' एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा...

एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पैशांच्या बाबतीत डिजिटल पेमेंट सुरु झाल्यापासून प्लास्टिक मनीचं महत्त्व फारच वाढलं आहे.  सध्याचं युग हे खिशात पैसे नाही तर एटीएम कार्ड घेऊन फिरण्याचं आहे.

हल्ली कोणीही स्वत: बरोबर रोख रक्कम घेऊन फिरत नाही, जेव्हा त्याला पैश्यांची गरज भासते तेव्हा तो आपल्या बँकेतील जमा असलेली रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करतो.

अर्थात, यामुळे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली जाऊ लागली. यातीलच एक म्हणजे एटीम हॅकिंग…

 

 

आपल्याला हवी असलेली रक्कम, आपण त्वरीत एटीएममधून काढू शकतो. पण सध्या एटीएम कार्ड हॅक होण्याच्या खूप वार्ता तुमच्या कानावर आल्या असतील. एटीएम कार्ड हॅक होऊन आजवर अनेक लोकांची लूट करण्यात आलेली आहे.

आज आपण जाणून घेऊया त्या पद्धती ज्यांच्या सहाय्याने ठग एटीएम कार्ड हॅक करतात, जेणेकरून तुम्ही असा धोक्यापासून सतर्क राहू शकाल.

 

१. स्कीमर

 

atm-hacking-marathipizza01

 

ज्या जागेवर एटीएम कार्ड आपण इन्सर्ट करतो, त्या जागेवर एक पातळ चिप बसवलेली जाते. ही चिप इलेक्ट्रॉनिक डेटा कॉपी करते, त्याला स्कीमर असे म्हटले जाते.

या माध्यमातून तुमच्या एटीएम कार्डची सगळी माहिती हॅकरला मिळू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाल तेव्हा या गोष्टीकडे नक्की नजर टाका की, कार्ड स्वाइप करतेवेळी त्याजवळील लाईट चालू बंद होतो आहे की नाही.

जर तो लाईट पेटत नसेल तर त्यामध्ये स्कीमर असण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी कार्ड काढून चेक करावे आणि काही हॅकिंगच्या संशय आल्यास एटीएममध्ये दिलेल्या टोल फ्री नंबरला कॉल करून लगेच सूचित करावे.

 

२. स्पाय कॅमेरा

 

atm-hacking-marathipizza02

एटीएम मशिनच्या बरोबर वरच्या भागात स्पाय कॅमेरा लावण्यात आलेला असतो. कधी मशिनच्या वर हा कॅमेरा असतो, तर कधी मशिनच्या की– बोर्डच्या वर हा स्पाय कॅमेरा लावण्यात येतो.

यापासून वाचण्यासाठी पासवर्ड टाईप करताना, आपला दुसरा हात की – बोर्डवर ठेवून पासवर्ड टाईप करावा, त्यामुळे स्पाय कॅमेरा जरी लावला असेल तरीही तो आपल्या पासवर्ड कॅच करू शकत नाही.

 

३. किपॅडच्या वर कवर प्लेट

 

atm-hacking-marathipizza03

 

काही ठिकाणी तुमच्या कार्डचा पासवर्ड मिळवण्यासाठी की-पॅडच्या वर अजून एक खोटी कवर प्लेट लावण्यात येते त्यामुळे तुम्ही टाईप केलेला पासवर्ड त्यामध्ये स्टोअर राहतो.

तसेच एटीएम कार्ड इंसर्ट करण्याच्या जागेवर एक पातळ पट्टी बसवली जाते, त्यामध्ये रेकॉर्डिंग कॅमेरा असतो, जो तुमची सर्व माहिती हस्तगत करतो आणि ठग खोटे कार्ड बनवून तुमच्या खात्यामधील रक्कम काढू शकतो.

 

४. एटीएम मशिनवरील संशयास्पद गोष्ट

 

एटीएममध्ये गेल्यावर त्या मशिनच्या कार्ड स्लॉट कडे नीट लक्ष द्या. जर तुम्हाला वाटले की, एटीएम कार्डच्या स्लॉटशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तो स्लॉट हलवला गेला आहे, तर अश्या स्लॉटचा वापर करणे टाळावे.

 

atm-hacking-marathipizza04

 

कसे सुरक्षित रहाल?

१. बँकेच्या एसएमएस सेवेचा फायदा घ्या, जेणेकरून कोणताही व्यवहार झाल्यावर ताबडतोब तुम्हाला सूचना मिळेल.

२. ठराविक काळानंतर आपल्या कार्डचा पिन बदलत रहा.

३. संशयास्पद न वाटणाऱ्या जागेवरच एटीएमचा वापर करा.

४. एटीएमच्या की-पॅडवरही बारकाईने लक्ष द्या.

तर मंडळी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वत: सोबत इतरांनाही सतर्क राहायला सांगा!

तुम्ही शेअर केलेली ही माहिती इतरांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?