' मोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात? वाचा सिक्रेट! – InMarathi

मोदी, ट्रम्प, पुतीन आणि इतर बडे नेते कोणता मोबाईल वापरतात? वाचा सिक्रेट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ज्या प्रमाणे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला मोबाईल फोनची गरज असते, तेवढीच किंवा त्यांपेक्षा जास्त गरज असते प्रसिद्ध व्यक्तींना, आता या प्रसिद्ध व्यक्ती कोणीही असू शकतात, कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ आणि राजकारणी सुद्धा! आज आम्ही तुम्हाला जगभरातील बडे नेते कोणते मोबाईल फोन वापरत असतील ते सांगणार आहोत.

पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की, हा लेख जास्त गांभीर्याने घेऊ नका. कारण आम्ही केवळ अंदाज बांधले आहे.

त्याचे कारण म्हणजे बडे नेते सुरक्षेच्या कारणास्तव वैयक्तिक मोबाईल फोन्स वापरत नाहीत. त्याला पर्याय म्हणून RAX किंवा restricted area exchange phones वापरले जातात.

असे फोन्स केवळ खास व्यक्तींकडेच आढळून येतात. तरीही अनेक कार्यक्रमांच्या वेळी या नेत्यांच्या हातात फोन पाहण्यात आले आहेत, त्यामुळे आपण अंदाज लावून या नेत्यांचे आवडते फोन्स कोणते असावेत याचा अंदाज नक्कीच लावू शकतो नाही का?

१. नरेंद्र मोदी

 

narendra-modi-marathipizza
qph.ec.quoracdn.net

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकवेळा आयफोनचा वापर करताना पाहण्यात आले होते. अहो एकीकडे अर्धे जग आयफोनच्या प्रेमात आहे, त्यात आपले पंतप्रधान म्हणजे देखील एक माणूसचं ना, आवडत असेल त्यांनाही आयफोन!

 

२. डोनाल्ड ट्रम्प

 

Donald Trump-marathipizza
media.snn.ir

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही वैयक्तिक ट्वीट्स मध्ये खालील बाजूला  “via Twitter for Android” आणि  “via Twitter for IPhone” हे उल्लेख आढळून आले होते. त्यामुळे सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना आयफोन आणि अँड्रोईड दोन्ही प्रकारचे फोन्स आवडत असावेत. तरीही बऱ्याच वेळा त्यांच्या हातात काळ्या रंगाचा अँड्रोईड फोन दिसल्याचेच म्हटले जाते.

 

३. नवाझ शरीफ

 

nawaz-sharrif-marathipizza
rediff.com

ही गोष्ट तुम्हाला महाला माहित नाही, पण जगात नवाझ शरीफ यांना ब्लॅकबेरी मोबाईल फोनचे अतिशय मोठे चाहते म्हणून ओळखले जाते. सध्या ब्लॅकबेरीची म्हणावी तेवढी क्रेझ नाही. पण पाकिस्तानच्या या माजी पंतप्रधानांचे  ब्लॅकबेरी प्रेम काही कमी होणारे नाही.

 

४. वाल्दिमिर पुतीन  

 

vladimir-putin-marathipizza
newstatesman.com

रशियन राष्ट्राध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांनी सुरक्षेच्या कारणास्तव वैयक्तिक मोबाईल फोन वापरात नसल्याचे स्पष्ट केले होते. KGB ने त्यांच्यासाठी खास स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे. पण मध्यंतरी The Telegraph या वृत्तपत्राने पुतीन हे एमटीएस कंपनीचा अँड्रोईड फोन वापरात असल्याचा दावा केला होता.

 

५. किम जोंग युन

 

kim-jong-un-marathhipizza
nydailynews.com

उत्तर कोरियाच्या या हुकुमशहाला देखील मोबाईल फोनचे वेड असल्याचे ऐकिवात आहे. विविध फोन्स बाळगायला त्याला आवडते. जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा बैठकीमध्ये त्याच्याजवळ एचटीसी बटरफ्लाय हा फोन आढळून आला होता.

असा आहे हा मोबाईल…सामान्यांपासून बड्या बड्या हस्तींना वेड लावणारा…..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?