त्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय सैन्याच्या शौर्याचे कित्येक किस्से आपण ऐकत आलोय. त्यांच्या त्या शौर्यगाथा ऐकून आपल्याही अंगावर मुठभर मांस चढल्याशिवाय राहत नाही.
आजही ते शौर्य तसूभरही कमी झालेले नाही हे विशेष! शौर्याची ही परंपरा आजही शेजारील शत्रूंना तोंड देताना निडरपणे पार पाडली जाते. पण अश्याही काही शौर्यगाथा आहेत, ज्या आपल्याला अजूनही माहित नाहीत.
इतिहासात जणू त्या कुठेतरी हरवूनच गेल्यात.
त्यापैकीच एक म्हणजे नूवे चॅपलची लढाई!

फ्रान्समध्ये झालेल्या नूवे चॅपलच्या लढाईला १०२ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण दुर्दैव म्हणजे आज संपूर्ण जग आणि खुद्द आपला देशही त्या युद्धातील हजारो भारतीय सैनिकांचे बलिदान विसरला आहे.
त्यांनी मातृभूमी साठी सांडलेल्या रक्ताची आज कोणालाही आठवण नाही.
फारच कमी जण असतील ज्यांना पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांसाठी लढता लढता शहीद झालेल्या त्या सैनिकांच्या पराक्रमाची जाणीव असेल.

नूवे चॅपलची ही लढाई ब्रिटीश-फ्रेंच युती विरुद्ध जर्मन आर्मी अशी होती. या लढाईमध्ये भारतीयांनी ब्रिटीशांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्सच्या आर्टोईस भागातील नूवे चॅपलचा भाग ताब्यात घेण्यासाठी हे घमासान युद्ध झाले.

ब्रिटीश आणि खुद्द जर्मन शत्रू सैन्य सुद्धा भारतीयांचे हे शौर्य पाहून थक्क झाले होते, असे युद्धाच्यावेळी कमांडिंग ऑफिसर असलेल्या सर क्लॉड ऑचिनलेक यांनी म्हटले होते.
खालील काही प्रसंग चित्रांवरून त्या युद्धपरिस्थितीची कल्पना येऊ शकते:
फ्रान्सच्या सोम्मे मधील भारतीय सायकलस्वार सैनिक :
लढाई दरम्यानचे भारतीय डेक्कन घोडेस्वार रेजिमेंट :
१५ व्या शीख रेजिमेंटचे फ्रान्सच्या मार्सेलीज येथे आगमन :
पश्चिम भागांवर भारतीय कॅव्हेलरी :
युद्धासाठी सज्ज भारतीय सैन्य :
भारतीय लष्कराचे बंदुकधारी :
फ्रान्समध्ये तैनात असलेल पाचव्या रॉयल गोरखा रायफल्सचे सैनिक :
भारतीय सैन्याने विरोधी जर्मन सैन्यावर हल्ला केला :
मुख्य म्हणजे युद्धात सहभागी झालेले सर्व भारतीय सैनिक हे प्रशिक्षित नव्हते काही जण तर मजुराचे काम करायचे. सैनिकांची गरज पडली म्हणून त्यांना देखील युद्धावर धाडण्यात आले होते. त्यामुळेच त्यांचे असामान्य कर्तुत्व लक्षात घेता युद्धाच्या जागेवर त्यांची स्मरणार्थ स्मारके देखील उभारण्यात आली आहेत.

नमन त्या शूर वीरांना!!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Khup changlya lekhabaddal dhanyawad