' त्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो! – InMarathi

त्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चित्रांचा जादुगार म्हणून ज्याला अख्ख जग ओळखते, आजही तो हयात नसताना चित्रकलेचे शिक्षण घेणारे त्याला देवतुल्य मानतात अश्या पाब्लो पिकासोबद्दल कितीही जाणून घेतलं तरी ते अपूरचं ठरेल, त्याने व्यतीत केलेल्या प्रत्येक दिवसावर एखादी सुंदर कथा होईल, असं आयुष्य तो जगला.

आज याच महान चित्रकाराबद्दल काही अश्या गोष्टी जाणून घेऊया ज्या आजही त्याच्या चाहत्यांसाठी अज्ञात आहेत.

pablo-picasso-marathipizza01
galleryrouge.co.uk

 

१. पिकासोच्या संपूर्ण नावामध्ये तब्बल २३ शब्द आहेत

पिकासोचे पूर्ण नाव आहे-  पाब्लो दियागो जोसे फ्रान्सिस्को दे पॉला जुआन नेपोमुसिनो मारिया दे लोस रेमेदिओस किप्रिअनो दे ला सान्तिसिमा त्रिनिदाद मार्त्य्र पॅट्रीकिओ क्लीतो रुईझ वाय पिकासो.

हे संपूर्ण नाव त्याला विविध गुरु आणि नातेवाईकांच्या नावांवरून देण्यात आले होते. त्याची आई मारिया पिकासो वाय लोपेझ हिच्या नावावरून त्याला पिकासो हे नाव देण्यात आले होते. त्याच्या वडिलांचे नाव जोसे रुईझ ब्लास्को हे होते.

२. जेव्हा त्याचा जन्म झाला, तेव्हा नर्सला वाटले की बाळ मृत आहे. 

पिकासोचा जेव्हा जन्म झाला होता, तेव्हा तो खूप अशक्त होता, इतका की त्याच्या शरीराची काहीच हालचाल नव्हती त्यामुळे नर्सला वाटले की बाळ मृत जन्माला आले आहे, त्यामुळे ती त्याला तसेच सोडून त्याच्या आईला पाहण्यासाठी निघून गेली. पण सुदैवाने त्याचे काका डॉन साल्वाडोर जे देखील डॉक्टर होते त्यांनी त्याला वाचवले.

त्या प्रसंगाबद्दल पिकासो सांगतो की,

त्या काळी डॉक्टर्सना मोठ्या सिगारमधून धुम्रपान करणे खूप आवडत असे. माझे काकाही त्याला अपवाद नव्हते. जेव्हा माझ्या काकांनी मला तिथे त्या अवस्थेमध्ये पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांच्या सिगारचा धूर माझ्यावर सोडला. त्या उबदारपणामुळे मी लगेच प्रतिक्रिया दिली आणि जोराने रडू लागलो. अन्यथा हा पिकासो या जगातच आला नसता.

pablo-picasso-marathipizza02
pinimg.com

 

३. पिकासोचा पहिला शब्द : पेन्सिल

पाब्लो पिकासो हा जणू कलाकार म्हणूनच जन्माला आला होता. त्याच्या मुखातून पहिला शब्द ‘पिझ’ असा बाहेर पडला. पिझ हा लॅपिझचा शॉर्ट फॉर्म आहे, लॅपिझ हा पेन्सिलसाठीचा स्पॅनिश शब्द आहे. त्याचे वडील हे कलावंत आणि कलेचे प्राध्यापक होते.

वयाच्या ७ व्या वर्षी त्याने आपल्या वडिलांकडून कलेचे औपचारिक शिक्षण घेतले. पिकासो जेव्हा १३ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे वडील रुईझ यांनी चित्रकला सोडून दिली, कारण त्यांना खात्री पटली होती की आपला वारसा आपल्या मुलाने बरोबर खांद्यावर घेतला आहे.

४. पाब्लोचे पहिले चित्र

पाब्लोने वयाच्या ९ व्या वर्षी पहिले चित्र पूर्ण केले. त्या चित्राचे नाव ले पिकाडोर असे होते. या चित्रामध्ये त्याने माणूस बैलांच्या झुंजीमध्ये घोडेस्वारी करताना दाखवला होता. त्याने वयाच्या १५ व्या वर्षी शाळेत असताना स्पर्धेसाठी पहिले चित्र रेखाटले.

या चित्रामध्ये त्याने आपले कुटुंबीय म्हणजेच त्याची आई, वडील आणि लहान बहिण हे चर्चच्या बाजूला प्रार्थना करत असताना दाखवले होते.

pablo-pcasso-marathipizza03
complex.com

५. पिकासो अतिशय हट्टी विद्यार्थी होता

पिकासो हे कलात्मकदृष्ट्या खूप सुजाण होता, याबद्दल शंकाच नाही. त्याचे वर्गमित्र हे त्याच्यापेक्षा पाच ते सहा वर्ष मोठे होते. तरीसुद्धा तो त्यांचे अजिबात ऐकत नसले. आणि स्वत:ची मर्जी करत असे. याच हट्टी स्वभावामुळे त्याला ‘कॅलाबोसे’ मधून काढण्यात आले.

नंतर त्याला एका पांढऱ्या भिंतीच्या रुममध्ये, एका पांढऱ्या बेंच सोबत डांबून ठेवले, तेथील वातावरण असे होते की त्या जागी त्याला अजिबात चित्र काढता येत नसे, कारण त्याचे विचार पूर्णत: खुंटले जातं.

त्याची चित्रकला बंद पाडणे हा त्याच्या हट्टी स्वभावाला लगाम घालण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांना आणि शिक्षकांना वाटत असे.

६. पिकासोला मिळालेलले पहिले काम 

पिकासोने पेरे मेनच या डीलर बरोबर पहिला करार केला होता. त्याने दरमहा १५० फ्रँक (सुमारे ७५० अमेरिकी डॉलर) मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली.

७. पिकासोने मोनालिसाचे चित्र चोरले?

पिकासोने मोनालिसाचे चित्र चोरले नाही. १९११ मध्ये लिओनार्डो दा विन्सी याचे जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र  एका इटालीयान व्यक्तीने लौव्रे मधून चोरले होते.

पोलिसांनी त्याचा मित्र म्हणून पिकासोला आणि कवी गौइलामे अपोल्लीनैरे यांना ताब्यात घेतले. गौइलामे अपोल्लीनैरे याने पिकासोकडे संशयित म्हणून बोट दाखवले .त्यामुळे पोलिसांनी त्याची  विचारपूस केली. पण नंतर त्याला सोडून देण्यात आले.

pablo-picasso-marathipizza04
thedailybeast.com

८. पिकासोला कुठे दफन करण्यात आले?

१९५८ मध्ये फ्रान्सच्या दक्षिणेकडे असलेल्या वौवेनार्गुज (Vauvenargues) या त्यांच्या गावी असलेल्या चेतेवूच्या मैदानामध्ये त्याला दफन करण्यात आले होते. आजही हि जागा म्हणजे नवीन चित्रकारांसाठी पवित्र तीर्थस्थळापेक्षा कमी नाही!

अश्या या महान चित्रकाराला मानाचा मुजरा!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?