'साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत..!

साखर खाणं बंद केल्याने शरीरावर होणारे हे परिणाम थक्क करणारे आहेत..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साखर हा शरीरासाठी सर्वात उपयोगी पदार्थांपैकी एक मानला जातो. कारण साखर पचनामध्ये सहाय्य करते. आपल्या शरीराला ऊर्जा पुरवते. पण असे असले तरी अति साखरेचे दुष्परिणामही दिसून येतात.

साखरेच्या अतिसेवनामुळे चरबी वाढते. लठ्ठपणा, मधुमेह आणि डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

 

sugar-marathipizza01
destinationfemme.com

 

तर मंडळी या साखरेच्या अतिसेवनाला सर्वात जास्त कारणीभूत आहे चहा आणि नंतर इतर गोड गोष्टी आल्याच.

दिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळा चहा पितो. तसेच वेगवेगळे गोड पदार्थ खातो. त्यामुळे आपल्या शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. शेवटी नाईलाजाने आपण साखर खाणे पूर्णपणे बंद करतो.

साखर पूर्णपणे बंद करण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ठाऊक नसेल, तर ते जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असेल ना?

तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ या!

 

sugar-marathipizza01
empowher.com

 

१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

 

heart-care-marathipizza

 

२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.

 

skin-marathipizza

 

तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.

३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza07

 

४.  साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.

६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.

 

 

साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.

 

Blood-marathipizza

 

साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.

८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.

९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. साखर पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.

 

wbc inmarathi
Medical News Today

 

१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधेदुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहापासून सुटकारा मिळू शकतो.

तर मंडळी, असे कित्येक फायदे आपल्या शरीराला साखर कमी केल्याने होतात.

काय तर मग? घ्याच आता साखर कमी करण्याचा कटू निर्णय!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?