बिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्याच का असतात? वाचा यामागचं लॉजिक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बिअर म्हणजे मद्याचाच एक प्रकार आणि हे काही तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. वयात आलेल्या प्रत्येक पोराला बिअर म्हणजे काय हे त्याच्या सवंगड्यांच्या मार्गदर्शनावरून वेळेआधीच कळत.

बिअरचा अतिनाद हा फार वाईट! तरीही बऱ्याच जणांचा बिअर पिण्याने काही होत नाही असा गैरसमज अजून टिकून आहे. बिअर पाश्चात्य देशांमध्ये अगदी सॉफ्ट ड्रिंक सारखी घेतली जाते. जसे आपण चहा पितो तशी ह्यांच्याकडे बिअर म्हणा ना!

दारू पेक्षा बिअर स्वस्त, त्यामुळे तरुणाईला ती आपल्या विळख्यात ओढून घेण्यात अगदीच यशस्वी झाली आहे. तरुणच नाही तर तरुणी देखील आता सर्रास बिअरची मनसोक्त मजा लुटायला मागे पुढे पाहत नाहीत.

 

beer inmarathi 1

 

कोणत्याही समारंभाची पार्टी असो त्यात बिअर असयलाच हवी असा जणू नियमच पडला आहे. असो, तर मित्रहो तुम्हीही बऱ्याच जणांना बिअरच्या नशेमध्ये धुंद होताना पाहिलं असेल, पण तुमचं अजून एका गोष्टीने लक्ष वेधलं आहे का?

तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सामन्यत: बिअरच्या बॉटल्सचा रंग हा हिरवा किंवा तपकिरी असतो. या बॉटल वापरुन झाल्यानंतर अनेकजण घरी जपून ठेवतात आणि त्यांचा डेकोरेशन साठी वापर करतात. 

आपण नेहमीच बघतो की, या बाटल्यांचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की यामागे काय कारण असेल? चला जाणून घेऊया काय आहे यामागचं कारण!

 

beer inmarathi
LBB.com

 

बिअर जास्त काळ फ्रेश राहावी म्हणून काचेच्या बॉटल्सचा वापर करण्याची सुरुवात ही १७ व्या शतकापासूनच झाली आहे.

 त्यामध्ये एक तोटा असा होता की काचेची बॉटल जास्त वेळ उन्हात ठेवल्याने सूर्यप्रकाशाच्या परिणामामुळे आतील बिअरला घाण वास यायचा आणि त्याची टेस्ट देखील बिघडायची. यातूनच शोध लागला तपकिरी रंगाच्या बिअर बॉटल्सचा!

तपकिरी रंगाच्या बॉटलमुळे सूर्यप्रकाशाचा आतील बिअर वर काहीही परिणाम होत नाही. तपकिरी रंगाच्या वापरामुळे बिअरची टेस्ट अजिबात बिघडत नाही तसेच ती खराब होत नाही आणि दीर्घकाळ उत्तमरीत्या टिकून राहते.

 

beer 2 inmarathi
theeconomictimes.com

 

पण दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र तपकिरी रंगाच्या बिअर बॉटलची तुट भासू लागली. त्यामुळे मोठ्या मोठ्या बिअर ब्रँडसच्या प्रोडक्शनवर परिणाम होऊ लागला.

तेव्हा  तपकिरी रंगाला पर्याय म्हणून बड्या बड्या ब्रँडसनी हिरव्या रंगाच्या बॉटल्स वापर करण्यास सुरुवात केली. पण या हिरव्या रंगाच्या बॉटल्स तपकिरी रंगाएवढ्या उपयोगी नव्हत्या.

या बॉटल्सवर सूर्यकिरणांचा परिणाम होत असे, त्यामुळे बिअर लवकर खराब होण्याची भीती असे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि सूर्यकिरणांपासून बिअर खराब होऊ नये म्हणून त्यांवर कोटिंग चढवण्यात येऊ लागली.

तपकिरी रंगाच्या बॉटल्स या पारदर्शक असतं,  बिअरची बॉटल जेवढी पारदर्शक तेवढी ती स्वस्त समजली जाई. त्यामुळे तपकिरी रंगाच्या बॉटल मधील बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जात असे.

याच गोष्टीचा फायदा उचलत बड्या बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या बॉटल मधील बिअर ब्रँडेड आहे असे मार्केटिंग करण्यास सुरुवात केली. त्याचा ग्राहकांच्या मनावर म्हणावा तसा परिणाम झाला.  

पुढे पुढे तपकिरी रंगाच्या बॉटल मधली बिअर रेग्युलर बिअर म्हणून ओळखली जाऊ लागली, तर हिरव्या रंगाच्या बॉटल मधील बिअर ब्रँडेड म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

beer-bottles-inmarathi05
scmp.com

 

हिरव्या रंगाची बिअर बॉटल्स एक स्टेटस् सिम्बॉल झाल्याने बहुतेक बिअर कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बॉटल मध्ये बिअर विकण्यास सुरुवात केली.

सध्या मात्र कोणत्याही रंगाच्या बॉटलमध्ये बिअर विकली जाऊ शकते कारण सर्वच काचेवर युव्ही प्रोटेक्शन कवच असते, तरीही Heineken आणि Tuborg सारखे काही मोठे ब्रँडस आजही हिरव्या रंगाच्या बॉटल्समध्येच बिअर विकतात, कारण एकच –

या स्पर्धात्मक युगात आपला ब्रँड टिकवून ठेवणे!

बिअरचे काही शारीरिक फायदे सुद्धा आहेत : 

 

beer for car-inmarathi
thedailymeal.com

 

बिअरमध्ये कोलेस्ट्रॉल नसतेच पण त्याचबरोबर ती शरीरातील कोलेस्ट्रॉलसाठी लाभदायक असते. नियंत्रित मात्रेत बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.

ठराविक मद्यपान करणाऱ्यांसाठी बिअर हा योग्य पर्याय असतो. कारण त्यात अल्कोहोल ठराविक प्रमाणात असते.

नियंत्रणात किंवा ठरावीक प्रमाणात बिअर सेवन केल्यास तुम्हाला मित्रांबरोबरही याचा आनंद घेता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही रिलॅक्स करण्यासाठी सेवन करू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?