' ११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली!

११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

डायनासोर हा प्राणी वैज्ञानिक दृष्ट्या जरी अस्तित्वात होता असे मानले जात असले तरी बरीच लोक अशीही आहेत ज्यांना डायनासोर म्हणजे दंतकथा वाटते. डायनासोर केवळ कथांमध्ये किंवा हॉलीवूडच्या चित्रपटांमध्येच दिसतात असं या गटाचं ठाम मत. तर मंडळी डायनासोरला खोटं समजणाऱ्यांना खोटं पाडणारं एक संशोधन पुढे आलंय.

कॅनडामध्ये मध्ये नोडोसोर नामक डायनासोरचे अवशेष आढळून आले आहेत, जे तब्बल ११० दक्ष लक्ष वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नव्या शोधामुळे सर्वच अभ्यासकांना नवा हुरूप मिळाला आहे.

nodosaur-fossil-marathipizza01
i.dailymail.co.uk

२०११ मध्ये शॉन फंक नावाचा एक ऑपरेटर आल्बर्टाच्या एका एनर्जी कंपनीमध्ये काम करत होता. एके दिवशी कच्च्या तेलासाठी खोदकाम सुरु असताना त्याला करड्या रंगाची काही वस्तू जमिनीत असल्याची आढळून आली. परंतु असं काही कधीही पूर्वी पाहिल्याचं त्याला आठवत नव्हतं. आज संशोधना अंती ६ वर्षांनी हे आढळून आलं आहे की ती एखादी गोष्ट नसून तो भलामोठा डायनासोर आहे.

वैज्ञानिकांच्या मते दुसऱ्या प्राचीन डायनासोरच्या तुलनेमध्ये या डायनासोरची त्वचा काहीशी चांगल्या स्थितीमध्ये आहे. ड्रॅगन सारखा दिसणारा हा जीव म्हणजे नोडोसोर नामक डायनासोर असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत.

nodosaur-fossil-marathipizza02
realclearlife.com

संशोधकांच्या मते,

डायनासोरच्या त्वचेचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघू शकतो की एखाद्या मांसाहारी डायनासोरने याच्यावर हल्ला केला असावा, जेव्हा याचा मृत्यू झाला असावा तेव्हा नदी मध्ये पडून, तेथून वाहत त्याचे शव समुद्रात पोहोचले असावे. या डायनासोरच्या काळात आल्बर्टा शहर हे दक्षिण फ्लोरिडा सारखे उष्ण तापमानाचे होते. येथील नद्या आणि समुद्र दूरपर्यंत पसरलेले होते.

Current Biology नावाच्या जर्नलमध्ये नोडोसोर डायनासोर हा सर्वात संरक्षित अवशेष म्हणून घोषित करण्यात आला आहे, तसेच नोडोसोर ही डायनासोरच्या सर्वोत्कृष्ट प्रजातींपैकी एक प्रजाती असल्याचा देखील उल्लेख आहे.

nodosaur-fossil-marathipizza03
cdninstagram.com

शोधण्यात आलेला हा डायनासोर १८ फुट म्हणजेच ५.५ मीटर लांब असून त्याचे वजन १३०० किलो इतके आहे. सध्या कॅनडाच्या Royal Tyrell Museum मध्ये हा डायनासोर ठेवण्यात आला असून त्याला पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत.

म्युजियमचे वैज्ञानिक सेलेब ब्राउन यांच्या मते,

त्यांनी आजवर पाहिलेल्या डायनासोर पैकी हा सर्वात सुंदर डायनासोर आहे, त्यामुळेच हे संशोधन इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल यात शंका नाही.

या शोधामुळे संपूर्ण वैज्ञानिक जग मात्र नवं काहीतरी जगासमोर येईल याची खात्री बाळगून आहे!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?