''ती'चं आणखी एक धाडसी पाउल - इंजिनीअर असूनही 'ही' तरुणी करतेय शेती!

‘ती’चं आणखी एक धाडसी पाउल – इंजिनीअर असूनही ‘ही’ तरुणी करतेय शेती!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

लेखक : सचिन आमुणेकर

===

आपला देश हा शेतीप्रधान आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलोत पण शेतकऱ्यांची आताची भयाण परिस्थिती पाहता खरंच आपण शेतीप्रधान आहोत का..? हि शंका येते. शेती करणार कुटूंब हे किती हालाखीचे दिवस काढतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हजारो शेतकरी आज आत्महत्या करतायत, पिकवलेल्या मालाचा योग्य हमीभाव भेटत नाहीय. अवेळी पाऊस, वादळ, वन्यप्राण्याकडून झालेलं पिकांच नुकसान या सगळ्या प्रकारात शेतकरी चांगलाच भरडला जातो. शेतीत आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे लोक शेती करण्यापासून लांबच पळतात. तुम्ही किंवा मी स्वप्नात देखील शेती करून स्वतचं पोट भरण्याचा विचार करू शकतं नाही.

farmers-suicide-india-marathipizza
indiaopines.com

सध्याचे युग हे स्पर्धचे युग आहे. आज प्रत्येक क्षेत्रात गळेकापू स्पर्धा निर्माण झालीय. नोकरी मिळवण्यासाठी किती कष्ट, प्रयत्न करावे लागतात हे आपल्या सगळ्यांचं माहित आहे. चांगली नोकरी मिळण्यासाठी चांगलं शिक्षण हे खूप महत्त्वाचं. आज अनेक युवक -युवती उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात मुंबई-पुणे गाठतात. अश्या वातावरणात एखादी व्यक्ती म्हणाली कि मी इंजिनियरिंगच शिक्षण घेणार आणि कोकणात जाऊन तिथल्या मातीत शेती करणार तर त्या माणसाला लोक नक्कीच खुळा म्हणतील आणि त्यातल्या त्या ती मुलगी असेल तर मग काही विचारायलाच नको. पण रीना केसरकर नावाच्या उच्चशिक्षित युवतीने हे खुळेपण स्वीकारलं आणि ती थेट कणकवलीत आपल्या गावी चक्क शेती करू लागली.

Engineer-Farmer-marathipizza01
abplive.in

ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता रिना शेतातली सर्व काम मोठया मेहनतीने करते. नांगरणी, लावणी, फाळणी हि प्रचंड मेहनतीची कामेही ती सहजपणे करते. शेतीच्या कामात तिची शिक्षिका असलेली मोठी बहिणदेखील तिला मदत करते. वडिलांना दम्याच्या त्रासामुळे आता शेतात काम करायला जमत नाही. एखाद्या पुरुषालाही लाजवेल असं काम रीना सध्या करतेय. मेहनती, अभ्यासू व गुणवान मुलगी म्हणून रिनाचा अख्या गावात लौकिक आहे. तिच हे यश पाहून तिच्या वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः असावे जमा होतात.

चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली महिला आज विविध क्षेत्रांत झेप घेत आहे. पण शेती व्यवसायात असणाऱ्या महिला नगण्यच.. रीना केसरकर ही त्यातीलच एक रणरागिणी. शेती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कर्तबगार महिलापैकी कोकणातल्या रिनाच नाव आज पूर्ण महाराष्ट्रात गाजतय.

अश्या ह्या कोकणकन्येला मानाचा मुजरा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?