ह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपण अश्या कितीतरी वास्तू, स्थळे पाहिले असतील किंवा त्यांच्या विषयी ऐकले असेल की, त्या वास्तूंमध्ये काही ना काही गुपीते दडलेली आहेत. जसे की गुप्त दरवाजे, खोल्या, गुहा वगैरे!

गावाकडील देखील काही जुन्या हवेली, बंगल्या वगैरे मध्ये गुप्त अश्या खोल्या, मार्ग किंवा सुरंग असायच्या, ज्या सहसा कोणाला माहित नसायच्या, मोजक्याच माणसांना हे गुपीत ठाऊक असे.

असेच काही रहस्यमय रस्ते, खोल्या जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या वास्तूंमध्ये आहेत.

चला मग आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

 

१. सुवर्ण मंदिर, अमृतसर

 

golden-temple-marathipizza00
सुवर्ण मंदिर संपूर्ण जगभरामधील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये एक गुप्त मार्ग आहे, जो बिहारची राजधानी पटना येथे असणाऱ्या तख्त श्री पटना साहिब गुरुद्वारा पर्यंत गेला आहे. याच स्थानी गुरु गोविंद सिंह यांचा जन्म झाला होता.

या गुप्त मार्गाचा वापर स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी खूप वेळा केला गेला होता, पण नंतर हा मार्ग बंद करण्यात आला असे म्हणतात.

 

२. ताजमहल

 

taj-mahal-marathipizza01
tajmahal.org.uk

जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू म्हणजे ताजमहल. ताजमहल ही आपल्या देशाची शान आहे. पण आज आपण जो ताजमहल पाहतो तो पूर्ण ताजमहल नाही आहे.

ताजमहलच्या खाली एक गुप्त खोली आहे. पर्यटक फक्त वरच्या भागांमध्ये फिरू शकतो, ताजमहालच्या खाली असलेल्या खोलीत जाण्यास सर्वच पर्यटकांना मनाई आहे.

 

३. आग्रा येथे असलेला किल्ला

 

agra-fort-marathipizza
travelogyindia.com

सलीम आणि अनारकलीची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. शहनशाहने अनारकलीला भिंतींमध्ये दफन केले होते असे आपण ऐकत आलोय.

पण तुम्ही जेव्हा आग्र्याचा किल्ला बघायला जाल तेव्हा तुम्हाला समजेल की, अनारकलीला भिंतीमध्ये दफन केले गेले नव्हते…!

असे म्हणतात की, अकबराने तिच्या कडून पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेऊन एका गुप्त रस्त्याने अफगाणिस्तानला पाठवले होते. ती तेथून बाहेर पडल्यावर तो रस्ता बंद करण्यात आला होता.

 

४. आयफेल टॉवर

 

eiffel-tower-marathipizza
graphicslib.viator.com

पॅरिसमध्ये असलेला आयफेल टॉवर हा जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. या टॉवरमध्ये एक अशी खोली आहे, जिथे एका माणसाच्या राहण्याची जागा आहे.

कित्येक श्रीमंत लोकांनी ही जागा खरेदी करण्याची प्रयत्न केला होता. पण त्यामध्ये कोणालाही यश आले नाही.

 

५. माउंट रुश्मोरे मधील गुप्त खोली  

 

mount-reshomore-marathipizza
amazonaws.com

या पर्वतावर अमेरिकेचा पूर्ण इतिहास दिसून येतो. या पर्वतावर एक खोली सुद्धा आहे, ज्यात अमेरिकेच्या त्या काळातील खूप वर्णन जतन केले आहे. पण या जागेवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

६. इंडिया गेट 

 

india-gate-marathipizza
culturalindia.net

भारताची राजधानी दिल्ली येथे असलेल्या इंडिया गेटला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात, पण खूप कमी लोकांना हे माहित आहे की, इंडिया गेटच्या वरील भागामध्ये एक गुप्त खोली आहे.

या खोलीमध्ये जाण्यास सामान्य माणसांना बंदी आहे. येथे फक्त संरक्षण अधिकारीच जाऊ शकतात.

 

७. पिरॅमिड

 

pyramid-maratthipizza
culturalindia.net

इजिप्तमधील पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. या पिरॅमिडमध्ये सुद्धा गुप्त खोली आहे, ज्याला खूप वर्षांच्या मेहनतीनंतर पुरातत्व विभागाने शोधले होते.

या गुप्त खोलीची अलिशानता कोणालाही वेड लावू शकते.

पर्यटकांकडून या खोलीतील मौल्यवान वस्तूंशी छेडछाड होऊ शकते या भीतीने पर्यटकांना या खोलीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

८. वॅटिकन सिटीच्या खाली कब्रस्तान

 

Vatican-City-marathipizza
historycooperative.org

वॅटिकन शहरामध्ये स्थित असलेल्या ऐतिहासिक चर्चच्या खाली पुरातत्व विभागाला एक कब्रस्तान सापडले आहे. असे सांगितले जाते की, हे कब्रस्तान खूप वर्ष जुने आहे.

पण या कब्रस्तान विषयी अजूनही पूर्ण माहिती देण्यास पुरातत्व खाते टाळाटाळ करीत आहे.

 

९. एम्पायर स्टेट इमारतीमधील गुप्त मजला

 

empire-state-building-marathipizza
travelercorner.com

अमेरिका शहरातील ही इमारत तिच्या उंची आणि सुंदरतेसाठी संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.

पण फारच कमी लोकांना माहित आहे की, या इमारतीमध्ये गुप्त असा एक मजला आहे. ज्याचा क्रमांक १०३ आहे.

या मजल्यावर फक्त खास माणसेच जाऊ शकतात, ते सुद्धा आमंत्रण असले तरच. या १०३ व्या मजल्यावरून या सुंदर न्यूयॉर्क शहराला पाहण्याची मज्जाची काही वेगळी असेल.

अश्या ह्या जगप्रसिद्ध, भव्यदिव्य वास्तूंच्या गुपितांच्या कथा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?