी फाइट केली. अंडरटेकरच्या कारकिर्दीविषयी चर्चा करताना या सामन्याची आजही नक्की आठवण काढली जाते.

१०. समरस्लॅममध्ये त्याने स्वत:लाच पराभूत केले होते.

 

undertaker-facts-inmarathi

 

१९९० मध्ये दहाव्या रेस्लेमेनिया नंतर जेव्हा दुखापतीमुळे अंडरटेकर बाहेर गेला होता, त्यावेळी टेड टेड डिबिझ याने नवीन अंडरटेकरला सादर केले, परंतु ब्रायन लीने सांगितले की, तो खोटा अंडरटेकर आहे आणि त्याने त्याचा उल्लेख ‘अंडरफेकर’ असा केला होता.

त्यानंतर स्वतः अंडरटेकरने येऊन त्या खोट्या अंडरटेकरशी फाइट करून त्याला अद्दल घडवली आणि ‘अंडरटेकरला’ पराभूत केले.

मंडळी तुमच्याही ओळखीतला कोणी डाय हार्ट अंडरटेकर फॅन असेल तर त्याच्यासोबतही हा लेख शेअर करा, भलताच खुश होऊन जाईल तो अश्या कधीही न कळलेल्या गोष्टी जाणून घेऊन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?