' मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा : प्रोजेक्ट मराठवाडा – InMarathi

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा : प्रोजेक्ट मराठवाडा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे बरेचसे चित्रपट मराठीमधे बनत असतात. ह्याच प्रश्नावर परंतु इतर सर्वांहून थोड्या वेगळ्या प्रकारचा चित्रपट येत आहे – प्रोजेक्ट मराठवाडा.

 

सर्वात मोठा फरक म्हणजे हा चित्रपट महाराष्टाच्या, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत असला तरी तो हिंदी भाषेतून आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाद्वारे मराठवाड्याची व्यथा राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाची कास्ट. ह्या चित्रपटात ओम पुरींसारख्या मातब्बर अभिनेत्याने मराठवाड्यातील शेतकऱ्याची भूमिका बजावली आहे. शिवाय सीमा बिस्वासजींचीसुद्धा ह्यात प्रमुख भूमिका आहे.

चित्रपटाचं ट्रेलर आणि टीजर बघून हेही जाणवतं की “प्रोजेक्ट मराठवाडा” मधे – हवालदिल शेतकरी जसा असहाय चितारल्या जातो – तसा नं दाखवता, एक चिडलेला, विद्रोही शेतकरी आणि त्याने हलवलेली यंत्रणा – असं कथानक रंगवलेलं आहे.

ट्रेलर आणि टीजर च्या लिंक्स पुढे देत आहोत :

 

 

 

 

विवीध स्तरातील समस्या संपूर्ण समाजासमोर मांडण्याचं चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे.

अश्या चित्रपटांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे सुटण्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना केली जाईल – अशी आशा करूया !

गुड लक टू “प्रोजेक्ट मराठवाडा” !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?