चीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात? वाचा अज्ञात अचाट गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

चीनची भिंत म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य! या भिंतीमागचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढ्याच काही रंजक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला माहिती नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्या रंजक गोष्टी!

 

china-wall-marathipizza01
history.com

१. चीनची ही विशाल भिंत ७ व्या शतकामध्ये म्हणजेच २८०० वर्षापूर्वी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या भिंतीला पूर्ण करण्यासाठी जवळपास २००० वर्ष लागली होती.

या प्रसिद्ध भिंतीच्या निर्मितीची सुरुवात राजा किन शिहुआंगने केली होती.

२. एकेकाळी या भिंतीला अनेक नावे देण्यात आली होती. जसे की, रमपंत, पर्पल फ्रॉट्रीयर, अर्थ ड्रॅगन वगैरे वगैरे!

मात्र १९ व्या शतकामध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना हे नाव देण्यात आले, जे अखेर अजरामर झाले.

 

China Wall.Inmarathi2
wikimedia.org

३. या भिंतीचे काही भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. जर या भिंतीचे सर्व भाग एकमेकांना जोडले तर या भिंतीची एकूण लांबी ८८४८ किलोमीटर एवढी असेल.

४. एका दाव्यानुसार ही भिंत बनवताना तब्बल  २० ते ३० लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले होते.

५. चीनची भिंत एवढी रुंद आहे की त्यावर एकाचवेळी ५ घोडे आणि १० लोक पायी जाऊ शकतात.

 

china-wall-marathipizza02
bidnessetc.com

६. खरं तर चीनची भिंत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी बनवण्यात आली होती, पण तिचा उपयोग कित्येक शतकांपर्यंत व्यापारासाठी केला गेला होता.

७. जेव्हा भिंतीची निर्मिती करण्यात येत होती, तेव्हा कोणाच्याही हातून चूक झाली तर त्या व्यक्तिला/कामगाराला त्याच भिंतीच्या खाली गाडले जात असे.

म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठे कब्रस्तान देखील म्हटले जाते.

 

China Wall.Inmarathi
ytimg.com

८. १२११ मध्ये ज्या प्रकारे चंगेज खानने ही भिंतीला तोडून चीनवर आक्रमण केले होते, त्याच प्रकारचा प्रयत्न अनेक आक्रमणकाऱ्यांनी केला आणि चीनवर हल्ला केला होता.

 

changez-khan-statue-marathipizza

 

९. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या भिंतीमध्ये असंख्य निरीक्षण मिनारे बनवण्यात आली आहेत.

 

१०. चीनची भिंत बनवताना, या भिंतीच्या दगडांना जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता.

 

china-wall-marathipizza03
chinahighlights.com

 

११. भारतातील कुंभलगढची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे, पण चीनच्या भिंतीपेक्षा ही भिंत कित्येक पटीने छोटी आहे. या भिंतीची एकूण लांबी ३६ किलोमीटर एवढी आहे.

 

१२. चीनी भाषेमध्ये या भिंतीला ‘वान ली छांग छंग’ म्हणतात.

 

१३. जवळपास १ कोटी पर्यटक दरवर्षी या भिंतीला भेट देण्यासाठी येतात.

 

China Wall.Inmarathi1
turner.com

 

१४. चीनची भिंत ही एकच अशी मानवनिर्मित वास्तू आहे, जी अवकाशातून देखील स्पष्टपणे पाहता येते.

 

१५. चीनच्या भिंतीची कमाल उंची १४ मीटर म्हणजेच ४६ फुट इतकी आहे.

 

china-wall-marathipizza04
vizts.com

केवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे.

त्यामुळे संधी मिळाल्यास चीनच्या या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “चीनच्या भिंतीला ‘जगातील सर्वात मोठे कब्रस्तान’ का म्हणतात? वाचा अज्ञात अचाट गोष्टी!

  • January 1, 2019 at 12:56 pm
    Permalink

    khup ch chane aahe mahiti jya gosti lokanna mahiti nahi tya in marathi chya madhyamatun mahiti hotat

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?