वारंवार लोन रिजेक्ट होतंय? अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या सर्व सामान्य माणसाला आपले घर, गाडी घेण्याचे किंवा इतर काही स्वप्न पूर्ण करायचे असल्यास कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरते. पण प्रत्येक व्यक्तीला काही समसमान कर्ज कोणतीही बँक किंवा इतर संस्था देत नाही. बँक किंवा संस्था तुम्हाला तुमच्या सिबिल रेकॉर्डवरच कर्ज देतात. जर तुमचा सिबिल रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये कर्ज मिळते, पण तुमचा सिबिल रेकॉर्ड खराब असल्यास तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी खूप समस्यांना सामोरे जावे लागते.

cibil-score-marathipizza01
creditvidya.com

सिबिल स्कोर म्हणजे काय?

ट्रान्सयूनियन सिबिल लिमिटेड भारताची पहिली वहिली क्रेडीटची माहिती पुरवणारी कंपनी आहे, जिला क्रेडीट ब्युरो सुद्धा म्हटले जाते. ही कंपनी ग्राहकांविषयी अशी माहिती उपलब्ध करून देते, ज्या माहितीच्या आधारे आर्थिक कंपन्याच्या वापरामध्ये वाढ होते आणि ग्राहकांना कमी अटींमध्ये कर्ज मिळते. या कंपनीकडे जवळपास २४०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. ज्यामध्ये मोठमोठ्या बँका, आर्थिक कंपन्या, नॉन बँकिंग कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या कंपनीकडे ५५० दशलक्ष पेक्षा जास्त लोकांचे आणि आर्थिक संस्थांचे क्रेडीट रेकॉर्ड आहेत.

 

सिबिल स्कोर निश्चित कसा केला जातो?

जो व्यक्ती कर्ज घेण्यास इच्छुक आहे, त्याच्या गेल्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड बघितला जातो आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या माहितीचा आढावा घेतला जातो. त्याच्या नंतर त्याने पूर्वीचे कर्ज वेळेवर फेडले आहे का? किंवा तो व्यक्ती क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो का?  या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि त्यावर त्याचा स्कोर ठरवण्यात येतो. एखाद्या व्यक्तीचा स्कोर तेव्हाच चांगला असू शकतो जेव्हा तो आपल्या घेतलेल्या कर्जाचे हफ्ते वेळेवर भरत असेल किंवा आपल्या क्रेडीट कार्डचे बिल न चुकता भरत असेल. हे लक्षात ठेवा की, या स्कोरमध्ये तुमची बचत, गुंतवणूक आणि फिक्स डिपोजिटची माहिती गृहीत धरली जात नाही.

cibil-score-marathipizza02
static.sify.com

सिबिल कसे काम करते?

उपयुक्त रेकॉर्डस, बँक आणि इतर आर्थिक संस्थांकडून मासिक आधारावर सिबिल रेकॉर्ड जमा केले जातात. याच माहितीचा उपयोग करून Credit Informational record (CIR) अर्थात क्रेडीट स्कोर बनवला जातो. क्रेडीट ब्युरो RBI द्वारे २००५ च्या कलमानुसार मंजूर करण्यात आली आहे. तुमचा सिबिल स्कोर जेवढा जास्त असेल तेवढी कर्ज मिळण्याची संभावना जास्त असते.

 

आदर्श सिबिल स्कोर किती आहे?

एक चांगला सिबिल स्कोर हा ७५० ते ९०० च्या दरम्यान असतो. जर तुमचा स्कोर ७५० च्या वर असेल तर तुम्हाला कोणतीही बँक आणि नॉन बँकिंग संस्था लगेचच कर्ज देईल, पण जर सिबिल स्कोर ७५० च्या खाली असेल तर अश्या व्यक्तीला कर्ज देण्यामध्ये खूप समस्या येतात.

 

सिबिल स्कोर कसा सुधारू शकता?

१. आपले हफ्ते किंवा क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरत राहा.

२. खूप जास्त क्रेडीट कार्डचा वापर करणे योग्य नसते त्यावर नियंत्रण ठेवा.

३. तुम्हाला तुमच्या कर्जामध्ये सुरक्षित (गृह कर्ज आणि वाहन कर्ज) आणि असुरक्षित (वैयक्तिक कर्ज आणि क्रेडीट कार्ड्स) अश्या कर्जांचा समावेश करणे गरजेचे आहे.

४. कर्ज घेण्यासाठी प्रत्येकवेळी घाई करू नका. तुम्हाला कर्जाची फार गरज आहे असे जाणवू देऊ नका.

५. तुम्ही वर्षभरामध्ये एकदा तरी आपल्या क्रेडीट हिस्ट्री बद्दल नक्की जाणून घ्या.

६. कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये घेतल्या गेलेल्या कर्जाची संख्या कमी करणे गरजेचे आहे.

७. आपल्या ईएमआयचे प्रमाण कमी करावे.

cibil-score-marathipizza03
जर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर पहायचा असल्यास www.cibil.com या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरा आणि नाममात्र शुल्क भरून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “वारंवार लोन रिजेक्ट होतंय? अहो मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे!

 • January 6, 2019 at 10:22 pm
  Permalink

  सर पेमेट भरल्या नंतर किती दिवसाने सिव्हील सुधरते

  Reply
 • January 17, 2019 at 2:51 pm
  Permalink

  सर पेमेट भरल्या नंतर किती दिवसाने सिव्हील सुधरते

  Reply
 • February 27, 2019 at 7:42 pm
  Permalink

  सर माझा सिबील स्कोअर 796आहे तरी मला लोन नाकारली जात आहे मला काय करावं लागेल

  Reply
  • July 19, 2019 at 10:21 am
   Permalink

   सर माझा सिबिल स्कोअर 841आहे तरीही माझे क्रेडिट कार्ड एप्लिकेशन वारंवार रिजेक्ट का होतं.

   Reply
 • August 2, 2019 at 2:39 pm
  Permalink

  सर माझा सिबिल स्कोअर दाखवत नाही कधीच काय करावे लागेल?

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?